DrSujata Kute

Others

1.3  

DrSujata Kute

Others

विधवा.. आणि प्रेझेंटेबल

विधवा.. आणि प्रेझेंटेबल

3 mins
1.1K


अंजली खूप दुःखी होती. तीचे अवसान गळून गेलेले होते कारण अंजलीला वयाच्या पंचविशीत नुकतेच वैधव्य आले होते.तिच्या नवऱ्याचं नुकतंच हार्ट अटॅक ने निधन झालं होतं. तिला एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळे अपत्य होते. आता तिलाच त्यांना पोसावे लागणार होते. 

अंजली तशी बी ई झालेली होती. पण जुळ्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी तीने स्वतः जॉब पेक्षा घरीच राहण्यासाठी महत्व दिले होते. 

अंजली पूर्णपणे तिच्या नवऱ्यावर अवलंबून होती. आता मात्र अंजलीला घराबाहेर पडावेच लागणार होते.आता तीचे मुलं थोडे मोठे झाले होते... त्यामुळे आता घराबाहेर पडणं तिला शक्य होणार होतं.. 

अंजली आणि तीचा नवरा दोघेही एकाच आयटी क्षेत्रातील असल्यामुळे तिच्या नवऱ्याच्या जागी अंजलीचा एक नॉमिनल इंटरव्यूव्ह घेऊन तिला ती नौकरी दिली गेली होती. 

आता हळू हळू अंजली रुळत होती... तिला अगदीच लहानपणापासून प्रेझेंटेबल राहण्याची सवय होती.. अगदी नखशिखांत तीचा पेहराव... तीचा मेकअप.. मॅचिंग सायंडल, मॅचिंग पर्स असंच ती राहत असे. 

आता नवीन नौकरीला रुजू झाल्यापासून ती मात्र प्रेझेंटेबल राहत नव्हती... लोक काय म्हणतील याची तिला अनामिक भीती होती.. त्यामुळे ती एकदम गबाळ्यासारखी राहत असे... 

एके दिवशी अंजलीच्या ऑफिसमध्ये अनाऊन्स केले की एका मोठया कंपनीचे सी ई ओ भेट देणार आहेत... त्या मुळे सगळ्याच एमप्लॉयीने एकदम व्यवस्थित प्रेझेंटेबल राहायचे आहे.. त्यांना काळा शर्ट, पॅन्ट आणि वरून ब्लेझर असा पेहराव आणि त्याला साजेसा हलका मेकअप करायला सांगितला.... 

दुसऱ्या दिवशी अंजली छान तयार झाली.. जसा ड्रेस कोड ठरला होता त्याप्रमाणे आणि त्यावर सूट होईल असा साजेशा मेक अप केला... अंजली अगदीच सुंदर दिसायला लागली.. तीचे जुळे लेकरं देखील तिला आई तू किती छान दिसत आहेस... तू अशीच नेहमी राहत जा म्हणून बिलगायला लागले... 


अंजली ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडली... तिला पाहून आजूबाजूच्या स्त्रिया कुजबुजायला लागल्या... किती कमी दिवस झाले हिच्या नवऱ्याला मरून.. आणि पहा कशी दिमाखात मिरवते आहे... तिला काहीच दुःख नाही वाटते... आणि इतकं तयार तरी कुणासाठी होते कुणास ठाऊक... ड्रेस तर ड्रेस मेक अप पण केलाय... 


अंजलीला सगळ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांचा टॉन्टिंग चा अंदाजा होता... तिने त्या कडे काना डोळा केला... पण काही स्त्रिया तिला समोरासमोर येऊन बोलायला लागल्या... म्हणायला लागल्या की तू विधवा आहेस तूला असे तयार होने बरोबर नाही... तुझ्यावर तूझ्या आई वडिलांनी काही संस्कार केले नाही का? 

आता मात्र अंजलीला या सगळ्या बायकांचा खूप राग आला... कारण तिच्या आई वडिलांवर आणि तिच्यावर झालेल्या संस्कारावर बोट ठेवले गेले होते.... 

 अंजली त्या बायकांना बोलायला लागली... माझा नवरा हार्ट अटॅकने गेला त्यात माझा, माझ्या आई वडिलांचा काय दोष... मला माझ्या मुलांसाठी घराबाहेर पडावे लागले त्यात माझा दोष आहे का? माझे राहणीमान चांगले असले म्हणून काय मी व्याभीचारी ठरते का? तूम्ही नक्की या इंटरनेटच्या आणि विज्ञानाच्या युगात वावरत आहात ना?? मग सती प्रथा आणि केशवपन प्रथा कसकाय बंद झाल्या.. मी कपाळावर टिकली लावल्याने इतका काय फरक पडतोय.. 

मी कुणासाठी नाही प्रेझेंटेबल राहत... मी लग्नाच्या आधी देखील अशीच राहायचे... मी स्वतः साठी प्रेझेंटेबल राहाते... मला अश्या राहणीमानाची सवयच आहे आणि मी स्वतः साठी चांगलं राहिलं तर यात बिघडलं कुठे?? 

माझ्या नातेवाईकांमध्ये तर मला विधवा म्हणून वेगळी वागणूक दिली जात नाही... उलट माझ्याशिवाय कुठला समारंभ साजरा होत नाही.. माझ्या हाताने कुठल्याही औक्षणाची सुरुवात होते.. माझ्या नातेवाईकांना तर हे कधीच समजले... तुम्हाला कधी समजणार?? 


लेख आवडल्यास like करा, share करायचा असल्यास नावासहित share करा. 



Rate this content
Log in