Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sangieta Devkar

Romance Others


3  

Sangieta Devkar

Romance Others


इश्क का रंग - भाग 2

इश्क का रंग - भाग 2

8 mins 252 8 mins 252

रादर मला लग्नच करायचे नाही आहे.का नाही करायचे आहे लग्न मनु? एकदा विषाची परीक्षा घेतली सर पुन्हा नको आहे मला तो अनुभव. पण सगळे पुरुष सारखेच असतात हे तू का ठरवतेस? माझं मन नाही तयार सर आता मी दुसरं लग्न नाही करणार एकटी राहीन मी. मनु एक लग्न मोडले म्हणून दुसरे ही मोडेल असा का विचार करतेस? तुझे वय काय अजून संपूर्ण आयुष्य पडले आहे तुझ्या समोर. का स्वहताच्याच कोषात स्वहताला जखडून ठेवले आहेस. जीवन परत परत मिळत नसत ग. खूप रंग आहेत या जीवनात त्याचा उपभोग घे. मी नाही ना आवडत तुला ओके तसे नाही सर तुम्ही कोणालाही आवडाल असे आहात. मग तुला नाही आवडत का मी? माझ्या मागे किती मुली लागतात आपल्या ऑफिसच्याच तुला माहिती आहे असे असताना मी तुला प्रपोज करत आहे मनु. सर तुम्हाला कोणतीही सुंदर मुलगी मिळेल मी एक घटस्फोटीता आणि त्यातून तुमच्या पेक्षा मोठी आहे. मग काय झालं मनु प्रेम वय जात धर्म याच्या आधारे होत नाही ग ते फक्त होत . प्रेमात कोणतेच बंधन नसते. तरी ही सर मी लायक नाही तुमच्या साठी. हे मला ठरवू दे ना मनु तू कशी आहेस काय आहेस मला माहित आहे. दोन वर्षे झाली तुला पाहतो आहे मी. तू आणि तुझे हे फिक्के रंग यातच अडकून पडली आहेस तू. बाहेर पड यातून बघ रंगांची दुनिया तुझी वाट बघत आहे. नाही सर मी आहे अशीच राहू दे मला. का हे फिके रंग सोडून दुसरे रंग आले तुज्या आयुष्यात तर काय अनर्थ होणार आहे का?


सर एकटी बाई असते ना तिने गडद रंग वापरून छान मेकअप करून समाजात वावरू नये नाहीतर आजूबाजूला असणारे लांडगे तुटून पडतील तिच्यावर. मी घटस्फोटीता आहे सर लोक मला जगून देणार नाहीत म्हणून मी अशी साधी राहते. मनु अग कोणत्या जगात राहते तू ? लोकां साठी स्वहताचे आयुष्य नीरस बनवलेस . तुझ्या इच्छा आकांक्षा ना काही महत्त्व नाही? तुझं आयुष्य आहे ते तुला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे. लोकांचा विचार करणं सोडून दे. आणि मी आहे ना मी तयार आहे लग्न करायला तुज्याशी . नाही सर आपल्यात वयाच अंतर आहे. असे किती अंतर आहे सांग? मी चार वर्षांनी मोठी आहे सर तुमच्या पेक्षा. मला फरक नाही पडत मनु. नाही सर मी तयार नाही. ओके मनु तुला असच नीरस रंग हीन आयुष्य जगायचे आहे ना. मग जग तसेच पण एकदा माझा विचार कर मग निर्णय घे मी वाट पाहीन तुझी हा पण इतका पण लेट नको करू की माझं ही आयुष्य बेरंग होईल.ज्या दिवशी तुझा होकार असेल त्या दिवशी तू ऑफिसला गडद रंगाच्या कपड्यात येशील. मनु चल मी सोडतो तुला म्हणत आदी निघाला. मनू यंत्रवत त्याच्या मागे निघाली. मनु घरी आली . ती नीता सोबत एका फ्लैट मध्ये राहत होती. काय ग मनु काय काम होत सरांचे तुझ्या कड़े ती आल्या आल्या नीता ने विचारले. काही नाही.


