काळी जादू
काळी जादू


रात्रीची स्मशान शांतता...स्मशानच होतं ते, त्यामुळे तिथे खरी खुरी स्मशान शांतता होती. गाव संपलं की शेतजमीन लागत होती. तिच्या मधोमध बैलगाडीचा दांड..आणि काही अंतरावर एक डोंगर. डोंगराच्या पायथ्याशी वडाचं भलं मोठं झाड..झाडाला मोठ मोठ्या पारंब्या... आणि त्या झाडा लगत हे स्मशान. वाऱ्यानं एक दोन पारंब्या हलल्या तरी भयानक वाटायचं. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा शेवटचा दिवस होता तो. संध्याकाळी काळ्या काळ्या ढगांनी गर्दी केली होती. पावसाच्या आगमानाचं वातावरण होतं. आता रात्रीचे साडेबारा... वाऱ्याचं घोंगावणं वाढत चाललं होतं. पाऊस कोणत्याही क्षणी कोसळेल असं वाटत होतं. वडाच्या साऱ्याचपारंब्या हेलकावे घेत होत्या. कोणती तरी अज्ञात शक्ती त्या पारंब्यावर झोके घेत आहे की काय असं भासत होतं. त्या निर्मनुष्य ठिकाणी कुणाची तरी हाल चाल सुरु होती. एक स्त्री सदृश्य आकृती काळ्या कपड्यात तिथे वावरत होती. तिचे कमरेपर्यंत रुळणारे केस हवेवर अस्ताव्यस्त उडत होते. स्मशानाच्या जवळच एका बालकाचं सकाळीच पुरलेलं प्रेत...जंगली प्राण्यांनी उकरून काढू नये म्हणून त्यावर काटे-कुटे आणि भले मोठे दगड ठेवलेले. ते काटे- कुटे दूर फेकले गेले. दगड दूर ढकलले गेले.... आणि त्या बालकाचे कपड्यात गुंडाळलेले शव मातीतून बाहेर खेचले गेले... एखाद्या हिंस्त्र श्वापदा सारख्या हालचाली होत्या त्या... आणि गुरगुरणंही तसंच होतं. पुढचं दृश्य अतिशय किळसवाणं होतं...त्या स्त्रीने शवावर चावे मारून मास खायला सुरुवात केली. तिचं तोंड रक्तानं माखू लागलं. काही मिनिटांनी ती मुख्य स्मशानावर आली...ते काळे वस्त्रही तिने उतरवले...स्मशानातली राख अंगाला फासली....कापराच्या वड्या पेटवून ती मांडी घालून दक्षिणदिशेला तोंड करून निर्वस्त्र बसली आणि तिने मंत्रोच्चार सुरु केला...कुठल्या तरी अमानवीय शक्तीला ते आवाहन होतं....वातावरण अजून गंभीर आणि भयानक बनू लागलं....विजांचा कडकडाट सुरु झाला..पाऊस कोसळू लागला...तिने डोळे मिटले आणि त्याच क्षणी ते घडलं....तिची मान धडापासून वेगळी झाली... रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या....पावसाचं पाणी लाल लाल झालं....
सकाळी जगन डोंगराखालून बकऱ्या चरायला घेऊन चालला होता. स्मशानाजवळून पाय वाटेनं जाता जाता त्याचं सहज लक्ष गेलं. स्मशानावर कुणीतरी पडलेलं वाटलं. त्याने जरा जवळ जाऊन पाहिलं तर तो चक्कर येऊन पडता पडता वाचला. मुंडकं नसलेल्या निर्वस्त्र बाईचं धड पाहून तो भीतीने थरथरत घराच्या दिशेने धावत सुटला. घरी येऊन घराच्या दारापाशीचखाली कोसळला. घरातून कुणीतरी पाण्याचा तांब्या आणून त्याच्या तोंडावर पाणी मारलं..तोखाली बसून थरथरत होता... त्याच्या सर्वांगाला कापरं भरलं होतं.
"काय झालं , जगन...?" कुणीतरी विचारलं. बराच वेळ "त त प प" करत शेवटी त्याच्या तोंडून शब्द फुटले..."स्मशानात...बाईचं प्रेत...""अरे मग त्यात काय एवढं..? समशानात प्रेतच असणार ना...?"
"नाही...स्मशानात मुंडकं छाटलेलं बाईचं धड आहे"
दोघे-चौघे हिम्मत करून स्मशानाच्या दिशेने धावलेत्यांचाही ते धड बघून थरकाप उडाला. मग
कुणीतरी पोलिसांना कळवलं. पोलीस आले. मुंडकंनसल्याने ओळख पटत नव्हती. ते धड शवाग्रहात हलवलं गेलं.
