Jyoti gosavi

Comedy Fantasy

4.0  

Jyoti gosavi

Comedy Fantasy

झोपाळा

झोपाळा

8 mins
467


तिचे लहानपण गेले एका मोठ्या नगरीत, लहानपणापासून तिला झोपाळ्या चे फारच वेड.

पण तिच्या दुर्दैवाने त्यांचे घर खूपच लहान होते.चाळीच्या छोट्याशा दोन खोल्या, त्यामध्ये एक स्वयंपाक घर ,एक बसा उठायची खोली, तोच हॉल, तेच बेडरूम, त्यामुळे जे काही करायचे ते तिथेच असायचे.

बाकीचे बैठे खेळ खेळता यायचे, पण झोपाळा काही बांधता यायचा नाही.त्यामुळे तिचे मन खट्टू होत असे.त्याची भरपाई ती घरा जवळ असणाऱ्या बागेमध्ये जाऊन करायची.

बघावं तेव्हा ही बागेत जाऊन झोपाळ्यावर बसलेली असायची.

घर अगदी जवळच असल्याने बाग जरी बंद झाली, तरी या बच्चे कंपनीला खुश्कीचा मार्ग माहीत होता.तेथून ते तारा वाकवून आत शिरत असत, आणि बागेमध्ये धुडगूस घालत.

ही मात्र शांतपणे झोके घेत बसलेली असायची.अगदी अभ्यासाचे पुस्तक हातात धरून देखील ती हळू हळू शांत झोके घेत झोपाळ्यावरच अभ्यास करायची.

त्यासाठी कितीतरी वेळा तिची इतरांशी भांडण व्हायचे.

आता सर्वांनाच माहीत झाले होते, की ही मुलगी झोपाळा वेडी आहे.ही काही झोपाळा सोडत नाही.

ही जेव्हा यांचे खेळ चालू असत तेव्हा, सगळ्यात उंच उंच झोका हिचा जाई.

जसं काय आभाळाशी स्पर्धा करायला ही जात असे .वर वर आता आकाशाला हात लावून खाली येणार, असं इतरांना वाटायचं .आणि तिला देखील वाटायचं. यापेक्षा मोठ्या झोक्यात बसलं तर आपल्याला आभाळाला हात लावता येईल.

हळूहळू लहानाची मोठी झाली, पण झोपाळ्याचे वेड काही जात नव्हतं. लहानपणी तिच्या हौसेसाठी बाबा कधीतरी, घरांमध्ये मोठ्या रस्सीचा झोका बांधून, त्याला एका जाड कपड्याची  खोळ घालून ,त्यामध्ये बसायला देत असत.

पंचमीला मात्र त्या बागेतल्या वाॅचमन काकाकडून हक्काने झाडाला झोपाळे बांधून घेत आणि त्या वरती झुलत असत. वाॅचमन पण वर्षातून एकदा त्यांचे लाड पुरवत असे. तो त्याचे मुले गावाकडे असल्याने, तो या मुलींना आपल्या मुलीसारखी बघायचा .किंवा या मुलींना बघून त्याला आपल्या मुलीची आठवण यायची, आणि तो या मुलींना झोपाळा बांधून द्यायचा. तिचं सारं जगच झोपाळा होतं.

पुढे जसं तारुण्यामध्ये प्रवेश केला तशी तिला मंगेश पाडगावकरांचे ते गाणं खूपच आवडू लागलं.

दिवस तुझे हे फुलायचे

झोपाळ्यावाचून झुलायचे

पण तिला हा प्रश्न पडायचा झोपाळ्यावाचून कसं झुलायचं ?मला तर बाई झोपाळ्यातचं बसून झुलता येईल.

फांद्यावर बांधिले ग मुलींनी हिंदोळे

पंचमीचा सण आला डोळे माझे ओले

हे देखील गाणं तिला आवडायचं.

पुढे कॉलेजमध्ये गेली, डिग्री पूर्ण केली पण झोपाळ्याच्या वेडातून काही बाहेर आली नाही.

तिला वाटायचे असा उंच उंच मस्तंच झोका घ्यावा आणि आकाशातल्या चांदण्या खोडून आणाव्यात, चंद्राशी शेकहॅण्ड करावा. आकाशातला पिंजका कापूस खाली बरोबर घेऊन यावा.

विज्ञान शाखेत शिकलेली ही मुलगी ,तिला हे नक्की माहित होतं आकाश ही एक पोकळी आहे ,त्यामध्ये असं काही नसतं ,हा सारा आभास आहे. पण तरीही ती आपल्या कविकल्पना मधून कधी बाहेर आली नाही.