मग तुझा चेहरा का असा उतरला आहे? काही बोलले का ग सांग ना आता मनु. मनुचे डोळे भरून आले तिच्या आयुष्यात प्रेम कधी नव्हतेच आणि आता प्रेम मिळत आहे तर ते ही ती स्विकारू शकत नव्हती आपल्या वर कोणी तरी प्रेम करतंय आपली काळजी घेतय ही भावना इतकी सुखद आहे की त्यामुळे निर्जीव माणसात पण जीव येईल. मनु बस इथे आणि रडतेस का तू बोल ना . मग आदित्य जे बोलला ते सगळ मनु ने नीता ला सांगितले.मनु अग कीती आनंदाची बातमी आहे ही आणि तू रड़तेस ? आदित्य द हैंडसम हंक तो तुझ्या वर प्रेम करतो ओह माय गॉड इट्स ग्रेट मनु . नीता मी त्याला अजुन होकार दिला नाही आहे. आर यू मैड मनु अग आदित्य आहे तो कीती लकी आहेस तू . नीता मला नाही करायचे लग्न आणि मी मोठी आहे त्याच्या पेक्षा . तो बोलला का या बद्दल काही. नाही नीता मी डिवोर्सी आहे ,मोठी आहे याचा त्याला काही ही फरक नाही पड़त म्हणाला. मग तू का नाही बोलतेस मनु  love and opportunity knocks once only. उगाच वेळ घालवू नकोस मनु आदित्य चा विचार कर. मला आता काही ही बोलायचे नाही नीता.दुसऱ्या दिवशी दोघी ऑफिस ला गेल्या. आदित्य अजून आला नवहता. थोडा लेट तो आला. सगळ्यानी त्याला गुड मॉर्निंग विश केले मनु ही बोलली पण आदी ने तिला पूर्णपणे इग्नोर केले. मनु ला त्याच वागणं खटकले. नंतर ही पूर्ण दिवस जो आदित्य काही ही कारण काढून मनु ला केबिनमध्ये बोलवायचा तो आदित्य आज एकदा ही मनु शी बोलला नाही. तो हर्ट झाला आहे हे तिने ओळखले. असाच एक आठवडा झाला. आदी गप्प असायचा ऑफिस मध्ये कामापुरते बोलत असायचा. पण मनु शी बिलकूल बोलत नवहता आता हे कुठेतरी मनु ला ही हर्ट करत होते. तिला आदित्य चे बोलणे आठवत होते. ती बैचेन होत होती. तिला ही प्रेम हवे होते. आपलं अस कोणी तरी हवे होते. राहून राहून आदित्य चा चेहरा डोळ्यासमोर येत होता.


हसतमुख आदी तिच्या नकाराने एकदम शान्त झाला होता. तिने खूप विचार केला. नीता चे बोलणे ही तिला पटू लागले. जेव्हा तिच्या मनाने पण ग्वाही दिली की तिला ही आदित्य आवडतो तेव्हा तिने निर्णय घेतला. आज ऑफिस सुटल्यावर ती मुद्दाम थांबली कारण आदित्य अजून थांबला होता. तिने त्याच्या केबिन बाहेरून नॉक केले येस कम इन आदी बोलला त्याला वाटले पियून असेल. सर मनु ने आवाज दिला तसा आदीत्यने लॅपटॉप वरून आपली नजर वर करून पाहिले. सर असे का वागत आहात माझ्याशी . मी काही चुकीचे केले का? मिस मनवा ऑफिस च काही काम असेल तर बोला नाहीतर जाऊ शकता तुम्ही. सर प्लिज मला समजून घ्या. मनवा मला या विषयावर बोलायचे नाही. जिथे माझ्या फिलिंग्ज ची कदर नाही तिथे मी थांबत नाही. यु मे गो नाऊ. सर एकदा ऐकून तरी घ्या मला काय बोलायचे आहे ते. नो यु विल गो बाय. आदी रागात बोलला. तशी मनु रडतच तिथून बाहेर पडली. आदित्य ला खूप वाईट वाटत होते की मी मनु शी खूप रूड वागलो. पण त्याने असे मुद्दाम केले जेणेकरून तो किती हर्ट झाला आहे हे तिला समजावे म्हणून. मनू घरी आली आणि नीता च्या गळ्यात पडून रडु लागली. ऑफिस मध्ये जे घडले ते सगळं तिला सांगितले. मनु याचा अर्थ तू ही आदित्य वर प्रेम करतेस हो ना नीता ने तिचे डोळे पुसत विचारले. हो या अर्थाने मनु ने मान डोलवली. मग सांगायचे ना त्याला मॅड . त्यांनी ऐकूनच नाही घेतले ग नीता. ओके आता नको रडू हे बघ उद्या तू ऑफिस ला आदित्य तुला बोलला होता तशी मस्त डार्क कलर चा ड्रेस घालून जा मग बघू कसा नाही बोलत तो तुझ्याशी. तू न बोलता ही त्याला तुझा होकार समजेल. पण नीता .आता अजून पण शिल्लक आहे का? अग माझ्या कडे कलर फुल ड्रेस नाही आहेत. ओहह मी विसरलेच होते मॅडम ना फिक्के रंगच आवडत होते ना. चल आता जाऊ आपण शॉपिंग ला आणि बाहेरच जेवून येऊ. सकाळी नीताने मनू ला छान तयार केले.


डार्क पिंक कलरचा कुर्ता आणि व्हाईट अँकल लेगिन्समध्ये मनु क्युट दिसत होती. पिंक लिपस्टिक आयलायनर आणि केस क्लिप लावून मोकळे सोडले होते. आज आदित्य ची विकेट नक्कीच पडणार होती. दोघी ऑफिस ला आल्या. सगळ्यानी आज मनु चे कौतुक केले खुप गोड दिसतेस रोज अशीच येत जा ना ऑफिसला म्हणू लागल्या. आदित्य अजून आला नवहता. मनु आतुरतेने त्याची वाट बघत होती . तो समोर आला तर आपलं हृदय उडी मारून बाहेर येईल अशी भीती तिला वाटत होती. पण आदी आलाच नाही ऑफिस ला. मनुच लक्ष लागत नवहते. दुपार नन्तर आदी ऑफिस मध्ये आला. एक नजर त्याने स्टाफ वर फिरवली आणि मनु ला अशा डार्क कलर च्या ड्रेसमध्ये बघून चाट पडला. ती कामात होती तिचे लक्ष नवहते आज आदित्य येणार नाही असं तिला वाटले होते. म्हणून आदित्यच सर्वांना उद्देशुन बोलला गुड ऑफटर ऐव्हरीबडी तसे सगळ्यानी त्याला ही ग्रीट केले. मनु मात्र आदित्य कडे बघून ब्लँक झाली होती. तिला धडधड जाणवत होती. घाम ही आला. एक चोरटा कटाक्ष तिने त्याच्या कडे टाकला. आदी ने ही तिच्या कडे पाहून न पहिल्या सारखे केले आणि केबिनमध्ये गेला. चेयर वर बसून तो आपल्या लॅपटॉप वर बाहेरचा स्टाफ बघत होता खास करून मनु ला बघत होता. पिंक कलर उठून दिसत होता तिला. ती काम न करता कसल्या तरी विचारात होती. आदी मात्र गालातल्या गालात हसत होता. मनु सुंदर दिसत होती.


काल जे रूड बोललो त्याचा परिणाम त्याला समोर दिसत होता. मनु ने त्याचे प्रेम स्वीकारले होते म्हणूनच ती आज डार्क कलरचा ड्रेस घालून आली होती. आदी ची नजर लॅपटॉप वरून हटत नवहती. ऑफिस सुटले तसे पियून ने मनु ला बॉस नी बोलावले आहे असा निरोप दिला. मनु बघ आया पहाड उंट के नीचे जा आणि त्याला सांगून टाक तुझ्या मनातले नीता बोलली. नीता मला जाम भीती वाटते. अरे यार यात घाबरण्या सारख काय आहे. जा तुझा मजनू वाट बघत आहे तुझी म्हणत नीता बाय बोलून निघून गेली. मे आय कम इन सर .येस प्लिज आदी बोलला. मनु आत आली मिस मनवा बसा. तशी ती त्याच्या समोरच्या चेयर वर बसली. ओढणी हातात धरून बोटाला गुंडळत बसली होती. आदित्य तिच्या बाजूला उभा राहिला मनु आय एम सॉरी काल रूड बोललो ना मी तुला. नाही सर इट्स ओके. त्याने तिचा हात हातात घेतला तसे तिचे अंग शहारून गेले. मनु तिच्या नजरेत बघत तो बोलला. मनु तु आज का डार्क कलर चा ड्रेस घातला आहेस. ती एकदम वेधळया सारखी बोलून गेली की सर तुम्हीच म्हणाला होता ना की तुझा होकार असेल तर डार्क कलर च्या ड्रेसमध्ये ये. ओहहह म्हणजे तू ही माझ्यावर प्रेम करतेस. आपण काय बोलून गेलो याचा अर्थ तिला समजला तशी ती घाबरून म्हणाली नाही सर ते. मनु मनु का घाबरतेस अशी रिलॅक्स. ती मान खाली घालून बसली होती.


आदी ने तिचा चेहरा वर उचलला खूप सुंदर दिसतेस मनु. हा रंग तुला खूप छान दिसत आहे. प्रेमाचा रंग गुलाबी हो ना. तिने फक्त मान हो म्हणून हलवली. आय लव यु सो मच मनू. तिच्या डोळ्यांत पाणी आले. अरे का रडतेस आता. सर इतक्या प्रेमाची सवय नाही ओ मला. मग आता सवय करून घे मी खूप खूप प्रेम करणार आहे तुज्यावर आयुष्यभर. विल यु मॅरी मि? हो सर हे काय नुसतं हो सर नाही सर पूर्ण वाक्य बोल. काय बोलू तुम्ही घ्या ना समजून सर. नो मी जे बोललो ते तू पूर्ण बोल. ती त्याच्या गहिऱ्या ब्राऊनिश डोळ्यात बघत म्हणाली सर आय रियली लव यु. म्हणत ती खाली बघू लागली. परत त्याने तिचा चेहरा वर केला म्हणाला,सर नाही फक्त आदित्य बोल. हो आदित्य आय लव यु म्हणत तिने लाजून आपला चेहरा त्याच्या कुशीत लपवला. त्याने तिच्या केसांवर हात फिरवत लव यु टू म्हणाला. ती बाजूला झाली तसे आदी ने पुन्हा तिला जवळ ओढले मनु तुझं आयुष्य मी माझ्या प्रेमाच्या रंगानी उजळून टाकणार आहे . तू कायम अशीच रंगीबेरंगी फुलां सारखी हसत रहा. आदित्य ने आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिचे दीर्घ चुंबन घेतले. बेरंग मनु च्या जीवनात आदित्य आता प्रेमाचे रंग भरणार होता.


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Romance