दोन दिवसानंतर कळलं, कमला देवी नावाची एक तांत्रिक बाई बेपत्ता आहे. तिच्या पतीने पोलिसांत येऊन तक्रार दिली होती. चौकशी अंती ती एक धिप्पाड, जाडजूड बांध्याची
आणि काळ्याकुट्ट शरीराची महिला होती असे कळले. ते धडही त्याच वर्णनाशी मिळते जुळते होते. पोलिसांनी तिच्या पतीला ओळख पटवण्यासाठी नेले. तिच्या पायातील पैंजणे आणि जोडव्यांवरून त्याने लगेच ओळखले.
आता पोलिसांची चक्रे वेगाने फिरू लागली. गेल्या आठवड्यापासून तिच्या संपर्कातील
सर्वांची कसून चौकशी करण्यात आली.
त्यात काही धागे दोरे हाती लागले नाहीत
म्हणून पोलीस निरीक्षक मोहितेंनी पुन्हा
तिच्या पतीला चौकशी साठी बोलावले.
"मुझे कमला देवी के बारेमे पुरी जानकारी चाहिये..." त्याच्या डोळ्यांत रोखून पाहात
मोहिते म्हणाले.
"बताता हू साहब... साहब हम बिहार के रहनेवाले है। कमला बहुतही महत्वाकांक्षी औरत थी। मै उसका पती तो था, पर घर मे उसकीही
चलती थी।वह हमेशा अघोरीयोंकी तपस्या के बारेमे, तंत्र-मंत्र की किताबे पढती थी। अघोर विद्या से सिद्धी प्राप्त करके उससे
प्रेतात्माओंको वश मे करके लोगोंसे पैसा कमानेका उसका उद्दिष्ट था।इसके लिये वह दोतीन साल असम मे कामाख्या पीठ स्मशान मे जाके कुछ साधुओंके साथरहती थी पर अघोर विद्याका इस तरह पैसा कमाने के लिये इस्तमाल करनेका उसका मकसद वहांके साधुओंकी समझ मे आया। उन्होने उसे आगे का ज्ञान देना बंद कर दिया और उसको निकाल दिया। उसके बाद वह मेरे साथ यहा पे आ गयी।यहा आनेके बाद भी उसने कुछ पुस्तको द्वारा सिद्धीया प्राप्तकरने के लीये साधना शुरु की थी। वह मंत्र तंत्र का पठन करती थी। लोगोंके भूत उतारना, पनौती से पिछा छुडाना, बिमारीयों को दूर करना, धनलाभ के लिये तावीज देना ऐसे काम कर रही थी। अच्छा पैसा कमा रही थी। पर यह सब झूट था।दर असल कभी कभी इत्तफाकसे कुछ चीजे ठीक हो जाती थी।कुछ चीजे लोगोंकी मानसिकता से ठीक हो जाती थी जीसमे वह सफल हो जाती थी उसका बोलबाला हो जाता था। कभी कभी वह खुद इस भ्रममे रहती थी कि उसके मंत्र तंत्रसे सब ठीक होता है, तो कभी कभी वह जान बुझुकर लोगों को फसाती थी।मुझे यह सब ठीक नही लग रहा था। लोगोंको फसाकर पैसा कमाना अच्छा नही लग रहा था।पर मै कुछ कामधाम नही करता था, इसलीये वह जो काम कर रही थी उसे मै रोक नही
सकता था।"
"गेल्या काही दिवसात तिचे कुणाशी भांडण वगैरे झाले होते..?" मोहितें नी मधेच प्रश्न
केला.
"नही साब, किसीसे झगडा नही था, लेकिन एक सुरज नामका.. " बोलता बोलता तो थांबला.
"बोल बोल, सुरज कोण आहे ?"
"नही नही साब .. मैने गलतीसे नाम लिया.. " तो गोंधळला. मोहितेंनी रागीट नजरेने त्याच्याकडे पाहीले.
"तू नीट सांगणार आहेस का? मला या मर्डर मध्ये तुझाच हात दिसतोय.. नीट बोल नाही तर तुला थर्ड डिग्री दाखवतो !"
"नही साब, मेरा कुछ हात नही ... "
"तो फिर सुरज कौन है?"
"साब वो ऊस दिन गुस्सा हो के गया था..मेरी बीबीसे कह रहा था कि, उसका मंत्र तंत्र सब झूठ है, वह उसे मार देगा"
"लेकिन क्यू?"
