Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

DrSujata Kute

Others


2  

DrSujata Kute

Others


स्वातंत्र्य म्हणजे??

स्वातंत्र्य म्हणजे??

4 mins 471 4 mins 471

आज मितालीने थ्रिल अनुभवायचे ठरवले होते.....

सर्व मित्रमैत्रिणींसोबत पब आणि डिस्क मध्ये तिला night out करायचं होतं...

 मितालीचे मित्र मैत्रिणी नेहमीच या पब मध्ये जात असत... विविध प्रकारची ड्रिंक्स घेण्याचा प्रयत्न करत....वेगवेगळे प्रकार घेऊन बघत.... रात्रभर घराबाहेर राहत... आणि घरी काहीतरी सबमिशन करण्याचे कारण सांगून किंवा एखाद्या मित्र मैत्रिणीच्या घरी रात्रभर अभ्यास करू असे कारण सांगत असे .... 

धनाड्य आईबापाचे लेकरं... आईवडील आपले मुलं काय करतात याचा शहानिशा देखील करत नसत... त्यांना वाटे हे वयच आहे मजा करण्याचं आणि हुंडारण्याचं...

 त्यांच्या आईवडिलांना देखील स्वतःचं खूप कौतुक वाटत असे की आपण आपल्या मुलाला भरपूर स्वातंत्र्य दिलंय..त्यांना मागितलं ते देतो... त्यांना कश्याची कमी देखील पडू देत नाही... 

मिताली एका खेडेगावातून आलेली मुलगी होती...ती गावात असताना कधी मुलांशी बोलायची देखील नाही... त्यांच्यासोबत फिरणं तर दूरच....

 तेच उलट वातावरण तीला शहरात दिसलं होतं.... सर्वजण मुले असो वा मूली एकत्र राहत असे.... 

मिताली सुरुवातीला कुणामध्ये मिसळत नसे तर तीला गावंढळ आणि बहेनजी म्हणून सगळे मित्र मैत्रिणी चिडवत असे... 

मितालीला सगळे गावंढळ म्हणत असल्याने खूप राग येत असे..मितालीला सगळ्यांना ती गावंढळ नाही हे दाखवून द्यायचे होते...  तिला ते proove करण्यासाठी पब मध्ये जाणे योग्य वाटत होते.... मनातून मिताली खूप घाबरत होती...पण मितालीला ती बहेनजी नाही हे दाखवून द्यायचे होते.... 

घाबरत घाबरतच काही मैत्रिणींसोबत मितालीने पब मध्ये प्रवेश केला... तिला कसलातरी कोंदट वास त्या पब मध्ये येत होता... तिथून पळून जावेसे वाटत होते... पण पळून जाण्याने ती अजून बहेनजी ठरली असती म्हणून ती तिथेच थांबली.... 

मग मैत्रिणींसोबत तीने ड्रिंक्स घ्यायला सुरवात केली .... नाक मुरडले पण मैत्रिणींसमोर तीने ते दाखवले नाही... 

थोडया वेळाने मिताली त्या वातावरणात रुळायला लागली.... रात्रभर त्यांची मस्ती चालू होती.... नृत्य चालू होते... मितालीच्या अंगात एक वेगळा उत्साह संचारला होता.. 

सकाळी सकाळी मात्र मिताली एकदम बेशुद्ध झाली .... नंतर काय झाले हे तिला कळलेच नाही.... 

सकाळी उठून बघते तर मिताली हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती ... तिला रात्री काय घडले काहीच आठवत नव्हतं... उठतानाही मितालीचं शरीर खूप दुखत होतं...  

हे काय तिच्या आजूबाजूला तिला तीचे आईवडील दिसले.... आता मात्र मितालीची भीतीने गाळण उडाली होती.... मितालीला तिच्या आईवडिलांना तोंड दाखवायला जागा उरली नव्हती... आईला पाहून मिताली रडायला लागली... वडील तर एकदम रागातच मितालीकडे बघत होते असे मितालीला वाटत होते .... 

मितालीला वाटले आता आपले काही खरे नाही... आपले शिक्षण आता बंद होणार.... 

पण झाले उलटेच.... मितालीचे आईवडील तिच्या जवळ आले... आणि तीचे वडील तिला म्हणाले बेटा तूला का ड्रिंक्स करावेसे वाटले?? .... आम्ही काही कमी केले आहे का??... किंवा तुझी काही रॅगिंग वगैरे झाली का? तूला कुणी ड्रिंक्स साठी जबरदस्ती केली का?? 

