Sagar Bhalekar

Romance

4.3  

Sagar Bhalekar

Romance

जुळून येती रेशीमगाठी

जुळून येती रेशीमगाठी

12 mins
564


छाया : हाय, माझं नाव छाया आहे. हा मिसेस. कामत ह्याचा बंगला आहे का? मला त्याना भेटायचं आहे,आहेत का त्या घरात? त्यांनी वर्तमान पत्रांमध्ये जाहिरात दिली होती पेइंग गेस्टची?


मिसेस कामत: कोण आहे गं दारावर सुमन.


सुमन: मॅडम तुम्ही जाहिरात दिली होती वर्तमान पत्रांमध्ये पेइंग गेस्ट म्हणून ते आले आहेत तुम्हाला भेटायला.


मिसेस कामत: हो, पाठव.


छाया: मिसेस कामत तुम्ही का, मी नागपूरहून आली आहे तुम्हला भेटायला.


मिसेस कामत: हो, बसा ना. काय करता आपण.


छाया: मी एका IT कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिर आहे, इथेच मालाडला.


मिसेस कामत: आई वडील कुठे असतात आणि काय करतात, तुला कोण भाऊ की बहीण?


छाया: माझे आई वडील गावाकडे शेती करतात आणि मला एक बहीण आहे ती सध्या माझ्या क्षेत्रात इंजिनीरिंग करतेआहे. तीच ही खूप मोठं स्वप्न आहे. की माझ्यासारखंच शिकून मुंबईला नोकरी करायची.


मिसेस कामत: खरंच खूप चांगले विचार आहेत.


छाया : थोडं हसून


मिसेस कामत : नाही खरंच आजच्या मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहायला आवडते. ह्या जगात स्वतःची एक ओळख निर्माण करायला खूप आवडते. नाहीतर आम्ही लग्न झालं आणि संसारात पडलो कधी विचारच केला नाही स्वतःबद्दल, नोकरीबद्दल.


(तेवढयात सुमन येते आणि भरलेला पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवते.)


मिसेस कामात: घे, तहान लागली असेल ना तुला. एवढ्या लांबचा प्रवास करून आली आहेस.


ह्या एवढ्या मोठ्या घरात मी आणि माझे MR.कामत आम्ही दोघेच राहतो.आम्हला दोन मुले. दोन्ही मुले कामानिमित्त अमेरिका मध्ये असतात. मुलांच फक्त फोन करून विचारणं. नातवंडांचे अजून आम्ही तोंड देखील बघितलं नाही.आम्हा दोघांना एकटेपणा वाटायचा म्हणून आम्ही एका वर्त्तमानपत्रांत जाहिरात दिली होती. मी महिन्याचे ५००० हजार भाडे घेणार, परवडणार असेल तर सांगा.


छाया: हो चालेल.


मिसेस कामत: सुमन जरा इकडे ये. ह्यांना त्यांची रूम दाखव.


(सुमन लगेच बाहेरच्या खोलीत येते आणि छायाला रूम दाखवयणास नेते.)


सुमन: बाईसाहेबाकडे लक्ष देऊ नका कधी कधी ते असेच रागात बोलतात. दोन्ही मुलांना एवढं वाढवलं त्यांना शिक्षण दिल. आणि आता त्यांना साधं भेटायलाही येत नाही. तश्या आमच्या बाईसाहेब आहेत खूप गोड, सुंदर आणि शांत स्वभावाच्या. तुम्ही राग मानू नका.


(दोघेही रूमकडे येतात. चावी खोलून सुमन आणि छाया आत जातात)


सुमन: बाईसाहेब काही लागलं तर सांगा, खूप वर्ष ही खोली अशीच पडून होती. थोडी साफसफाई करावी लागेल. आता मला वेळ नाही. बघू संध्याकाळी बघते घरी जाण्याचा अगोदर करते.


(सुमन खोलीतून बाहेर जाते. आणि छाया दरवाजा लावून घेते.)


छाया: शी ! किती घाणरेडी आहे हि खोली. (स्वतःशीच पुटपुटत) मलाच साफ करावी लागणार बहुदा. एवढा मोठा बंगला. आणि बंगल्यामध्ये राहणार दोघेच. किती निर्रथक आहे हे जीवन. बिचारी आजीबाई .


(छायाने थोडी साफसफाई केली आणि आपल्या आई वडीलचा फोटो टेबलावर ठेवला. आणि दमली असल्याकारणाने लवकरच झोपी गेली.)


(संध्याकाळचे ८ वाजले असताना दरवाजावर टक-टक असा आवाज आला. लगेचच छाया खडबडून जागी झाली आणि टेबल्यावरच्या घडयाळाकडे तिचे लक्ष गेले. अरे संध्याकाळचे ८ वाजले. दरवाजा उघडला.)


सुमन: छाया मॅडम झोप झाली का? बाईसाहेबानी तुम्हाला खालती बोलवले आहे जेवण्यासाठी. मी जाते मला भरपूर काम आहेत अजून. तुम्ही या लवकर नाहीतर बाईसाहेब रागावतील. त्यांना उशीर झालेला आवडत नाही.


छाया: हो, फ्रेश होऊन येतेच थोड्यावेळात.


(काय बाई ह्याचा त्रास आहे झोपून पण देत नाही. (स्वतःशीच पुटपुटत) चला छाया मॅडम बाईसाहेबांना उशीर झालेला आवडत नाही.)


(जेवण्याच्या टेबलावर MR.कामत, MISS. कामत, आणि छाया)


MR. कामत: हाय हॅलो! यंग लेडी, काय करता आपण?


छाया: मी एका IT कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिर आहे.


MR. कामत: ohh! That's great. माझी दोन्ही मुले अमेरिका मध्ये इंजिनिर आहेत. काही वर्षांपूर्वी इथं मुंबईला आली होती.


मिसेस कामत: पुरे, आता मुलाचं कौतुक. नुसती नाटक आहेत सगळी. आई बाप मेले कि काय असं वाटत त्याना. सारखं आपलं कौतुक.


(तिघेही जेवण करतात, आणि जेवण झाल्यावर MR. कामत बाहेरच्या खोलीतून सुमद्राकडे बघत असतात. तेव्हाच छायाही तिथे येते.)


छाया: तुम्ही तुमच्या मुलांना खूप मिस करत असाल ना.


MR. कामत: हो, खूप लहान होते तेव्हा माझ्या हातखांद्यावर खेळायचे. कधी वाटलंच नाही कि आमच्या आयुष्यामधून एवढे लांब निघून जातील. ५ वर्षांपूर्वी दोन्ही मुले मुंबईला आली होती. घरी आले तेव्हा खूप आनंद झाला. तिला आणि मला पण. आम्ही खूप फिरलो. लहानपणीच्या गोष्टीने आम्ही सर्व आनंदित झालो. खूप एन्जॉय केलं. पण कधी वाटलंच नाही कि एवढे आम्ही त्याना परके वाटू.


सोड जाऊदे, तू आजच घरी आली आहेस, तुला वाटेल कि काय हि बोरिंग म्हातारा आणि म्हतारी आहे.


(थोडस रडवलेला तोंड करून MR. कामत)


छाया: असं काय नेमकं झालं कि तुमच्या एवढ्या भावना दुखावल्या गेल्या.


MR. कामत: एके दिवशी माझ्या दोन्हींनी मुलांनी मला कायमचं अमेरिका मध्ये येणास सांगितले. हा बंगला विकू आणि चला अमेरिकेमध्ये. इकडे काय ठेवला. तुम्ही दोघेच तर राहतात. तुमच्या दोघांसाठी कशाला पाहिजे आहे एवढा मोठा बंगला. आपण एकत्र राहूया सगळेजण.हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण मला हे त्याच्या बोलण्यातून कळले. आम्ही कसे ही राहू. हा बंगला म्हणजे माझा जीव आहे. मी व माझ्या बायकोने केलेली आयुष्यभरची कमाई आहे. आम्ही असच तिला सोडून नाही जाणार.मुलांनी खूप समजावलं. पण मी आणि माझी बायको आम्ही ठाम होतो आमच्या निर्णयांवर. त्यानंतर दोघेही इथून निघून गेले. जातेवेळी दोघेही आमच्या पाय न पडता कायमचे निघून गेले ते कधी न परतयनासाठी.


