STORYMIRROR

DrSujata Kute

Drama

2  

DrSujata Kute

Drama

कारण... घटस्फोटाचे

कारण... घटस्फोटाचे

2 mins
724

श्रुतीला अमोलपासून घटस्फोट हवा होता. ती घटस्फोटासाठी एकसारखा तगादा लावत होती... या कारणाने श्रुतीच्या माहेरचे लोक आणि सासरचे लोक खूप परेशान होते... पण श्रुती आपल्या विचारांवर ठाम होती...


तसं पाहिलं तर लग्न होऊन दोघांनाही दहा वर्ष झाले होते...

अचानक असे काय झाले की श्रुती घटस्फोट मागायला लागली होती. घरामध्ये सगळेच परेशान झाले होते... कुणालाही श्रुतीचे वागणे समजत नव्हते...


श्रुती आणि अमोलला एक सात वर्षांचा मुलगा गौरवदेखील होता... या सगळ्यामध्ये गौरवची फरफट मात्र नक्कीच होणार होती... 


श्रुती आणि अमोलचं दहा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं... दोघांनीही एकमेकांना एका मॅट्रिमोनिअल साईटवरून पसंत केले होते... आणि एकदम थाटामाटात लग्न झाले होते... दोघेही खूप समजूतदार होते.. त्यामुळे त्यांचे फार कमी भांडणं होत... आणि लवकरच एकमेकांसोबत रुळले होते.. 


दोघेही आनंदी असल्याकारणाने त्यांच्या त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी देखील छान प्रगती करत होते... लवकरच श्रुतीला गोड बातमीची चाहूल लागली होती... डॉक्टरांनी मात्र श्रुतीला वर तोंडाशी असल्या कारणाने एकदमच बेड रेस्ट सांगितली होती. 


श्रुतीला आता नोकरी सोडण्याशिवाय कुठलाच पर्याय दिसत नव्हता... त्या शिवाय तिला बेड रेस्ट मिळणार नव्हती... शेवटी श्रुतीने नोकरी सोडली... 


श्रुतीचे गरोदरपण आणि तिची डिलिव्हरी एकदम व्यवस्थित पार पडली... श्रुती तिच्या बाळाच्या बाललीलांमध्ये आणि बालसंगोपनात रमली होती... आता तिचा बाळ चांगला सात वर्षांचा झाला होता...


अमोलचे प्रमोशन झाल्यापासून श्रुती आणि अमोल दुसऱ्या शहरात जाऊन वसले होते. त्यामुळे तिचा जॉबचा विषय मागे पडला होता... नवीन शहरात श्रुतीला जॉबबद्दल योग्य माहिती मिळत नव्हती... 


आता श्रुतीचा बाळ व्यवस्थित शाळेत जाऊ लागला होता... आणि श्रुतीला भरपूर वेळ मिळायला लागला होता... तिला मात्र रिकामं डोकं काही स्वस्थ बसू देत नव्हतं... आणि घरी कुणीही काही तिच्या मनाविरुद्ध बोलले की प्रत्येक वेळेस ती त्याची तूलना तिच्या जॉब नसण्याशी करत होती..


अगदी कामवाली लावण्यापासून ते काही खरेदी करायची असेल तर त्यासाठी ती पूर्णपणे परावलंबी झाली होती... कळत नकळत हीच गोष्ट तिच्या मनाला कुठेतरी खटकत होती... कारण तिने आधी हे स्वातंत्र्य अनुभवलं होतं आणि आता तिला बऱ्याच गोष्टीत बंधने येत होती... आता सगळं असह्य झाल्याने ती घटस्फोट मागत होती... हे मात्र अमोलला काही समजत नव्हते...


अमोलला घटस्फोट घेण्याची एक टक्काही इच्छा नव्हती... पण श्रुतीच्या जिद्दीपुढे अमोलचे काही चालेना...


शेवटी अमोल आणि श्रुती घटस्फोट घेण्यासाठी म्हणून वकिलाला भेटायला गेले... नियमाप्रमाणे त्यांना समुपदेशनासाठी पाठवण्यात आले... त्यात त्यांना श्रुतीला जॉब नसल्याने ती परेशान असल्याचे कळाले... आणि जर तिला जॉब लागला तर ती नॉर्मल होईल याचा अंदाजदेखील आला...


नशिबाने त्याच वेळेस अमोलच्या ऑफिसमध्ये श्रुतीला योग्य असा जॉब मिळाला... आणि वातावरण पूर्ववत होऊ लागले... घटस्फोटाचा विषय कुठल्या कुठे अदृश्य झाला... 


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi story from Drama