जीवन म्हणजे अग्निपरीक्षा
जीवन म्हणजे अग्निपरीक्षा


जीवन म्हणजे अग्निपरीक्षा ,
सुख दुःख खेळ ऊन, पावसाचा
आकाश - धरतीसम जिणं ,
क्षितिजापरी आभास मिलनाचा
स्मशान शांतता , रातकिडयांची किर्रकिर्र ...
पालीच चुकचुकणं, मन उदास , सैरभैर ...
भयाण ,काळ्या कुट्ट काळोखाचे साम्राज्य चोहीकडे ...
हरकत नाही ,पुन्हा नव्याने अवघी धरती प्रकाशमान होईल गडे !
शिशिर येईल पानगळ होईल ...
पुन्हा नव्याने वसंताचा बहर येईल
यदा कदाचित वणवा पेटेल ...
पुन्हा नव्याने अंकुर फुटेल...