"मुझे नही मालूम साब ... मेरी बीबी के मंत्र
तंत्र के मामले से मै दूर ही रहता था, वह जो कहती थी, मै उतना ही करता था . "
"ठीक है, उसका पता बता दे" पोलीस निरीक्षक मोहितेंना आता आपल्याला काहीतरी
माहिती नक्कीच मिळेल अशी खात्री वाटू
लागली. त्यांनी त्याचा पत्ता लिहून घेतला
आणि एका हवालदाराला त्याला घेऊन
यायला सांगितले.
"बोलो साहब.. " अर्ध्या तासातच सुरज त्यांच्या समोर उभा होता. वय साधारण पन्नासच्या आसपास. वर्ण सावळा आणि अंगकाठीअशी की त्याला पाहता क्षणीच हा काय कमला
देवीला मारणार ? असा विचार
पोलीसनिरीक्षक मोहितेंच्या मनात आला. पणज्या ज्या लोकांवर संशय आहे त्यांची कुठल्या ही पूर्वग्रहाशिवाय कसून चौकशी करायची हीपोलीस निरीक्षक मोहितेंच्या कामाची पद्धत होती. त्यांनी सरळ सुरजच्या मानगुटीला
पकडले.
"बोल सालेsss ! क्यो मारा उसे?"
अचानक पणे पोलीस निरीक्षक मोहितेंच्या आक्रमक पावित्र्याने सुरज घाबरला. पण पोलीसनिरीक्षक मोहितेंकडे केविलवाण्या नजरेने
पाहात तो म्हणाला, "साहब मैने किसको मारा?"
"तुझे पता है ना, कमला देवी का मर्डर हुवा है .."
"क्या?" सुरजने चक्रावून उलट प्रश्न केला.
"सुरज, कमला देवीकी गला काटकर हत्या की गई है.. "
"अरे बाप! लेकिन साब जिसने भी किया
बहोत अच्छा किया!"
"इसका मतलब यह काम तुने ही किया है ! सब सीधी तरह बता रहे हो या ss "
"साब यह बात सच है के मैने उसे धमकी दि थी, मगर यह खून मैने नही किया ..."
सुरजने घडलेली हकीकत सांगायला सुरुवात केली.
साहब मै गरीबीसे तंग आ चुका था।किसीने मुझे कमला देवी के बारे मे बता दिया कहा की वह पैसे की बारिश का प्रयोग करती है। मैं उसके दरबार मे गया।उसने कहा की उसे कई सिद्धिंया प्राप्त है।उसने एक महिने के अंदर पैसोकी बारीश का प्रयोग करके मेरी गरीबी दूर करनेका विश्वास दिलाया।मगर उसने इस प्रयोग के लिये सोनेकी मांग की। कहा की यज्ञमे सोना डालना पडता हैं।मैने उसके बहकावे मे आके बीबीके सारे गहनेउसे दे दिये। पिछले छह महिनोसे उसने तीन बार यज्ञ किये पर कुछ हासील नही हुवा। तब मुझे पता चला की उसने मुझे फसाया है। मैने मेरे गहने वापस मांगे तो वह इन्कार करने लगी।कहने लगी सभी गहने यज्ञ मे भस्म हो गये। इसलिए मै उस दिन उसे धमकी देकर चला
गया, की अगर मेरे गहने वापस नही मिले तो मै उसे छोडूंगा नही,मेरे जैसे कई लोगोंको वह ठग चुकी है, साहब!"
पोलिस निरीक्षक मोहितेला त्याच्या बोलण्याततथ्य वाटले. "ठीक है, तुम अभी जा सकते हो, कुछ जरुरत पडेगी तो फिरसे बुलायेंगे"
"जी साहब.." मान हलवत सुरज म्हणाला, आणि निघून गेला.
"आप भी जा सकते हो ..."
कमलाच्या नवऱ्याकडे पाहात मोहिते म्हणाले त्यानेही मान हलवली.
"एक मिनट" तो निघत असतांना मोहितेंनी त्याला अडवलं. "सुनो, सुरज के गहने ढुंढके निकालो. उसे
सारे गहने वापस करने है, समझे?"
"जी साहब.." त्याने मान हलवली आणि तो ही निघून गेला.
मोहिते साहेबांनी सिगारेट सुलगावली आणि धुरांच्या वलयांकडे पाहात ते विचारात गढून गेले. पुन्हा त्यांची विचारचक्रे फिरू लागली.
मोहिते साहेबांच्या आदेशावरून दुसऱ्या
दिवशी स्मशानाच्या आजूबाचा परिसर
पोलिसांनी पुन्हा एकदा पिंजून काढला. त्यातकाहीतरी असे सापडले ज्याने त्यांना तपासाची दिशाच बदलावी लागली.
