कमिटमेंट # १
कमिटमेंट # १


कमिटमेंट म्हणजे काय रे?
फक्त लग्न?
खरचं दोघे एकमेकांशी कमिटेड असतात?
नव्यानव्या लग्न झालेल्या तिचा त्याला प्रश्न.
तोही नवाकोरा...पण उत्तरादाखल स्माईली फेस झालेला
.
.
.
.
दोघं हनिमून मूडमध्ये
गाडी काढून पहाटे पहाटे महाबळेश्वरला..
"किती सफाईदारपणे चालवतोस रे गाडी.
मला पण शिकव ना
ए ! मी चालवू आता ?
प्लीज....प्लीज दे ना रे
आत्ता गर्दी पण नाही रस्त्याला काही
प्लीज..."
नव्या नवरोबाला हट्ट मोडवेना
हं घे...
सोड क्लच हळूहळू
एस्सीलेटर वाढव
हं आता टाक सेकंड गिअर हळू हळू
चालव जमतीये - जमतीये छान
आता दे मला
घाट सुरू होईल
नको ना रे. मी चालवते ना.
अगं स्पीड कमी कर ना.
त्या बाजूला नको जाऊ जास्त.
खाली खोल आहे आणि भिंत पण नाही
अगं...थांब हळू चालव
अग
ं अगं...
मला ब्रेक नाही सापडतए....
काय करू सांग ना?
ती टेन्शनलेली.
तो ही पुरता भांबावलेला.
हळू कर..गाडी जाईल खाली
मधे ब्रेक असतो.
दाब जोरात.
बंद पडली तरी चालेल
कर्sssssssss
कर्कश्य आवाज करत गाडी आहे तिथे थांबली.
कड्याच्या अगदी टोकाला..
थोडे पुढे गेली असती तर पडली असती.
ती गोंधळलेली
त्यानं भानावर येत हँड ब्रेक लावला.
तिला खाली उतरवलं आणि गाडी मागे घेतली
ती प्रचंड घाबरून फुल रडण्याच्या बेतात...
त्यांन जवळ घेतलं
गाडी पडली असती तर आपण दोघेही...........ती बोलत होती.
अचानक क्लिकलं
तू बाजूचे दार उघडून उडी टाकू शकत होतास ना रे ?
का नाही मारलीस?
त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं
तोच स्माईली फेस...आश्वासक..
हिच्या डोक्यात चकाकलं
कमिटमेंट..........