तिचे ते झोपाळा वेड तिला एअर होस्टेस बनवून गेले. आकाशात जायला मिळावे म्हणून तिने एअरहोस्टेस चा कोर्स केला ,आणि ती होती पण तशी देखणी, उंच, सूरई सारख्या मानेची, मंजुळ स्वराची आणि चेहऱ्यावरती देखणं हसू असणारी.

ती सहज सिलेक्ट झाली.

पहिल्यांदा ट्रेनिंग करताना तिला फार उत्सुकता होती. पहिल उड्डाण करताना कसं वाटतं ?

तेव्हा तिचे लक्ष शिकवलेला मॅनूरिजम कडे नव्हते तर, तिला पिंजलेल्या कापसाचे गड्डे डोळ्यापुढे दिसत होते. ती बेभानपणे बाहेरच्या जगात बघत होती.

तिला भानावर आणलं मैत्रिणीनी

बाई ग तुझी ड्युटी,

येणाऱ्या पॅसेंजर चा हसून स्वागत करणे, त्यांना काय हवे नको ते बघणे, त्यांच्याकडे पाहून खोटं खोटं का होईना पण हसणे. यासाठी एअरलाईन तुला पैसे देणार आहे.

मग तिने जरा स्वतःच्या वेडा बद्दल मैत्रिणींना सांगितलं. कधीतरी मला मध्ये पाच दहा मिनिटात देत जा. आणि तिला तसा रिलीफ मिळू लागला.

निळे आकाश,  पिंजलेले ढग, रात्रीच्या वेळी आजूबाजूला वरती चमकणाऱ्या चांदण्या, तिला बेभान करून सोडत.

नंतर मात्र रोजचे दृश्य झाल्यानंतर तिला त्या दृश्यांचा काही फारसं वाटेनासं झालं, ती आपली ड्युटी इमानेइतबारे करू लागली.

*********************

त्यानंतर तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. तिला स्वतःच्या झोपाळा प्रेमापुढे कोणाच्या प्रेमात देखील पडायला कधी वेळ मिळाला नाही. त्यामुळे रीतसर अरेंज मॅरेज करायचे ठरले. त्यानुसार मुले बघायला सुरुवात झाली. तिची आपली सगळीकडे एकच अट, मुलाच्या घरी झोपाळा पाहिजे. आता मुंबईसारख्या शहरांमध्ये झोपाळा पाहिजे, म्हणजे घर किमान टू बीएचके /थ्री बीएचके पाहिजे .आणि लाखात पगार घेणाऱ्या लोकांना देखील लवकर ते शक्य होत नाही.

असे करता करता एक मुलगा पसंत पडला.

तो आयटी इंजिनियर होता, एका मोठ्या आयटी कंपनीत काम करत होता. उपनगराच्या थोडसं बाहेरच त्याचा प्रशस्त टू बीएचके टेरेस फ्लॅट होता. दोघेही एकमेकांना अनुरूप होते. बाकी सारं छान जमत होतं. मग वडिलांनी तिला समजावलं ."अगं लग्न झाल्यावर तू तुझ्या हौसे प्रमाणे तुझ्या घरात झोपाळा बांधू शकशील. उगाच एवढ्या चांगल्या स्थळाला तुझ्या छोट्याश्या छंदासाठी नकार देऊ नको.

तिला पण मुलगा आवडला होता. त्यामुळे ती काही बोलली नाही, गप्प बसली. पण मुलाची एक अट होती, कोकणामध्ये एका छोट्याशा गावी त्याची आजी राहत होती.

आजी म्हणजे आईची आई त्याचे अजोळ होते ,आणि हा लहानाचा मोठा मामाकडे झाल्यामुळे ,त्याला तिला प्रथम आजीला भेटावयाचे होते. आज्जीचा आशीर्वाद घ्यायचा होता.

आजीने हो म्हटले तरच पुढची बोलणी,

वडील मनात म्हणाले ,"हे पण आपल्या पोरी सारखं येडचाप दिसतंय! आपली पोरगी झोपाळ्याची येडी, तर हा एवढा आयटी ऑफीसर मुलगा म्हणतो, आजीने पसंत केली तरच बायको करायची.

त्याच्या म्हणण्यानुसार तिचे आई-वडील आणि ती तिघेजण कोकणात गेले. तिथे कोकणातल्या पद्धतीचं घर ,बाहेर थोडा भाजीपाला लावलेला.