कमलादेवीच्या पतीने मोहिते साहेबांजवळ
दागिन्यांचे एक बोचकेच आणून दिले. "साहब, यह सब गहने है। मुझे इनकी जरुरत नही। जिनके है उन्हे आप लौटा सकते है। सुरज के गहने भी इसीमे है।"
काही मिनिटांतच सुरज मोहिते साहेबांच्या केबिन मध्ये त्यांच्या समोर उभा होता. त्याने
सांगितलेल्या वर्णनाचे दागिने मोहिते साहेबांसोबत असलेल्या कॉन्स्टेबलने दागिन्यांच्या
गाठोड्या मधून शोधून काढले. मोहिते साहेबांनी ते सुरजच्या ताब्यात दिले. सुरज एकदम भारावून गेला. त्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्याने मोहिते साहेबांचे पाय पकडले.
"अरे, अरे काय करतोस...?" म्हणत मोहिते साहेबांनी त्याला उठवले.
"साहब, बहोत मेहरबानी आपकी.." तो कृतज्ञतेने म्हणाला.
"यह हमारा फर्जं है।" त्याच्या खांद्यावर हात ठेवत मोहिते साहेब म्हणाले. नंतर कॉन्स्टेबलकडे पाहात ते म्हणाले, "सुरजचा दागिने मिळाल्या बद्दल जबाब लिहून सही घ्या." कॉन्स्टेबलने मान हलवली.
कॉन्स्टेबलने सुरजला खुणेनेच केबिन बाहेर चलण्यास सांगितले. सुरज केबिन बाहेर निघता निघताच मोहिते साहेबांनी काहीतरी आठवून त्याला थांबवलं, "एक मिनिटं..." सूरज मागे वळला.
मोहिते साहेबांनी त्यांच्या टेबलाच्या बाजूला असलेल्या पिशवीतून एक पादुका बाहेर काढली.
"सूरज ही पादुका ओळखतो?" सुरजने जवळ येत पादुका निरखून पहिली.
"साहब, सेवालाल बाबा के आश्रम में तीन
विशेष सेवक ऐसी पादुकाये पहनते है।"
मोहिते साहेबांचे डोळे चमकले. त्यांचा संशय खरा ठरत होता.
"ही पादुका त्या तिघांपैकी कुणाची असू
शकेल..काही अंदाज येतो का ..?" मोहिते
साहेबांनी प्रश्न केला.
"बाबाके तीन खास सेवकोंमेसे दो की तबीयत से तो ऐसा लगता है, की यह पादुका उनकी नहीहो सकती। साहब, यह पादुका जरुर बाबाके सेवक
जीवन की हो सकती है।"
डोंगराच्या पलीकडे सेवालाल बाबाचा आश्रम होता. या बाबांचे वागणे एकदम चमत्कारीक होते. बाबांकडे समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीला बाबा काहीतरी चित्र विचित्र उपाय सांगायचे. काहीतरी गुढमय पुटपुटायचे. कदाचित
त्यामुळेच बाबांकडे भक्तांचा जास्त ओढा
होता. बाहेर मोठा सभा मंडप आणि त्यानंतर एक छोटेसे प्रवेशद्वार! प्रवेशद्वारातून एका वेळी एकाच भक्ताला प्रवेश मिळत असे. गुहे समान असलेल्या एका पोकळीतून बाबाच्या बैठकीपर्यंत जाणाऱ्या साधारण शंभर मीटरच्या रस्त्यात अंधार होता. या रस्त्यात असलेल्या चारपाच मशालींचा काय तो थोडाफार
उजेड होता. बाबांच्या बैठकीची खोली
साधारण दहा फूट लांब व वीस फूट रुंद होती.बाबाच्या बैठकीच्या मागच्या बाजूला पुन्हा
तितक्याच लांबी रुंदीचा चौथरा. चौथऱ्याच्या मध्यभागी काली मातेची पंधरा फूट उंच मूर्ती. बाबांच्या बैठकीच्या बाजूला मानवी कवट्या व हाडांचे दंडुके होते.
मध्यरात्रीच्या सुमारास बाबा आणि त्यांचे
अत्यंत विश्वासातले दोन सहकारी यांची गुप्तरित्या तयारी सुरु होती. वातावरण अतिशय
गंभीर दिसत होते. तशात त्या खोलीतल्या होमात समिधा, तूप आणि इतर साहित्य जळत असल्याने संपूर्ण खोली धुराने भरलेली होती. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता, तरीही
होमाच्या गर्मीने तिघांच्याही उघड्याबंब शरीरातून घामाच्या धारा वाहात होत्या.