छाया: काका खरंच मला तुमची व काकूंची खूप दया वाटते की आपलं पोर लहानपणी आपण त्याला खेळवतो, लहानाचे मोठे करतो. त्याच्या सर्व गरजा आपण पूर्ण करतो आणि मोठे झाल्यावर आपली काहीच किंमत नाही आहे हे कळल्यावर आभाळ कोसळल्यासारखे वाटेत आपल्याला. तुम्ही चिंता नका करू तुम्ही पण मला माझ्या वडिलांप्रमाणे आहात.


(दोघेही हसून आपल्याला खोलीकडे वळतात.)


छाया: Good night.


MR. कामत: Good night, young lady.

(छायाचा पहिला दिवस ऑफीसचा. नीलम ही पुराणिक IT फर्म ची CEO असते. नीलम सर्वांची ओळख करून देते छायाला)


नीलम: हाय छाया! I AM CEO OF पुराणिक IT फर्म. मी ५ वर्षांपासून ह्या फर्म मध्ये काम करत आहे.


छाया: nice to meet you.


नीलम: प्रिय सहयोगी: मला हे घोषित करण्यात आनंद होत आहे की छाया सुभेदार IT डिपार्टमेंट सिनियर executive चे स्थान स्वीकारले आहे.


छाया: थँक्स.


नीलम: my pleasure.


समीर: हाय, मी समीर नाईक सिनियर executive पुराणिक IT फर्म.


छाया: हाय.


समीर: आम्ही सर्वानी तुमच्यासाठी एक वेलकम पार्टी ठेवली आहे. ऑफिस सुटल्यावर कॅफेटेरिया मध्ये. Please नक्की या.


छाया: थँक्स, पण पार्टी वैगरे कशासाठी.


समीर: नाही, असं कस तुम्ही आमच्या टीम मध्ये नवीन जॉईन झाला आहात . एक पार्टी तर झालीच पाहिजे.


(कॅफटेरिया मध्ये सर्व जण जमा होतात. पार्टी सुरु होते.)


समीर: तुम्ही एन्जॉय करत आहेत ना पार्टी. ह्या टीम ची एक वेगळी खासियत आहे. आम्ही सर्व जण मिळून मिसळून काम करतो.


छाया: Yes, मी खूप एन्जॉय करतेय, पार्टी. मला थोड्याचवेळात निघावं लागेल कारण मी पेइंग गेस्ट म्हून राहते आणि त्याच असं म्हणणं आहे कि मी १० च्या आत घरात आली पाहिजे. So I am very sorry for all of us. By the way पार्टी खूप छान होती.


समीर: मी तुम्हाला सोडतो घरी तुमच्या. कुठे तुम्ही बसने जाणार. त्यापेक्षा माझी गाडी आहे.


छाया: नको राहू दे तुम्हाला कशाला उगीचच त्रास. मी जाईन ऑटो किंवा बस करून.


समीर: नाही, मी येतो तुम्हाला घरपर्यंत सोडायला. मुंबई मध्ये एकट्या मुलीने प्रवास कारण धोकादायक आहे.


(समीर हसत हसत गाडी आणायला जातो.)


(दोघेही गाडी बसतात)


समीर: तुमचा हा पहिला जॉब आहे का? म्हणजे ह्या आधी कधी कुठे केला होता की जॉब?


छाया: हो, हा माझं पहिला जॉब. ह्या आधी कुठेही नव्हता केला. बस बस इथे सोडलं तरी चालेल मला. मी जाईन चालत इकडून.


समीर: Okay. Good night, bye takes care.


छाया: bye.


मिसेस कामत: अरे छाया बराच उशीर झाला तुला यायला?


छाया: हो, मॅडम. आज मी कंपनी मध्ये जॉईन झाली म्हून आज सर्वानी मिळून मला पार्टी दिली.


