# कामवाली बाई...
# कामवाली बाई...
शामल ही घरोघरी जाऊन काम करणारी इमानदार बाई होती. नवऱ्याचं पाठबळ कमीच.कारण नवरा व्यसनाच्या आहारी गेला होता. दोन पोरांच शिक्षण इतर खर्चासाठी स्वतः काम करत होती. शिक्षनाच्या अभावामुळे हे काम करण्याशिवाय शामलला दुसरा कोणता मार्गही नव्हता. परिस्थिणे तिला खूप शिकवले होतें.त्यातूनही मुलांसाठी ती खंबीर राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असे.
सकाळी ती घरातुन काम करून सात वाजता कामासाठी बाहेर पडत. सात आठ घरचं तिला स्वयंपाक, धुणं, भांडी याच काम होतं .देशपांडे काकूंचे कुटुंब एकत्रित होतं. त्या एकत्रित कुटुंबात शामलला ही कुटुंबातील एक व्यक्ती अशीच वागणूक मिळे. शामलने तेवढं सर्वांच मन ही जिंकलं होतं.काकूच्या घरी शामलला काम करून खूप वर्ष झाले होतें. देशपांडेच्या घरी नवीन सून येऊन वर्ष होतं आले होतें . प्रियाला मात्र शामलबद्दल खुप अशी ओळख नव्हती.
" प्रिया आज सकाळपासून काहीतरी शोधत होती, पण ती वस्तू तिला सापडत नव्हती. कपाट, ड्रॉवर, पर्स सगळीकडे तिने शोधले.शेवटी हाती काही लागलं नाही. काल दिवसभरही ती मोत्याचा हार शोधतच होती.
ती खूप घाबरून गेली होती,कारण पिढ्यानंपिढया चालत आलेला मोत्यांचा हार तिच्याकडून हरवला होता. तिच्या आज्जसासुनी किती विश्वासाने तिला तो लग्नकार्यासाठी सोपवला होता. ही बातमी घरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. सगळे तिला धीर देत होतें. घाबरू नकोस..."आम्ही शोधतो....म्हणत होतें.
" तेवढ्यात सापडेल असेल इथेच कोठेतरी सासूबाई म्हणाल्या...! सगळे घरातील मेंबर तिचा हार शोधन्यात व्यस्त होतें. प्रिया आता रडकुंडीला आली, कारण तिला आठवत होतं की, " लग्नावरून आलं की हार बेडरूममधील असणाऱ्या टेबलवर ठेवला होता.तोपर्यंत दारावरची कढी वाजली, सगळ्यांचे लक्ष दाराकडे वळाले. शामल दारात उभी होती. पंधरा वर्ष ती त्या घरात काम करत होती. त्यामुळे घरातील विश्वासू मेंबर होती.
प्रियाला राहून राहून मात्र शामलवर संशय येत होता. प्रिया मनातून विचारच करत होती, " सगळीकडे शोधून सापडत नाही, " हिने तर घेतला नसेल ना....?"प्रियाने शामलला बोलून ही दाखवलं. शामलला प्रियाचं बोलणं खूप खटकलं. शामलचा तिच्यामुळे स्वाभिमान दुखावला गेला. सासूबाई आणि आज्जसासूला पण प्रियाचं बोलणं खटकलं. कारण शामलला त्या पंधरा वर्ष ओळखत होत्या. शामल किती स्वाभिमानी आणि इमानदार आहे हेही जाणत होत्या.शामलला मात्र खूप वाईट वाटत होतं. असं कोणीतरी अनपेक्षित बोलणं चोरीचा आळ घेणं तिला खूप खटकलं . माझ्याच नशिबी का असं ...?? नशिबाला कोसत शामल रडतच घरातील काम आवरत होती.
प्रिया बेडरूममध्ये विचार करतच बसली होती. तोपर्यंत शामल तिथे झाडू घेऊन आली,आणि बेडरूममध्ये झाडू मारू लागली. कपाटाखालून झाडू मारताना झाडूला काहीतरी लागलं, म्हणून शामलने पुन्हा एकदा झाडू फिरवला तर मोत्यांचा हार झाडूला लागून बाहेर आला. प्रियानेही चमकूनच पाहिले. सगळं घर शोधून पाहिलं आणि हार कपाटाखाली पाहून तिला आश्चर्यच वाटलं.शामल हार हातात घेऊन प्रियाकडे घेऊन आली. तिच्या हातात हार देऊन म्हणाली, "ताई हा घ्या तुमचा हार...कपाटाखाली पडला होता. प्रियाने हार हातात घेतला. तिला आनंद वाटला पण शामलला बोलण्याचा तिला पच्छाताप होतं होता. ती मनातून खूप खजील झाली.सासूबाई आणि आज्जसासूबाईंनाही प्रियाचा राग होताच.
शामलने काम सगळं आवरलं, स्वयंपाक आवरून ती चालली होती, सासूबाईंनी आज्जसासूबाईंनी तिची माफी मागितली. मनाला लागून नकोस तीही नवीनच या घरची...झालं गेलं विसरून जा पोरी असं आज्जसासूबाई म्हणाल्या...!"
"शामल माफ करा आजी मला.... पण मी उद्यापासून कामाला येणार नाही, तुम्ही दुसरी कोणीतरी कामवाली पहा. मी गरीब आहे पण स्वाभिमानी आहे, आणि लाचार म्हणून जगणे हे माझ्या तत्वात बसत नाही. आतापर्यंत तुम्ही खूप माझ्यावर प्रेम केलत. परकेपणाची कधीच जाणीव होऊन दिली नाही,पण इथून पुढे मी येऊ नाही शकत.
आज्जसासूबाई, सासूबाईंचे डोळे भरून आले होतें. त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्यांना माहित होतं ती जरी गरीब असली तरी, "ती स्वाभिमानी स्त्री आहे....! कथेचं तात्पर्य सांगण्याचं की कोणावरही कोणतेही आरोप करण्याआधी आधी दहा वेळा विचार केला पाहिजे. बोलणारा बोलून जातो, पण काळजावर घाव खाणारा कधीही विसरत नाही.
कथा काल्पनिक असून आवडल्यास लाईक, शेयर नक्की करा.
