कमिटमेंट # १
कमिटमेंट # १


# १
कमिटमेंट म्हणजे काय रे?
फक्त लग्न?
खरचं दोघे एकमेकांशी कमिटेड असतात?
नव्यानव्या लग्न झालेल्या तिचा त्याला प्रश्न.
नजरेत मोठ्ठं प्रश्नचिन्ह..
कप्पाळ
काय उत्तर देणार अशा प्रश्नांचं
वेडीच आहे ही
प्रेम अस कस तोलता येईल.
तोही नवाकोरा...
पण उत्तरादाखल स्माईली फेस झालेला
.
.
.
.
दोघं हनिमून मूडमध्ये
गाडी काढून पहाटे पहाटे महाबळेश्वरला..
"किती सफाईदारपणे चालवतोस रे गाडी.
मला पण शिकव ना
मला ना लहानपणापासून गाडी चालवायचं अॅट्र्याक्शन आहे
शिकले होते पूर्वी
थोडी थोडी येत होती पण नंतर राहूनच गेलं
...
ए! मस्त वाटतयं ना
असा कमी रहदारीचा रस्ता...
पहाटेची वेळ...
गंधित वारा
आणि सोबत तू
Awesome...
ती बोलत होती, तो मन भरून ऐकत होता.
अग? कविताच करायला लागली की तू.
त्याच्या डोळ्यात कौतुक.
मग! अशी रम्य पहाट..
"आणि सोबतीला नईनवेली तू" तो तिला जवळ घेत म्हणाला
चावटपणा पुरे हं गाडी चालवताना. समोर लक्ष ठेव. तिने लटक्या रागाने दटावलं
"आत्ता रागाव कितीही. याची सगळ्याची भरपाई करून घेईन मी हॉटेलमध्ये पोहोचल्यावर. मग बघू किती रागावते आणि किती दूर जातेस ते." तो डोळा मारत म्हणाला.
.......
ए ! मी गाडी चालवू आता ?
प्लीज....प्लीज दे ना रे
आत्ता गर्दी पण नाही रस्त्याला काही
तू शिकव ना.
प्लीज..."
नव्या नवरोबाला हट्ट मोडवेना
हं घे...
सोड क्लच हळूहळू
एस्सीलेटर वाढव
हं आता टाक सेकंड गिअर हळू हळू
चालव जमतीये - जमतीये छान
आता दे मला
घाट सुरू होईल
नको ना रे.
मी चालवते ना.
अगं स्पीड कमी कर.
त्या बाजूला नको जाऊ जास्त.
खाली खोल आहे आणि भिंत पण नाही
अगं...थांब हळू चालव
अगं अगं...
मला ब्रेक नाही सापडतए....
काय करू सांग ना?
ती टेन्शनलेली.
तो ही पुरता भांबावलेला.
हळू कर..गाडी जाईल खाली
ब्रेक...ब्रेक ....
दाब जोरात.
बंद पडली तरी चालेल
कर्sssssssss
कर्कश्य आवाज करत गाडी आहे तिथे थांबली
कड्याच्या अगदी टोकाला..
थोडे पुढे गेली असती तर पडली असती.
ती गोंधळलेली
त्यानं भानावर येत हँड ब्रेक लावला.
तिला खाली उतरवलं आणि गाडी मागे घेतली
ती प्रचंड घाबरून फुल रडण्याच्या बेतात...
त्यांन जवळ घेतलं
गाडी पडली असती तर आपण दोघेही...........ती बोलत होती.
अचानक क्लिकलं
तू बाजूचे दार उघडून उडी टाकू शकत होतास ना रे ?
का नाही मारलीस?
त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं
तोच स्माईली फेस...आश्वासक..
हिच्या डोक्यात चकाकलं
कमिटमेंट..........