The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

DrSujata Kute

Others

2.5  

DrSujata Kute

Others

त्या अंधाऱ्या रात्री

त्या अंधाऱ्या रात्री

3 mins
508


शर्वरीला आज ऑफिस मध्ये खूप काम होते.

शर्वरीच्या बॉसने काम पूर्ण झाल्याशिवाय घरी जायचे नाही जणू अशी तंबीच दिली होती....शर्वरीपण आढे वेढे घेऊ शकत नव्हती..

कारणच तसे होते... आईची तब्येत ठीक नाही म्हणून लगातार दोन दिवस शर्वरीने आधीच हाफ डे घेतले होते... आज मात्र तीचे काहीच कारण चालणार नव्हते.... 

जाऊ दे एकदाचे काम पूर्ण करू म्हणजे आपले बॉसही आपल्यावर नाराज होणार नाहीत... 

 कामाचा लोडही राहणार नाही....असा विचार करून शर्वरी कामात गर्क झाली... 

हुश्श !!संपले एकदाचे काम... असे म्हणत शर्वरीने घड्याळाकडे नजर फिरवली... बापरे !!हे काय अकरा वाजत आहेत आपल्याला लवकर जावं लागेल.... असा विचार करून शर्वरीने आपले सामान आवरले.... 

बॉसने मुख्य दरवाजाची चाबी लॉक करण्यासाठी दिली होती...

शर्वरीने ऑफिसचा मुख्य दरवाजा लॉक केला...

शर्वरी बाहेर रोडवर येऊन थांबली.... रस्त्यावर आता खूप कमी वर्दळ होती... अमावास्येची रात्र असल्याने पूर्ण पणे काळोख दिसत होता.... रस्त्यावरील दिवे चालू होते पण त्यांचा प्रकाशही धूसर वाटत होता..... 

शर्वरीने कॅब बुक करण्यासाठी तीचा फोन काढला.... अरे हे काय?? कामाच्या ओघात आपण फोनची चार्जिंग करायला विसरलो.... फोन डिस्चार्ज झाला... आता कॅब बुक कसं करणार.. असे म्हणत शर्वरी चिंताग्रस्त झाली... तिला काहीच मार्ग दिसेना... ती टॅक्सी किंवा रिक्षा दिसते का असा विचार करत इकडे तिकडे नजर फिरवू लागली.... 

तितक्यात एक ऑटोरिक्षा शर्वरीसमोर येऊन थांबला...शर्वरीला थोडं हायेसे वाटले... तिला रिक्षावाला थोडा विक्षिप्त वाटला... पण पर्याय नाही म्हणून ती ऑटो रिक्षा मध्ये बसली.... 


थोडं पुढे गेल्यावर अचानक त्याने रिक्षाची गती वाढवली.... आणि त्याने दिशा बदलली.... आता मात्र शर्वरीचे धाबे दणाणले... ती रिक्षावाल्याला विचारायला लागली... इकडून कुठून नेत आहात?? ... हा काही माझ्या घरी जाण्याचा रस्ता नाही... 

हा शॉर्ट कट आहे... असे म्हणत ऑटोवाल्याने अजून स्पीड वाढवली.... आणि थोडं निर्मनुष्य भागात गेल्यावर त्याने त्याचा ऑटो थांबवला... 


शर्वरी आता नुसती घामाघूम झाली होती... फोन चार्जिंग विसरल्याने ती स्वतःलाच मनामध्ये शिव्या देत होती.... 


आता इथून पळून जाण्याशिवाय काही पर्याय नाही असे विचार करत शर्वरीने रिक्षातुन उडी टाकली तितक्याच शिताफीने त्या ऑटोवाल्याने शर्वरीचा हात पकडला... आणि स्वतः जवळ असलेल्या चाकूचा धाक दाखवू लागला..... 

शर्वरी जाम घाबरली... माझ्याकडचे सगळे पैसे, सोन्याचे कानातले, सोन्याची चैन घ्या.. पण मला सोडा अशी विनवणी त्या ऑटोवाल्याला करायला लागली.... 

तूला काय सोडायला इथे आणले का मी?? रागाने लालबुंद चेहरा करत आणि हव्यासी चेहरा करत तो शर्वरीकडे बघू लागला... 

शर्वरीला त्याने खसकन जवळ ओढले... शर्वरी जोऱ्याने चिरकली....

 दुसऱ्याच क्षणाला त्याच्या हातातील चाकूची पकड अचानक ढिल्ली झाली.... त्याच्या हातातील चाकू निसटून खाली पडला.... रिक्षावाला घामाघूम झाला... 

शर्वरीने मागे वळून बघितले तर तिच्यामागे एक सुंदर दिसणारी नाजूक अशी स्त्री होती... 

ती स्त्री त्या ऑटोवाल्याला म्हणाली.... खबरदार ! जर हिच्या केसालाजरी धक्का लावला तर.... माझ्याशी गाठ आहे.. शर्वरी आश्चर्याने त्या स्त्रीकडे बघायला लागली.... ती सुंदर आणि नाजूक होती... तीचा आवाज देखील तितकासा भारदस्त वाटत नव्हता तरी देखील तो रिक्षावाला त्या स्त्रीला घाबरला होता...तो पळून जाऊ पहात होता...तितक्यात त्या स्त्रीने त्याला अडवले..... 

आणि शर्वरीला म्हणाली... तू काळजी करू नकोस... मी तूझ्या सोबत येते... हा ऑटोवाला तूला काही करू शकणार नाही... 

त्या स्त्रीने ऑटोवाल्याला ड्रायविंग सीटवर बसायला सांगून ती स्त्री आणि शर्वरी ऑटो मध्ये बसल्या... खरं तर शर्वरी खूप गोंधळलेल्या अवस्थेत होती... त्या अनोळखी स्त्री वर कितपत विश्वास ठेवावा हे देखील तीला समजत नव्हतं... पण पर्याय नसल्याने पुन्हा एकदा शर्वरी त्या स्त्री सोबतच ऑटो मध्ये बसली होती.. पण ऑटोमध्ये बसल्यावर ती स्त्री एक अवाक्षरही बोलली नाही... शर्वरीपण गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर आली नव्हती... 


ऑटो शर्वरीच्या घराजवळ येऊन थांबला... शर्वरी ऑटोतून उतरली... आणि त्या स्त्रीला धन्यवाद म्हणण्यासाठी पुन्हा ऑटो मध्ये बघू लागली तर ती स्त्री तिला दिसलीच नाही... मग ऑटो वाल्याचे पैसे द्यायला लागली तर ऑटोवाला म्हणतो कसा....बाई तूम्ही लवकर घरी जा.... पैसे देऊ नका मला... 

शर्वरी पुन्हा गोंधळली... ती बाई कुठे गेली.. इथेच राहते का?? असे विचारायला लागली... 


तेव्हा तो ऑटोवाला म्हणाला... ती आमच्या कॉलोनीतील मंजुळा होती... सहा महिन्यापूर्वीच तीचा एका माणसाने बलात्कार करून तिला मारण्यात आले होते आणि तिच्या अंतिमसंस्काराला मी देखील हजर होतो.... आता जातो बाई अन मला माफ करा असे म्हणून ऑटोवाला तिथून निघून गेला... 

म्हणजे?? आपल्याला भूत भेटलं !विचाराने तिला धस्स झालं. पायाखालची जमीन सरकली... आता तीला ऑटो वाला घाबरल्याचे कारण समजले होते... पण हे भूत त्यामुळेच तर आपण वाचलो...शर्वरी त्या स्त्री भुताला मनापासून धन्यवाद म्हणायला लागली.... 


टीप : ही कथा निव्वळ मनोरंजनासाठी असून वास्तविक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही. 


कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा.. Rate this content
Log in