आतमधे ओसरी, त्याच्यानंतर आत मध्ये माजघर, स्वयंपाक घर, त्याच्या पाठीमागे एक छोटीशी आंघोळीचे पाणी वगैरे तापवायची, लाकूड फाटा ठेवायची खोली  त्याला लागूनच विहीर, त्याच्या पाठीमागे नारळी-पोफळीची बाग ,असं मस्त घर होतं. आणि जसं तिने माजघरात पाऊल ठेवलं, आणि त्यानंतर तिने डोळेच विस्फारले.

कारण तिच्या स्वप्नीचा, पितळी चकत्या असणारा लाकडी कडी पाटाचा झोपाळा, माजघरात झुलत होता. ती तर एकदम गेल्या गेल्या दहा बारा वर्षाच्या अल्लड बालिके सारखी झोपाळ्यावर बसली,आणि झोके घेऊ लागली.

तोपर्यंत आजे सासुबाई येऊन उभ्या राहिल्या.

बघतात तर नात सुनेचं आपल्याकडे लक्षच नाही. ती आपली झोके घ्यायच्या नादात.

अगं वंदू काय करतेस? आपण लोकांच्या घरी आलोत, तुझ्या आजेसासुबाई तुझ्यापुढे उभ्या आहेत.

तरी पण हिचे लक्ष नव्हते. नंतर एकदम लक्ष गेल्यावर गडबडीने ती त्यांच्या पाया पडली.

आजीने हसत हसत विचारलं

काय ग! झोपाळा फार आवडतो वाटतं?

ती काहीच बोलली नाही. नुसतीच उभी राहिली.

अगं लाजतेस काय?

तुझी माझी गट्टी एकदम जमणार!

तुला माहित आहे का? मीदेखील झोपाळा वेडी आहे .स्वयंपाक पाणी केलं की  येऊन झोपाळ्यावर बसायचं !

यांच्याशी वाद-विवाद झाला, मनस्ताप झाला, येऊन झोपाळ्यावर बसायची .

आनंद झाला तरी येऊन झोपाळ्यावर बसायची. तुला सांगू का हा झोपाळा माझा मित्रच आहे.

माझ्या आयुष्यातला मोठा साक्षीदार आहे. या घरात लग्न होऊन आले तेव्हा परकरी पोर होते .

अकरा बारा वर्षाचे पोर वय माझं, ते सासर बिसर तर काही समजत नव्हतं.

आले आणि झोके घ्यायला लागले .मग माझ्या सासूबाईंना फार राग आला. त्यांनी मला धपाटे घातले आणि झोपाळाच काढून ठेवला. "कार्टी एक काम करायची नाही" ऊठसूट झोपाळ्यावर येऊन बसेल.

मला फार वाईट वाटले ,मग मी आपले काम संपले की, अडगळीत ठेवलेल्या झोपाळ्यावर हात फिरवून यायची ,त्याच्याशी गप्पा मारायची. एकदा कोणाशी बडबड करते म्हणून मामंजी बघायला आले तर, मी झोपाळ्याला वरती हात फिरवून बडबड करत होते. त्यांनी विचारलं

काय ग! काय बडबडतेस?

मी म्हणाले काही नाही, काही नाही.

आणि तिथून पळत सुटले.

मामंजीनी विचारले,

तुला एवढा आवडतो का झोपाळा?

मी फक्त पळतापळता मान हलवली.

त्यानंतर तो झोपाळा अडगळीच्या खोलीत तून बाहेर आला, आणि पुन्हा आपल्या जागी स्थानापन्न झाला. आणि सासुबाई कशाला झोपाळा बांधला? म्हणून ओरडत होत्या, पण ते म्हणाले

तुझी सगळी काम करते ना? हा झोपाळा तिचा विरंगुळा आहे.

त्याच्यावर बसायला तिला तू ओरडायचं  नाही.

त्यानंतर की नाही, हा  झोपाळा माझा मित्र झाला.

कोणी ओरडलं तरी घेऊन झोपाळ्याला सांगायचं. आनंद वाटला तरी झोपाळ्याला येऊन सांगायचा.

नंतर मग सासुबाई गेल्या, मी करती सवरती झाले हळूहळू घराचे सारे व्यवहार बघू लागले. पण झोपाळ्यावर बसणं, झोपाळा प्रेम काही कमी झालं नाही.

मग नंतर वृद्धापकाळी अहो माझ्या आधी गेले, तेव्हादेखील मी माझं मुक रुदन या झोपाळ्याला सांगितले.

बस हो! अगदी आनंदाने बस! मला तर बाई खूप आवडलीस तू, अगदी माझ्यासारखीच झोपाळा वेडी.

गणेशा! बाहेर ये बाबा, आजीने ने हाक मारली आणि, चक्क तिचा होणारा नवरा समोर उभा राहिला. तो पण हसत हसत.