मिसेस कामत: भूक वैगरे लागली असेल ना तुला?


छाया: नाही. काही नको मी पार्टी मधून जेवून आली आहे.


(आणि मिसेस कामत एवढं बोलून निघून जातात आणि छायाही आपल्या रूम मध्ये निघून जाते. दमली असल्याकारणाने छाया लवकर झोपी जाते.)


(दुसरा दिवस उजाडतो. छायाचा अलार्म वाजतो आणि छाया खडबडून उठते. बघतेतर काय सकाळचे ७ वाजले असतात.फ्रेश होऊन छाया नाश्ता रूम मध्ये येते.टेबलावर छाया, मिसेस कामत)


छाया: मॅडम, काका कुठे दिसत नाही.


मिसेस कामत: त्याची नेहमीची सवय. मॉर्निंग वल्क साठी गेले आहेत. सकाळी लवकर उठून नाश्ता करून. रोजचीच त्यांची सवय.


छाया: ह्या वयात स्वतःला फिट ठेवणं. खरंच काकांना माझ्याकडून सलाम! चला मी निघते ऑफीसाला जायला लेट होईल मला. पण पोहे मात्र अतिसुंदर केले होते. त्यासाठी थँक्स!


मिसेस कामत: नीट जा.


(छाया ऑफिसवर थोडी लेट पोचते तेव्हा पुराणिक फर्मचे मॅनेजर MR. इनामदार आपल्या केबिन मध्ये बोलवतात तिला.)


peon: बाईसाहेब आपणच छाया. सरांनी आपल्यास बोलवले आहे केबिन मध्ये.


छाया: MAY I COMING SIR.


MR. इनामदार: YAA! Coming. Please seat down. HI I AM the मॅनेजर ऑफ पुराणिक IT फर्म फ्रॉम मुंबई BRANCH.


छाया: nice to meet you.


MR. इनामदार: थोडं कंपनीबद्दल माहिती सांगतो. आपल्या ३६ ब्रॅंचेस आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड. ही आपली मेन ब्रँच आहे. आणि तुम्हाला ह्या कंपनीमध्ये शिकायला खूप भेटेल. आपल्या आयुष्याची सुरुवात तुम्ही खूप चांगल्या ठिकाणाहून करत आहेत. तेव्हा खूप मेहनत आणि जोमाने काम करा. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला आमच्या सर्व पुराणिक IT फर्म मधून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!


छाया: थँक्स सर.


(छाया केबिन मधून बाहेर निघते आणि आपल्याला डेस्क वर जाऊन बसते.)


प्रियांका: हाय, मी प्रियांका मी जुनिअर executive. इथेच अंधेरीला राहते. आपण ही अंधेरीला राहतात का?


छाया: नाही. मी मालाडला राहते.


प्रियांका: okay, बॉस काही बोला का? खूप खडूस आहे. नुसतं लोकांकडून काम करून घेयाचं. सॅलरी वाढवण्याचं नाव नाही. जरा सांभाळून राहा. काही मदत लागली तर नक्की सांग. संकोच करू नकोस.


छाया: हो नक्की.


(रेल्वे स्टेशन मधून एक मध्यमवर्गीय मुलगी उतरते.)


सपना: थोडं ऐकतात का? मला MR. कामत ह्याचा बंगला सांगाल की कुठे आहे ते?


एक माणूस: इथून डाव्या बाजूला एक मैदान लागेल त्या मैदानाच्या समोर एक बंगला आहे. तोच आहे MR. कामत ह्याचा बंगला.


सपना: थँक्स.


मिसेस कामत: कोण आहे जरा बघते का सुमन.


सुमन: बाईसाहेब गच्चीवर कपडे सुकत घालते आहे.


मिसेस कामत: ठीक आहे. (दरवाजा उघडतात) कोण हवं आहे आपल्याला?


सपना: MR. कामत ह्याचा बंगला हाच आहे का? मी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात बघितली होती पेइंग गेस्टची? (थोडं थांबून) मला थोडं पाणी मिळेल का खूप लांबून आली आहे. तहान खूप लागली आहे.


