हँग ओव्हर - भाग 5
हँग ओव्हर - भाग 5
मी इथेच बसणार मोहित म्हणाला. मोहित जा लवकर नाहीतर मी येत नाही. बर जातो म्हणत जाता जाता त्याने तिच्या गालावर किस दिला. मॅड आहेस तू मोहित ती हसुन म्हणाली. छान आवरून आली मितु पिस्ता कलरचा टॉप आणि पिंक प्लाझो तिने घातला होता. दोघे मोहित च्या घरी आले. ती म्हणाली घरी सांगितले आहेस ना . हो चल. मोहीत चा मोठा दोन मजली बंगला होता. बंगल्याच्या आवारात गार्डन आणि झोका ही होता. लाँनवर बसण्यासाठी छोटे टेबल आणि खुर्च्या होत्या. मीतूला घर खूप आवडले.
कार पार्क करून मोहित तिला घेऊन घरात आला . आई बाबा कुठे आहात. त्याचा आवाज ऐकून आई बाबा हॉल मध्ये आले. मोहितच्या आई एकदम खानदानी पण चेहऱ्यावरून हसतमुख होत्या. बाबा एकदम कडक कोल्हापुरी देशमुख शोभत होते. अरे मोहित मैथिली या बसा आई म्हणाल्या. मीतूने आई बाबा ना वाकून नमस्कार केला. बाबा म्हणाले काय पत्रकार मॅडम घर आवडले का ? हो बाबा खूपच छान. मैथिली काय खाणार तू आई ने विचारले. काही नको आई फक्त चहा चालेल. अग हे घर तुझेच आहे लाजू नकोस. नको आई खरंच भूक नाही. आई ती काय लाजत बिजत नाही एकदम डॅशिंग आहे.ती डोळे मोठे करत मोहित कडे पाहू लागली. हा मग देशमुखांची सून डॅशिंगच हवी काय मोहित राजे ? बाबा बोलले. बरोबर बाबा. घरचे हे मनमोकळे वातावरण मीतूला खूप आवडले. अरे आपले लाडोबा कुठे गायब मोहितने विचारले.
अजिंक्यला थोडा लेट होणार होता येईल आता आई म्हणाली. तोपर्यंत चहा आला. मीना स्वयंपाकाची तयारी कर मी आलेच आई मीनाला म्हणाल्या. मीना स्वयंपाक करायला बंगल्यावर यायची. मैथिली तू आता जेऊनच जा. हो आई तिला ही मोहित सोबत वेळ घालवायचा होता.सूनबाई तुमच्या आई वडिलांना लवकर बोलावून घ्या बाबा म्हणाले. हो बाबा आजच फोन करते. मोहित मैथिली ला घर दाखव सगळे आई म्हणाली. आई बाबा अजून एक सांगायचे होते. के मोहित बाबानी विचारले. उद्या पासून आपल्या बंगल्याला पोलीस प्रोटेक्शन असेल मला आणि तुम्हाला कोणी त्रास देवू नये म्हणून, अजयने हे ठरवले आहे. ठीक आहे बाबा म्हणाले.इतक्यात अजिंक्य ही आला मीतूला पाहून म्हणाला,हॅलो वहिनी कशा आहात माय सेल्फ अजिंक्य तुमचा होणारा छोटा दीर. हॅलो अजिंक्य आय एम फाईन. अज्जू तू फ्रेश हो त्या दोघांना बसू दे बोलत आई म्हणाली. जा दादया वहिनीशी फक्त गप्पा मार काय...☺️☺️ मोहित त्याला मारायची अँकटिंग करू लागला तसा अजिंक्य त्याला ठेंगा 👍 दाखवत पळाला. मीतूला हे सगळं छान वाटत होतं. चल मितु घर दाखवतो, असे म्हणत मोहित ने मीतूला सगळं घर दाखवले आणि शेवटी त्याच्या रूम मध्ये आला मितु ही रूम आपली.
रूममध्ये मोहितला मिळालेली खूप सारी बक्षिसे होती. त्याचे कॉलेजमधले फोटो होते . मोहित तू बास्केटबॉल खेळायचास का? हो चॅम्पियन होतो मी,कॉलेज ला खूप प्राइज मिळवून दिले. वा छानच,पण किती बारीक होता तू मोहित!! हु,,आणि आता कसा आहे? तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. आता ना एकदम ऑसम,दिसतोस. मोहित ने तिला जवळ ओढले. मोहित काय करतोस कोणी येईल ना? नाही येत कोणी एक चॉकलेट म्हणत त्याने तीच्या ओठांवर बोट ठेवले. अरे अजिंक्य ये ना मितु म्हणाली तसे मोहितने मागे पाहिले तर कोणीच नवहते.मितु हसू लागली..आता कोण भित्रा असे म्हणत ती त्याच्या पासुन दूर झाली. अच्छा नंतर बघुन घेईन तुला मोहित म्हणाला. बर चल आपण लॉनवर बसु मीतू म्हणाली. दोघे लॉनवर गप्पा मारत बसले. थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले. बाबा म्हणाले मैथिली येत्या रविवारी तुझ्या आई बाबा ना घरी बोलवले आहे असे सांग. हो चालेल बाबा. मोहित तिला घरी सोडायला निघाला. पुन्हा मितु आई बाबाच्या पाया पडली. सर्वांनाच ती खूप आवडली. दुसऱ्या दिवशी सकाळीच मीतूने आई ला फोन केला आणि मोहीत आणी त्याच्या घरच्या बद्दल सगळ सांगितले. मोहित चा फोटो पाठवला. तिचे आई बाबा खुश झाले आणि शनिवारीच कोल्हापूरला येतो म्हणाले. मितुने ही गोष्ट मोहितला सांगीतली. विक्रांत लाही तिने फोन केला. तो ही खुश झाला.
(क्रमशः)