Jyoti gosavi

Comedy

2.3  

Jyoti gosavi

Comedy

हुलाहुल आणि कुत्र्याला झुल

हुलाहुल आणि कुत्र्याला झुल

1 min
97


ही एक ग्रामीण पारंपारिक म्हण आहे. 

काही माणसांना उगाचच हुलाहूल करण्याची सवय असते, 

हुलाहूल म्हणजे उगाचच मोठेपणा, उगाचच बडे जाव, 

मी यांव करतो, मी त्यांव करतो मला हे येत, मला ते येत, असा बडे जाव काही लोकांना मिरवण्याची सवय असते ,पण प्रत्यक्षात मात्र काही येत नाही.

याबाबत एक कथा सांगितली जाते. 

एका गावात एक शिंपी असतो ,तर तो नेहमी सगळ्या गावाला मोठेपणा करून सांगत असतो, की मी सगळ्यात भारी कपडे शिवतो ,मी असा करतो मी तसा करतो . 

बादशहाच्या घोड्यांच्या झुली मलाच शिवायला मिळतात, स्वारी ज्या हत्तीवर बसते त्या हत्तीची झूल मीच शिवतो .

 खावींदांचे कपडे मीच शिवतो, त्याच्या या बोलण्यामुळे त्या गावातील जमीनदार आपल्या घोड्याची झूल शिवायला त्या शिंप्याकडे देतो. प्रत्यक्षात हा इतका भित्र असतो की, तो घोड्याच्या जवळ जाऊन माप घेतच नाही .तर सांगतो की नजरेने बघूनच मला माप कळते. मी बरोबर शिवून देईन. 

मग त्यानुसार तो सावकार त्याला मखमली कपड्याची झूल शिवायला देतो.

पण प्रत्यक्षात हा एवढी लहान झुल शिवतो की, ती घोड्याच्या मापाची होण्याऐवजी कुत्र्याच्या मापाची होते आणि घोड्या ऐवजी ती कुत्र्याला बसते. मग तो सावकार रागाने त्याला चाबकाचे फटकारे मारतो ,आणि नुकसान भरपाई म्हणून त्याचे सर्व कपडे जप्त करतो. 

 तेव्हा सर्व गाव त्या शिंप्याला हसू लागते

 तेंव्हा पासून 

"हुलाहूल आणि कुत्र्याला झूल" अशी म्हण पडली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy