Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Sangieta Devkar

Romance Others

4.0  

Sangieta Devkar

Romance Others

हँग ओव्हर - भाग 5

हँग ओव्हर - भाग 5

5 mins
358


मोहित जा लवकर नाहीतर मी येत नाही. बर जातो म्हणत जाता जाता त्याने तिच्या गालावर किस दिला. मॅड आहेस तू मोहित ती हसुन म्हणाली. छान आवरून आली मितु पिस्ता कलरचा टॉप आणि पिंक प्लाझो तिने घातला होता. दोघे मोहित च्या घरी आले. ती म्हणाली घरी सांगितले आहेस ना . हो चल. मोहीत चा मोठा दोन मजली बंगला होता. बंगल्याच्या आवारात गार्डन आणि झोका ही होता. लाँनवर बसण्यासाठी छोटे टेबल आणि खुर्च्या होत्या. मीतूला घर खूप आवडले. कार पार्क करून मोहित तिला घेऊन घरात आला . आई बाबा कुठे आहात. त्याचा आवाज ऐकून आई बाबा हॉल मधये आले. मोहितच्या आई एकदम खानदानी पण चेहऱ्यावरून हसतमुख होत्या. बाबा एकदम कडक कोल्हापुरी देशमुख शोभत होते. अरे मोहित मैथिली या बसा आई म्हणाल्या. मीतूने आई बाबा ना वाकून नमस्कार केला. बाबा म्हणाले काय पत्रकार मॅडम घर आवडले का ? हो बाबा खूपच छान.


मैथिली काय खाणार तू आई ने विचारले. काही नको आई फक्त चहा चालेल. अग हे घर तुझेच आहे लाजू नकोस. नको आई खरंच भूक नाही. आई ती काय लाजत बिजत नाही एकदम डॅशिंग आहे.ती डोळे मोठे करत मोहित कडे पाहू लागली. हा मग देशमुखांची सून डॅशिंगच हवी काय मोहित राजे ? बाबा बोलले. बरोबर बाबा. घरचे हे मनमोकळे वातावरण मीतूला खूप आवडले. अरे आपले लाडोबा कुठे गायब मोहितने विचारले. अजिंक्य ला थोडा लेट होणार होता येईल आता आई म्हणाली. तोपर्यंत चहा आला. मीना स्वयंपाकाची तयारी कर मी आलेच आई मीनाला म्हणाल्या. मीना स्वयंपाक करायला बंगल्यावर यायची. मैथिली तू आता जेऊनच जा. हो आई तिला ही मोहित सोबत वेळ घालवायचा होता.सूनबाई तुमच्या आई वडिलांना लवकर बोलावून घ्या बाबा म्हणाले. हो बाबा आजच फोन करते. मोहित मैथिली ला घर दाखव सगळे आई म्हणाली. आई बाबा अजून एक सांगायचे होते. के मोहित बाबानी विचारले. उद्या पासून आपल्या बंगल्याला पोलीस प्रोटेक्शन असेल मला आणि तुम्हाला कोणी त्रास देवू नये म्हणून ,अजयने हे ठरवले आहे. ठीक आहे बाबा म्हणाले.इतक्यात अजिंक्य ही आला मीतूला पाहून म्हणाला,हॅलो वहिनी कशा आहात माय सेल्फ अजिंक्य तुमचा होणारा छोटा दीर. हॅलो अजिंक्य आय एम फाईन. अज्जू तू फ्रेश हो त्या दोघांना बसू दे बोलत आई म्हणाली. जा दादया वहिनीशी फक्त गप्पा मार काय...☺️☺️ मोहित त्याला मारायची अँकटिंग करू लागला तसा अजिंक्य त्याला ठेंगा 👍 दाखवत पळाला.


मीतूला हे सगळं छान वाटत होतं. चल मितु घर दाखवतो असे म्हणत मोहित ने मीतूला सगळं घर दाखवले आणि शेवटी त्याच्या रूम मध्ये आला मितु ही रूम आपली. रूम मध्ये मोहितला मिळालेली खूप सारी बक्षिसे होती. त्याचे कॉलेज मधले फोटो होते . मोहित तू बास्केटबॉल खेळायचास का? हो चॅम्पियन होतो मी,कॉलेज ला खूप प्राइज मिळवून दिले. वा छानच,पण किती बारीक होता तू मोहित!! हु,,आणि आता कसा आहे? तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. आता ना एकदम ऑसम,दिसतोस. मोहित ने तिला जवळ ओढले. मोहित काय करतोस कोणी येईल ना? नाही येत कोणी एक चॉकलेट म्हणत त्याने तीच्या ओठांवर बोट ठेवले . अरे अजिंक्य ये ना मितु म्हणाली तसे मोहितने मागे पाहिले तर कोणीच नवहते.मितु हसू लागली..आता कोण भित्रा असे म्हणत ती त्याच्या पासुन दूर झाली. अच्छा नंतर बघुन घेईन तुला मोहित म्हणाला. बर चल आपण लॉन वर बसु मीतू म्हणाली. दोघे लॉनवर गप्पा मारत बसले. थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले. बाबा म्हणाले मैथिली येत्या रविवारी तुझ्या आई बाबा ना घरी बोलवले आहे असे सांग. हो चालेल बाबा. मोहित तिला घरी सोडायला निघाला. पुन्हा मितु आई बाबाच्या पाया पडली. सर्वांनाच ती खूप आवडली. . दुसऱ्या दिवशी सकाळीच मीतूने आई ला फोन केला आणि मोहीत आणी त्याच्या घरच्या बद्दल सगळ सांगितले. मोहित चा फोटो पाठवला. तिचे आई बाबा खुश झाले आणि शनिवारीच कोल्हापूर ला येतो म्हणाले.


मितु ने ही गोष्ट मोहितला सांगीतली. विक्रांत लाही तिने फोन केला. तो ही खुश झाला. शनिवारी मीतूला सुट्टी असे तरी ती लवकर उठून आवरून बसली आई बाबा आणि सौरभ येणार होते. दुपारी सगळे आले. तिने मोहित ला संध्याकाळी घरी यायला सांगितले. मोहित संध्याकाळी आला. लाइट पिंक कलर चा शर्ट आणि ब्लू जीन्स मध्ये तो आला होता. थोडी स्ट्रीम केलेली बियर्ड खुप स्मार्ट दिसत होता मोहित. आई बाबानी त्याला बसायला सांगितले. मीतू पानी आणायला गेली. मोहित ही आई बाबांच्या पाया पडला. कसे आहात मोहित राव? बाबा मला फक्त मोहित म्हणा ते मला जास्त आवडेल. बर चालेल. हॉउ आर यू सौरभ मिहितने विचारले. आय एम फाइन जिजु. जिजु म्हणटले तर चालेल ना? सौरभ ने विचारले. तूझ्या ताई ला आवडत असेल तर मला ही चालेल. यावर सगळेच हसू लागले. कॉफ़ी घेत सर्वजन गप्पा मारत होते. आई बाबां आणि सौरभ लाही मोहित फार आवडला. उदया घरी जेवायलाच या असे सांगून मोहित निघाला. मीतू त्याला खाली सोडायला गेली. मग राणी सरकार खुश ना आता. हो खुपच. पण मी नाही खुश. काय झाले मोहित? आमचे एक काम पेंडिंग आहे तुमच्या कड़े राणी सरकार. कोणते मोहित. तसा मोहित आपल्या ओठां वर बोट ठेवत म्हणाला,चॉकलेट नाही मिळाले अजुन आम्हाला. हो का जा आता जास्त गोड खायचे नसते असे म्हणत मीतू ने त्याला बाय केले. हसत तो कार मध्ये बसला . तिला बाय करून निघाला. सकाळी लवकर उठून मीतू सौरभ आई बाबा तयार झाले. मैथिली ने आज आई ची पिंक पैठणी नेसली होती गळ्यात मोत्यांची माळ, कानात झुमके,हातात पिंक आणि गोल्डन कलर च्या बांगडया खुप सुंदर दिसत होती मीतू.


मोहितचा फोन आला तो त्यांच्यासाठी कार आणि ड्राईवर पाठवून देतो म्हणाला. थोड्याच वेळात सगळे मोहितच्या घरी आले. मोहित चा बंगला पाहूनच आई बाबा आनंदी झाले. मोहित दरवाज्या पाशी आला आई बाबा या बसा म्हणाला. मितुला पाहुन तर तो वेडाच झाला. पुन्हा पुन्हा त्याची नजर तिच्या कड़े जात होती. आणि मीतू ब्लश करत होती☺️☺️. आई साहेब म्हणालया मीतू किती गोड दिसतेस आज. थैंक्यू आई ती म्हणाली. मोहितने सगळ्यांनाची ओळख करून दिली. मोहित म्हणाला सध्या माझी खुप धावपळ सुरू आहे 3 महिन्यावर इलेकशन आले आहेत . तुम्ही सर्वानी ठरवा कसे करायचे. सगळ्यांनी विचारांती असे ठरवले की 15 दिवसांनी साखरपुडा करू आणि निवडणुका झाल्यानंतर लग्नाची तारीख फिक्स करू. मग एकत्र जेवन झाले. मोहित म्हणाला,साखरपुडयाची सगळी खरेदी पुण्यात करू. चालेल सर्वजन म्हणाले. मोठी लोक साखरपुडयाची तयारी कशी करायची याचे प्लैनिंग करत बसले. सौरभ अजिंक्य सोबत होता.


मोहित त्याच्या रूममध्ये गेला आणि मितुला मेसेज केला रूम मध्ये ये. तसे ही तिला त्याला भेटायचे होतेच . आई मि येते असे म्हणत मीतू तिथुन उठली आणि मोहित कडे आली. काय बोल मोहित. त्याने तिला आपल्या जवळ ओढत दुसऱ्या हाताने दार लावले. अरे काय करतोस कोणी येईल ना मोहित? येवू दे आता लग्न ठरले आपले आणि आज काय रापचिक दिसतेस तू यार.. काय दिसते रापचिक? अग ही आमची कोल्हापुरी भाषा आहे आता तू पन कोल्हापूर ची होणार . काही ही काय मोहित? बर ते सोड एक कीस्सी तो आज बनती ही हैं जान. नाही हा कोणी तरी येईल मी जाते. तसे मोहितने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिचे प्रदीर्घ चुंबन घेतले. मितु जान तुला मिठीतून दुर करावेसेच वाटत नाही इतकी हॉट दिसतेस. हो का राजे चला आता खाली नाहीतर आपले आई बाबा आपल्याला शोधत इकडे येतील. हम्म चला राणी सरकार. दोघ खाली येतात. तसे अजिंक्य म्हणतो आई मी बोललो ना दोघ एकत्र येतील म्हणून. तसे सगळे हसू लागतात. मैथिली लाजून खाली पाहत राहते.

(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Romance