बाबाचा असा प्रेमाचा साद पाहून मिताली तिच्या बाबांना बिलगली.... खूप रडायला लागली... म्हणायला लागली i am sorry बाबा मी पून्हा असे करणार नाही... 

पण काय करू मी?? असं सगळ्या मैत्रिणींपासून वेगळी राहायचे तर मला सगळेजण बहेनजी म्हणायचे... मला म्हणायचे तू काही फ्री नाहीस... तूझे आईवडील फार जुनाट विचारांचे आहे... तूझ्या घरचे पण फ्री वाटत नाही... 

मग मला सगळ्यांसोबत राहण्यासाठी सगळ्यांसोबत पब मध्ये जाणे योग्य वाटले... पण मला असा काही त्रास होईल याचा अंदाजा देखील नव्हता... आताही मला खूप मळमळ करत आहे... 

ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर एकंदर मितालीच्या मनात होणारी घालमेल मितालीच्या आईवडिलांना कळाली... आता मितालीची आई बोलायला लागली... तीला विचारले बेटा फ्री असणे म्हणजे नेमकं काय आहे असे तूला वाटते?? 

मिताली म्हणाली फ्री असणे म्हणजे आपल्या मनाला वाटेल तसे वागणे, तोकडे कपडे घालने...मुलामुलींनी एकत्र वावरणे बस्स इतकंच... 

त्यावर मितालीची आई म्हणाली बेटा तू जे म्हणत आहेस ते एकदम चुकीचे नाही पण याला तू थोडं समजून घे. म्हणजे यापुढे तू कधी अशी चुकणार नाहीस....

मितालीची आई बोलायला लागली.... बेटा स्वातंत्र्य म्हणजे विचारांचे स्वातंत्र्य... जे की आपल्या घरामध्ये सर्वांनाच आहे... मला जिथे पाहिजे तिथे मी जाऊ शकते... मला कुणी विरोध करत नाही... तूच बघ ना तूला इथे शिकायचे होते तूला त्यासाठी एकदा तरी घरून विरोध झाला का?? 

बेटा आपल्या पेहरावाने आपलं वरवरचं रूप दिसेल.... पण जर पाश्चात्य कपडे किंवा कुठलेही कपडे घालून आपली विचारसरणीच बुरसटलेली असेल तर त्याला अर्थ नसतो.. स्वातंत्र्य म्हणजे मर्यादा तोडणं नव्हे... स्वातंत्र्य म्हणजे मर्यादा समजून घेऊन योग्य दिशेने पाऊल उचलणे होय... बेटा स्वातंत्र्य म्हणजे व्याभिचार नव्हे... स्वातंत्र्य म्हणजे नवीन आणि योग्य विचार...ताणविरहित जीवन म्हणजे जगण्याचे स्वातंत्र्य...निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य.... बघ आपल्या घरातील एखादा मोठा निर्णय घायचा तर तूझे बाबा माझे मत घेतात ना... ह्याला म्हणतात स्वातंत्र्य... 

हे ड्रिंक्स वगैरे आपल्या शरीराला अपायकारक आहेत... ते घेणं म्हणजे स्वतःचं नुकसान करने.. हे घेणे म्हणजे अगदी तू मॉडर्न आहेस असा त्याचा अर्थ होत नाही... मॉडर्न आपले विचार असले पाहीजे....कुठलीही अंधश्रद्धा त्यात नसली पाहीजे... आपल्या शरीरासाठी अपायकारक असणाऱ्या चालीरीती नसल्या पाहीजेत... हे ज्या दिवशी तूला समजेल त्या दिवशी तू अश्या कुठल्याही प्रलोभनास बळी पडणार नाही.... 

त्यावर मिताली म्हणाली हो आई मला पटले आहे तू काय म्हणतेस ते... मी आता कधीच चुकीचे पाऊल उचलणार नाही आणि असं काही वाटलं तर आधी तुमच्याशी बोलेल... 

मला तर पटले मितालीच्या आईचे म्हणणे तुम्हाला जर पटले असेल तर like करा आणि share करायचा असल्यास नावासहित share करा. 


Rate this content
Log in