जेव्हा मला कळले मी प्रेमात आहे
जेव्हा मला कळले मी प्रेमात आहे
चौदा वर्षांपुर्वीची गोष्ट आहे २७जानेवारीला माझा साखरपुडा झाला आणि लग्नाची तारीख १७/०५/२००५ ठरली मग जानेवारी ते मे या कालावधीत आम्ही दोघे कधी कधी भेटायचो. आमचे हे शिक्षक असल्यामुळे इयत्ता दहावीच्या मुलांचे विज्ञान प्रयोगाचे गुण पुणे दहावी बोर्ड याठिकाणी माहिती देण्यासाठी जाणार होते. त्यामुळे ते माझ्या माहेरी मुक्कामी आले दुसर्या दिवशी ते पुण्याला गेले आणि तेथुन ते थेट शाळेवर गेले मला त्यांचा काही फोन आला नाही मी काळजीत पडले मला त्यांच्याविषयी ओढ वाटायला लागली अजुन तर लग्न व्हायचे होते आणि त्याचवेळेस मला प्रश्न पडला की नक्की आपल्याला काय होतेय. म्हणजेच नकळत मी त्यांच्या प्रेमात पडले हे मला उमगले . त्याक्षणी ...
आई वडिलांनी लहानपणापासून एवढा जीव लावलेला होता तरी त्यांच्याबद्दलची ओढ प्रेम वाढतच होते कारण प्रेम म्हणजे नेमकं काय असतं कुणीतरी कुणासाठी जीव लावलेला असतं जिथं प्रेमासाठी धरणीवर आकाश सुध्दा झुकतं