मिसेस कामत: हो मिळेल ना. (डोक्यला हात लावून) हे जाहिरातवाले पण ना परवा MR. कामत ह्यांनी फोन करून सांगतली होत की जाहिरात ताबडतोब काढून टाका म्हून.


(सुमन पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि सपनाला देते.)


सपना: please, मला जागेची नितांत गरज आहे. हवं तर तुम्हला हवं तेवढं भाडं घ्या माझ्याकडून.


मिसेस कामत:(स्वतःशीच पुटपुटत) कल्पना चांगली आहे.) ठीक आहे. मी ५००० भाडं घेईन. पण एक अडचण आहे. परवाच आम्ही एका मुलीला पेइंग गेस्ट ठेवलं आहे. तर तुला रूम share करावी लागेल तिच्यासोबत.


सपना: हो चालेल .मला नक्की share करायला आवडेल.


मिसेस कामत: okay. आपण काय करता?


सपना: मी एक मॉडेल आहे आणि मी एका ऍडव्हर्टीस्टिन्ग कंपनीमध्ये मॉडेल म्हून काम करते.


सपना: room दाखवतात आहे ना मला.


मिसेस कामत:हो, आणि एक तुमचे गव्हर्नेम्ट ID प्रूफ लागेल.पोलीस वेरिफिकेशन साठी.


सपना: हो नक्की. मी आणून देते तुम्हाला.

(सपना छायाच्या रूममध्ये जाते. हात पाय तोंड न धुता सपना त्याच बिछाण्यावर झोपी जाते. थोड्यावेळानंतर छाया रूममध्ये दाखल होते आणि बघते तर काय सगळीकडे सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसले हे बघता छायाचे तर डोकेच फिरते.)

छाया - आपण येथे राहायला आला आहात ना? मग हे काय असा बेफिकरपणा मी कधीच खपून घेणार नाही. तुमची तक्रार मिसेस कामत ह्यांच्याकडे करिन.

सपना - हो, एवढं तुम्हाला भडकायला काय झालं तुम्हाला? मी दमली असल्याकारणाने लवकरच झोपी गेली.आणि हॅलो, मी पण इथे राहायचे पैसे दिले आहेत.त्यामुळे बोलताना थोडं माझ्याशी भान ठेवूनच बोला.

छाया - ठीक आहे. पण पुन्हा अस वागू नका. हाय, मी छाया. मी इथे दोन दिवस झाले राहायला आली आहे.

सपना - हाय, मी सपना जोशी. मी एक मॉडेल आहे. आपल्या दोघांची मैत्री छान जमू शकेल.

(तेवढ्यातच सुमन दरवाजा ठोकावते.)

सुमन - मॅडम, जेवणासाठी बोलवते आहे. लवकर ह्या दोघीनी.

मिसेस कामत - (जेवण झाल्यावर) मी तुम्हा दोघीना परत नियम समजवून सांगते.

१. रात्री १० च्या नंतर घरी येण्यास परवानगी नाही.

२. इथे मित्र आणि मैत्रिणींना येण्यास परवानगी नाही. जे काही काम असेल तुमचे ते बाहेरच्या बाहेर निपटावे.

३. जागेचे भाडे नियतमीतपणे महिनाच्या सुरुवातीस ५ किंवा १० तारखेच्या मध्ये आणून देण्यात यावे.

४. जागेमध्ये काही करायचे असल्यास आमची परवानगी घेणे आवश्यक आहे.

दोघी - ठीक आहे, चालेल. शुभ रात्री.

मिस्टर कामत & मिसेस कामत - शुभ रात्री.

मिस्टर कामत - बरं झालं. आता छायाला ही कोणाचीतरी कंपनी भेटेल आणि आपल्या मुलाची कमतरता ह्या दोघी नक्की भरून काढतील असं मला वाटते आहे.

मिसेस कामत - त्यांच्याकडून तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका. त्या पेयिंग गेस्ट आहेत त्याप्रमाणेच त्यांना राहू द्या. लळा लावून अपेक्षाभंग करण्यापेक्षा लळा न लावलेला बरा.

मिस्टर कामत - ठीक आहे बाईसाहेब. तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा.

मिसेस कामत - तुम्हाला जे वाटतंय तेच मला ह्याक्षणी वाटतंय फक्त मागच्यावेळेसारखी आपल्या मुलांच्या बाबतीत जे घडलं त्यांची पुनरावृत्ती होऊ नये असे मला वाटते.

(दोघेही आपल्या रूममध्ये जातात आणि दरवाजा लावून निवांत झोपतात.)

(सपना आपले सामान खोलीत व्यस्थित लावत असते आणि तिची मदत छाया करत असते.सामान लावून झाल्यावर त्या दोघीना खरंतर कंटाळा आलेला असतो, तरीही त्या दोघी थोडक्यात आपली ओळख सांगतात.)

छाया - मी एका IT कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिर आहे. आणि तू?

सपना - मी एक मॉडेल आहे. आणि माझं असं काही टाईमिंग नसत. माझं जेव्हा शूट असते तेव्हा मला जावं लागत. पण मिसेस कामतच्या एका निर्णयाने मला थोडं टेन्शन आलं आहे. १०च्या आत घरात?

छाया - अगं, त्यातून काहीतरी मार्ग काढू आपण…

(आणि दोघेही झोपी जातात.)

(सकाळी ६ ला अलार्म वाजतो.छाया उठते आपलं सर्व आवरते आणि सपनाला उठवते.)

सपना - एवढ्या लवकर ऑफिसला???

छाया - नाही गं, आवरून बसते नंतर उशीर होऊ नये म्हणून....

सपना - ठीक आहे, तरीपण साधारण कितीपर्यंत निघतेस.

छाया - ८.३० च्या दरम्यान.

सपना - ठीक आहे. आता ७ वाजले आहेत. मीसुद्धा माझं आवरते. आपण दोघी नाश्ता करू आणि निघू .माझी bike आहे. मी तुला drop करू शकते. जर तुला चालणार असेल तर.

छाया - why not??? मस्तच आहे तुझी idea.

(सपना सर्व आवरून तयार होते आणि दोघी नाश्त्याला जातात.)

छाया - wow! किती छान. तू तर मला ना एखाद्या टॉमबॉय सारखी वाटतेस. एकदम डॅशिंग.

(सपना केस उडवत बोलते.)

सपना - अरे, हम हम्म है, बाकी सब पानी कम है.

छाया - हे बस झाला आता तुझे नौटंकीपणा. चल, लवकर मला उशीर होतोय.

सपना - अरे हो, मला हेल्मेट तरी घालू दे.

(आणि दोघी मस्त हवेचा आनंद लुटत जातात.)

(तसं बघायला गेलं तर छाया आणि सपना ह्या दोघीची खूप छान जोडी जमली होती. कधी छायाला ऑफिसमधून उशीर झाला की, सपना जिथे असेल तिथे छायाला घ्यायला यायची. कधी कधी तर मिसेस कामत ह्यांना फोन करून दोघी सांगायच्या आज आम्ही बाहेरच जेवणार आहोत. सुरुवातीला सगळं ठीक होत. हळूहळू त्या एकमेकींमध्ये गुंतू लागल्या, ह्याचा अंदाज आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनासुद्धा येऊ लागला.त्याचे हातात हात घालून फिरणे. बऱ्याच लोकांनी ही गोष्ट कामत दाम्पत्य ह्यांच्या कानावर घातली. पण बऱ्याच वेळा दोघांनीही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. ह्याची प्रचिती कामत दाम्पत्यांना केव्हा आली, जेव्हा ते काही कामानिम्मंत बाहेर गेले आणि काम आटोपल्यावर ते दोघे मस्त समुद्रकिनाऱयावर फिरण्यास गेले. तेव्हा छाया आणि सपना हातात हात घालून होत्या. हा दृश्य जेव्हा कामत दाम्पत्यांनी बघितले, तेव्हा मिसेस कामत ह्यांच्या पायावरची जमीन सरकली. मिसेस कामत खूप चिडल्या होत्या पण मिस्टर कामत ह्यांनी त्यांना घरी जाऊन शांतपणे बसून बोलण्याचा सल्ला दिला.)

(छाया आणि सपना त्या समुद्रकिनारी एकमेकांकडे प्रेम ह्या भावनेने बघतात.)

सपना - कसं असत ना हे आयुष्य. आपली भेट झाली तेव्हा वाटलंच नव्हतं असं काहीस आपल्याबाबतीत घडेल असं. आपण दोघी एकमेकांमध्ये गुंतू लागलो.आपल्याला कसलीच भीती राहिली नाही. आपण दोघी मुली. आपल्याला समाज एकत्र येऊनसुद्धा देणार नाही.आपण ह्या समाजाचा एक घटक आहोत ह्याचासुद्धा आपल्याला विसर पडला आहे. समाज आपल्याला कोणत्या नजरेने बघतो हेसुद्धा आपण जाणून घेतले आहे. समलिंगी प्रेम किंवा विवाह हे कायद्याच्या दृष्टीने एक गुन्हाच आहे. "हिंदू विवाह कायद्यामध्ये युगुलाची व्याख्या पती आणि पत्नी अशी केली आहे. समलैंगिक विवाहामध्ये कोण पती असेल आणि कोण पत्नी हे कसं ठरणार?"

छाया - आपल्या दोघीच एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. ह्याला आपल्या घरचे मान्यता देतील.

सपना - घरचे काय निर्णय घेतात ह्यावर आपलं प्रेम अवलंबून नाही आहे. तर आपल्या दोघीच्या भावना ह्याला साक्ष आहे.

(दोघीही घरी जातात. दारावरची बेल वाजते, मिस्टर कामत दरवाजा उघडतात.)

मिसेस कामत - हे काय चालवलं आहे तुम्ही दोघीनी. जगाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगा. तुमच्यादोघीवर एवढा जीव लावला. तरी म्हणतं, होते मिस्टर कामत ह्यांना नको कोण पेयिंग गेस्ट म्हणून. तुम्हला माझा आणि मला तुमचा आधार आहे. प्रथम पोटच्या पोरांनी लाथ मारली आम्हला, आणि आता तुम्ही?

दोघीही - काका आणि काकू आम्ही तुम्हा दोघांना समजू शकतो. पण आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांशिवाय नाही जगू शकत.

छाया - मी सपनामध्ये माझं मन आणि प्रेम शोधतेय. आम्ही म्हणतो, मनाच्या आणि प्रेमाच्या विरोधात कसं काय जायचं. आम्ही एकमेकांमध्ये खूप इन्व्हॉल्व्ह झालो आहोत. आम्ही दोघीही ह्या विचारांशी सहमत आहोत.समाज आमच्याकडे कोणत्या नजरेने बघतोय हे आम्हला जाणून घ्याचे नाही आहे. तुम्हाला आम्ही सांगणारच होतो प अनपेक्षितपणे तुमच्या समोर आलं असं व्हायला नको होत. आम्हला आमची बाजू मांडण्याची संधी द्या. सरकारने सुद्धा आता समलिंगी विवाहाला मान्यता दिली आहे. प्रश्न राहिला तो आमच्या आई-वडिलांचा. त्यांना सुद्धा आम्ही पटवण्याचा प्रयत्न करू. आणि उरला प्रश्न मुलांचा तर तेही आम्ही एका अनाथाश्रमधून दत्तक घेऊ.

(थोड्यादिवसांनी छाया आणि सपनाच्या घरच्यांनी त्यांच्या ह्या समलिंगी विवाहाला मान्यता दिली नाही. शेवटी कामत दाम्पत्यांनी त्या दोघीचे विवाह लावून दिले. आणि खरंच कामत दाम्पयत्नसुद्धा त्याच्या रूपात दोन मुली भेटल्या, आता मात्र सगळं शांत झालं. थोड्याच दिवसात छाया आणि सपना आपल्या हक्कांच्या घरात राहायला गेले आणि सुखाने संसार करू लागले.)




Rate this content
Log in

Similar marathi story from Romance