खुप दिवसांनी भेटलीस
खुप दिवसांनी भेटलीस


तुज पाहताक्षणी काळजात धस्स झालं
का कुणास ठाऊक मन माझं गहिवरून आलं
वाटलं होतं तुला डोळे भरून पहावं
कडकडून मारावी मीठी तुझ्यातंच विलीन व्हावं
खुप दिवसांनी भेटलीस खूप -खूप बोलायचं होतं
मी खूप शोधलं आपलं प्रेम डोळ्यात तुझ्या
अनोळखीपणाच वागणं पाहता काळ्जाच पाणी पाणी झालं
नजरा नजर होता थोडी तू बावरलीस... नंतर पुन्हा सावरलीस
कसं जमतं गं तुला वागणं ओठात एक मनात वेगळंच खुप दिवसांनी भेटलीस ... खूप -खूप बोलायचं होतं
झाल्या असतील लाख चूका तुझ्या तितक्याच माझ्याही
तू तशी अनं मी हा असा सर्व काही मनातंच राहून गेलं
अन् त्या दिवशी अचानक ... भेटलीस पुन्हा
संसारात तुला सुखी पाहून खूप -खूप बरं वाट्लं
खूप दिवसांनी भेटलीस खूप-खूप बोलायचं होतं .
काहीच न घडल्यागत तू अडलेली असतांनाही... खुप काही केलंस माझ्यासाठी
साथ नाही दिलीस पण मैत्री निभावण्यास नाही विसरलीस
मीही टाळलच तुला नाही डोकावलो तुझ्या जीवनात
तुझ्या सुखी संसारात मला नव्हती माती कालवायची म्हणून
प्खुरेमप दिवसांनी भेटलीस खूप -खूप बोलायचं होतं
आत्या चिल्या-पाल्यांना घास भरवतांना डबड्बलेल्या नेत्रांनी म्हणत असशील
इतका कसा रे तु बेईमान झालास ? सहानूभुतीचे चार शब्द नाहीत तुझ्याकडे माझ्यासाठी
पुरुष मात्र सारे कसे सारखेच इथून - तिथून स्वार्थी संधीसाधू
एखाद्याच आयुष्यंच असतं गं इतरांना प्रकाश देण्यास फक्त जळ्ण्यासाठी दिव्यातील वातीसारखं
खुप दिवसांनी भेटलीस खूप -खूप बोलायचं होतं
भाग्य असतं एकेकाचं स्वतः जळून इतरांना प्रकाशमान करण
तर काहींना झीजून स्वतःला संपवून चंद्नापरी सुगंध अनिवार पसरवणं
भासलीस मला तु अगदी तशीच आजही प्रेमळ तुट्लेली नाती सांधणारी
चुकलंच माझं तुझ्या संकटकाळी मी तुला धीराचे चार शब्दही नाही बोलु शकलो
खुप दिवसांनी भेटलीस खूप -खूप बोलायचं होतं
खुप इ्च्छा होती गं तुला बोलण्याची धिराची दोन शब्द उच्चारण्याची
तु भेटल्यावर प्रितपुष्पांनी जिवन बहरावं तुमचं... असच म्हणायच होतं
उध्वस्त भावनांची स्पंद्ने नष्ट करून मित्रत्व साकारायचं होतं
दुभंगल्या मनांच जाळं पुन्हा एकदा गुंफायचं होतं
खुप दिवसांनी भेटलीस खूप -खूप बोलायचं होतं