"जीवन कहा गायब है शाम से! उसे पता था आज इतना महत्वपूर्ण काम है।" बाबा जीवनवर संतापले होते.
"बाबा, पता नही कहाँ गया है वह, हमने बहुत ढुंढा उसे" बाबाचा एक सहकारी म्हणाला.
"ठीक है, उससे मै कल निपट लुंगा। अब तुम दोनो ध्यान से सुनो। मै जैसे बोला हूँ, ठीक वैसेही करना। जरासी भूल भी हम सबके लिये खतरा बन सकती है।"
बाबा दोघांकडे पाहात धीर गंभीर आवाजात
म्हणाले.
"जी.." दोघांपैकी एक जण म्हणाला.
"बाबा..." दुसऱ्याने शंका काढली. "बाबा, कमला देवीकी आत्मापे अगर काबू ना पा सके तो.."
"बेहुदा शक मत करो, मेरा इतने सालोंका
ग्यान कब काम आयेगा?"
"पर बाबा, मुझे संदेह इसलीये है, क्योंकी वह खुद भी काली विद्या मे माहीर थी। कही उसकी आत्मा आप पर हावी हो गयी तो...आपने उसेही क्यू चुना..?"
"तुने उस दिन भी यही सवाल किया था...
कमलादेवी को चुनने की वजह यह थी कि
वह धिरे धिरे उसका काले जादू का कारोबार बढा रही थी, उसका भक्त परिवार बढ रहा था, कई साल अगर ऐसा चलता रहता तो
अपनी दुकान बंद हो जाती और तो और
पिछले कुछ दिनोसे वह स्मशान में कुछ विद्याये सिख रही थी, जिससे वह मेरे आगे
निकल जाती।मुझे मेरे काले जादू के लिये
एक कटे हुये सर की आवश्यकताभी थी।सो एक पत्थर से दो निशाने लगाये।चलो, अब तैयार हो जाओ।मै आंखे बंद करके बैठ रहा हु।मेरे आंखे बंद करने के बाद कोई भी कुछ भी बात नही करेगा सिर्फ मेरी मंत्रोच्चार की
आवाजही गुफामे गुंजनी चाहिये।मुझे बिलकुल टोकना नही। मै खुद आंखे खोलुंगा करीब एक घंटे बाद।"
असे म्हणत बाबा भल्या मोठ्या पाटावर
बसले. समोर असलेल्या वस्तूवरील काळा
फडका वर अलगद उचलला. ते कमलादेवी चे मुंडके होते. बाबाने अभीर, गुलाल त्या मुंडक्यावर टाकले. बाजूला असलेल्या लिंबावरहीअभीर, गुलाल टाकून त्याला सुया टोचल्या आणि बाबांनी डोळे मिटले. बाबांचा मंत्रोच्चारसुरु झाला।बाबांचे दोन्ही सहकारी होमामध्ये एकेक वस्तू टाकत दोन बाजूला बसले. धीरगंभीर असे
वातावरण होते.
काही वेळ गेला असेल. अचानक त्या गुहेत
असंख्य प्रकाशझोत पडले. बुटांचे आवाज
दुमदुमले. बाबांच्या दोन्ही सहकाऱयांना
खसकन ओढून पकडले गेले. बाबांचा मंत्रोॅच्चार सुरूच होता.
"अब उठता है अपनी जगहसे, या डंडे मारके उठाऊ?" हा आवाज होता पोलीस निरीक्षक मोहितेंचा. त्या आवाजानेही बाबा उठला नाहीउलट त्याचा मंत्रोच्चाराचा आवाज अजून
वाढला. दंडुक्याचा एक जोरदार फटका बाबाच्या पाठीत पडला आणि बाबा कळवळला. दोन हवालदारांनी त्याला फरफटत बाहेर
काढले. बाबाने डोळे उघडले. पोलिसांबरोबर जीवनला बघून तो काय समजायचे ते समजला. पोलिसांनी त्यांना तिघांना एका जीप मध्ये व जीवनला दुसऱ्या जीप मध्ये कोंबले.
दोन दिवसांनी स्थानिक तहसीलदार अतिक्रणविरोधी पथक आणि पोलीस सुरक्षेसह बाबा च्या अनधिकृत आश्रमावर पोहोचले.
बुलडोझरने आश्रमाचे बांधकाम जमीनदोस्त होऊ लागले.बघ्यांच्या गर्दीत पुढच्याच बाजूला सूरज उभा होता. जस जसे बांधकाम
खाली कोसळत होते, तस तसा तो टाळ्या
वाजवत होता.