काय? कसं वाटलं मग सरप्राईज? त्याने विचारले.

अहो पण तुम्ही तर सांगितलं होतं की, जर आजीने होकार दिला तरच पुढे लग्न ठरेल. तुम्ही मुलीला दाखवून या.

मग तुम्ही कसे काय आलात?

तिच्या वडिलांनी विचारले.

बाबा तिने मला तिचं झोपाळा वेड सांगितले, घर बघितल्यावर तिने पहिला प्रश्न मला विचारला

या घरात झोपाळा कुठे बसवता येईल?

आणि मला समजले की ही पण माझ्या आजी सारखे झोपाळा वेडी आहे. म्हणून मी मुद्दामच तुम्हाला इकडे पाठवलं.

बाकी असं काही नव्हतं की, आजीने पसंत केलं तरच मी मुलगी पसंत करेन.

मला पण ती पसंत आहे . आणि माझी आजी काही माझ्या शब्दाबाहेर नाही.

मग काय एकच हशा पिकला आणि लग्नाची तारीख पक्की झाली.

***********************धुमधडाक्यात लग्न देखील पार पडलं ,आणि नववधू माप ओलांडून घरात आली.

आणि घरात आल्यावर तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले, मागच्या वेळी त्याचं घर बघितलं तेव्हा घरात काही नव्हतं, पण आता हॉलमध्ये तिला हवा तसाच साखळी कडीपाठाचा झोपाळा झुलत होता.

अय्या हे काय? झोपाळा कधी बसवला?

आता काय करणार होणाऱ्या बायकोला झोपाळा आवडतो असं कळलं, म्हणून घेतला बसवून. बाई साहेबांची मर्जी राखायला नको का?

झालं ती पहिली झोपाळ्यावर विसावली. पाच मिनीट झाली, दहा मिनीट झाली, ती उठायचं काही नाव घेईना.

तो म्हणाला हे काय आता! रात्रभर झोपाळ्या वरच बसणार की काय?

मग ती नाईलाजाने उठली.

आणि तो म्हणाला जरा टेरेस बघ ना! टेरेस मधून देखावा किती छान दिसतो. यासाठी मी उपनगराच्या थोडा बाहेर परंतु हा टेरेस फ्लॅट पसंत केला .

समोरच डोंगर आहे, सूर्योदय होताना दिसतो, आणि निसर्गरम्य एकदम छान स्वरूप असतं.

मग ती त्याच्याबरोबर टेरेस वरती गेली, बघते तर टेरेस वरती अजून एक झोपाळा.

अरे! अजून एक झोपाळा? ती आश्चर्याने म्हणाली तो फक्त गालात हसला मग टेरेस वरचा नजारा आता राहिला बाजूला, पण झोपाळ्यावर बसून ती आकाशातल्या चांदण्या निरखु लागली.

असं तिला नेहमी वाटायचं की, रात्री आपण झुलता झोपाळ्यावरती, उघड्या आकाशाखाली झोपावं, आणि आकाशातल्या चांदण्या निरखत पडावं. झालं! पुन्हा तिथेच तल्लीन झाली.

मग पुन्हा तो म्हणाला अगं चल ना!

आज आपली पहिली रात्र बेडरूम मध्ये तरी चल,

तो तिच्या खांद्यावर हात टाकुन तिला बेडरूम मध्ये घेऊन गेला आणि मग मात्र तिने आनंदाने त्याला एक घट्ट मिठीच मारली त्याला कारणही तसंच होतं अहो बेडरूम मध्ये देखील एक शृंगारलेल्या झोपाळा होता म्हणजे आजची सुहाग्रात बेडवर नाहीतर झोपाळ्यावर होती तिला तर त्याच्या पुढे काही बोलताच येईना म्हणून त्यांनी आपल्या भावना त्याला घट्ट मिठी मारून व्यक्त केल्या

*******************

मग काय मंडळी पुढचं मला सांगायलाच नको. लवकरच वर्षभरात तिच टेरेस वरती झोपाळ्यावर चांदण्यातल डोहाळजेवण, हॉल मध्ये झोपाळा फुलाने शृंगारुन झोपाळ्यातल डोहाळजेवण, आणि अशी बरीच डोहाळजेवणे झाली, त्यानंतर तिने एका गुटगुटीत मुलीला जन्म दिला, आणि ती पण अशी लब्बाड झोपाळ्यावर ठेवले की रडायचे थांबायची .

अशी पुढे त्यांच्याकडे झोपाळ्याची परंपरा सुरू झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy