Abasaheb Mhaske

Inspirational

1  

Abasaheb Mhaske

Inspirational

खूपदा वाटतं...

खूपदा वाटतं...

2 mins
1.7K


    खूपदा वाटतं... सालं आपलं आयुष्य म्हणजे ना निव्वळ बेचव , निरस ,गुळगुळीत पांचट झालंय. ना कसलं थ्रिल , सस्पेन्स , संघर्ष , सर्वकाही ठरल्याप्रमाणे सूर्य त्याच्या सवयीप्रमाणे उगवतो . मावळतो पुन्हा उगवतो ...तसंच आपलं होऊन बसलंय. आपल्या आयुष्यात नि त्या रोबोट मध्ये काय फरक उरलाय ? काही तरी वेगळेपण असला पाहिजे कि नाही ? संगणक , रोबोट जसे आज्ञा स्वीकारतो तसे आपणही फरक फक्त एवढाच कि संगणक सांगितलं तेवढाच करतो आपण कधी कधी जास्त डोकं चालवतो किंवा स्वार्थासाठी . आपल्या सोयीनुसार थोडं वेगळं वागतो एवढच . पण आपलं आयुष्य म्हणजे घड्याळाच्या काट्यावर पाळणाऱ्या यंत्रांसारख झालंय हे हि खरं आहे .भावनांचा ओलावा , परस्पराविषयी जिव्हाळा , आपुलकी कमी होत चाललीय . त्याला धावत्या जगाची आधुनिक जीवनप्रणाली जबाबदार आहे तितकेच आपण स्वतःही..

   खूपदा वाटतं .. पण जीवघेण्या स्पर्धेत माणसाचं यंत्र होऊन बसलं आहे . तो भावना शून्य बनू पाहतो आहे . मला ना कधी कधी वाटतं . पण लहान मुलासारखं वर्तमान काळात जगणार हळवे मन अंगिकारायला हवे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला हवा . लहानग मुलं होऊन त्याच्याशि हितगुज करावं , खेळावं .. त्य्नाचतील एक होऊन त्यांना आनंद देऊन स्वतःही मिळवावा . निसर्गाच्या सानिध्यात रमून , पशु पक्षी , झाडे - झुडपे , वृक्ष वेली मध्ये मनसोक्त हुंदडावं .. रंगिबिरंजि फुले .. प्राण्याचचं पक्षाचे निरीक्षण करायला हवे . त्यांच्यातले आपलेपण .. प्रेम , आदी भावना अलगद टिपून ते क्षण मनस्वी अनुभवायास हवे ...सभोवतालचे पाळीव प्राणी यांच्याकडनही खूप काही शिकायला हवं . खूप काही अद्भुत , रम्य या जगात भरून पावलेलं.. आपल्या नजरेतून सुटलेलं ... नव्याने अनुभवायास हवं असं वाटत . 

    खूपदा वाटतं ...आयुष्यात  कधी तरी भूतकाळातील काही घटित घटना खेळकर वृत्तीने आठवून त्यातील जुने मित्र , स्नेही अशी बरीचशी माणसं शक्य असतील तेवढे पुन्हा त्यांना भेटून काही क्षण का होईना त्याच्याशी घालवून आनंदाची लयलूट करावी . छोटी छोट्या गोष्टीही कधी कधी खूप मोठा आनंदचाच नाही तर भविष्यासाठी नवसंजीवनी देण्याचे काम करीत असतात ..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational