Author Sangieta Devkar

Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Romance Tragedy

हमसफर

हमसफर

5 mins
149


निखिल ला खूप टेंशन आले होते. अस होणे शक्यच नाही माझी प्रियु अस वागूच शकत नाही . त्याच मन त्याला सांगत होत पण समोर दिसणारी प्रियंका च्या लग्नाची पत्रिका खोटी कशी काय असेल? त्याने तिला खूप कॉल केले पण दरवेळी नंबर स्विच ऑफ लागत होता. तो कंपनीच्या कामासाठी सहा महिने परदेशी आला होता. त्याच एक महत्त्वाचे ट्रेनिंग होते. त्याच्या शिवाय जगायची ही कल्पना प्रियु ला अवघड झाली होती ती प्रियु आज लग्न करायला निघाली होती. कस शक्य आहे हे ? विचार करून करून निखिल चे डोके बधिर झाले. शान्त बसला होता तो आणि डोळ्यातुन आसवे वाहत होती. डोळ्यातील पाण्या समोर धूसर असा प्रियु चा चेहरा त्याला दिसत होता.

निखिल काय हे अचानक ? आता तर आपला साखरपुडा झाला आणि तू फॉरेन ला निघाला सुद्धा. प्रियु अग कंपनी चे ट्रेनिंग आहे सहा महिने सहज जातील ग. मी रोज कॉल करेन तुला. खूप समजूत काढली होती निखिल ने. त्याला ही तिला सोडून अजिबात करमणार नवहते. तो परत आला की लगेच लग्न अस ठरले ही होते. पण सगळ्या स्वप्नांवर आता पाणी फिरले होते. अशी कोणती अडचण आली असेल की प्रियु ने असा निर्णय घेतला ? साखरपुडा मोडते मी आणि लग्न करत आहे इतकाच मेसेज तिने केला होता. निखिल ने त्याच्या घरी कॉल लावून विचारले तर हेच उत्तर मिळाले. त्याच्या आई वडिलांनी प्रियंकाला आणि तिच्या आई बाबा ना खूप बोल लावले. आमच्या मुलाला फसवले अस खूप काही बोलले ते. प्रियंका शी बोलू दिले नाही ती गावी गेली आहे असं सांगितले. निखिल चा नाईलाज झाला पण भारतात परत गेल्यावर प्रियंकाला या गोष्टीचा जाब नक्की विचारेन अस त्याने ठरवले.

सहा महिने संपले. निखिल चे ट्रेनिंग पूर्ण झाले तो घरी परत आला. पण काहीतरी सर्वस्व गमावले असेच भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. आई बाबा त्याच दुःख जाणून होते. ते काही ही बोलले नाहीत. वेळ हा सगळ्या दुखण्यावरचा जालीम उपाय आहे असं मानून ते ही गप्प बसले. निखिल एकदा प्रियंका ला भेटायला तिच्या घरी गेला तेव्हा तिचे घर बंद होते. ती कुठे असेल याची काहीच कल्पना त्याला येत नवहती. तिला एकदा भेटून त्याला लग्न मोडण्याचे कारण फक्त जाणून घ्यायचे होते. मागे एकदा त्याला समजले होते की प्रियंका चे गाव कोकणात आहे. पण नेमके कोणते हे त्याला नवहते माहीत. उदास ,खिन्न मनाने तो घरी परत आला. प्रियु वर त्याच जिवापाड प्रेम होत. तिला विसरणं त्याला शक्य नवहते. असेच दोन महिने गेले. घर ऑफिस अस निखिल च रुटीन सुरू होत. ऑफिस स्टाफ ची सहल काढायची असा प्लँन ऑफिसमध्ये सुरु होता. गणपतीपुळे आणि बाकीचा कोकण परिसर फिरून यायचे ठरले. अनइच्छेने निखिल स्टाफ सोबत पिकनिक ला जायला तयार झाला. चार दिवस कोकणात राहायचा प्लॅन होता. सगळे मस्त एन्जॉय करत होते. निखिल मात्र शांत बसत होता. अक्षय त्याचा कलीग त्याला त्याच्या बद्दल माहिती होते. निखिल अरे अजून किती दिवस त्याच त्याच गोष्टीचे दुःख करत बसणार. आयुष्य कोण साठी थांबत नाही चल एन्जॉय कर. मस्त रहा म्हणत अक्षय त्याला ओढतच बाहेर घेऊन गेला. दोघे कोकण च्या बाजारात फेरफटका मारत होते. मासे आणि इतर वस्तूंची ती बाजारपेठ होती. नुसता कलकलाट होता तिथे. एका दुकानात अक्षय काही लाकडी शोच्या वस्तू बघत होता. निखिल ही होता. आई हा देव्हारा बघ छान आहे एकदम प्राचीन वाटतो असा कोणाचा तरी आवाज निखिल ला ऐकू आला. तो आवाज सेम प्रियु सारखा वाटत होता. आपल्याला भास झाला असेल म्हणून निखिल ने दुर्लक्ष केले पण पुन्हा काहीतरी बोलण्याचा आवाज आला . हा आवाज नक्की प्रियु चा आहे हे निखिल ने ओळखले . अक्षय तू बघ इथे मी आलोच दोन मिनिटात म्हणत निखिल दुकाना बाहेर आला. समोर प्रियु होती तिला बघून त्याच्या डोळ्यातुन अश्रू वाहू लागले. त्याने नीट पाहिले तर प्रियु व्हिल चेयर वर बसली होती आणि तीची आई सोबत होती. प्रियु म्हणत त्याने तिला आवाज दिला . त्याला अचानक आपल्या समोर बघून प्रियंका ही गोंधळली आणि ती ही रडू लागली. तिच्या जवळ येत निखिल म्हणाला, प्रियु खोटं का बोललीस ? माझं काय चुकले होते? आणि हे तुला अचानक काय झाले तिच्या पायांकडे बघत तो म्हणाला. निखिल आपण घरी जाऊन बोलूयात का तिची आई म्हणाली. चालेल म्हणत निखिल त्यांच्या सोबत निघाला. अक्षय ने बाहेर येऊन त्याला आणि प्रियंकाला बघितले होते. त्याने जा असा इशारा केला निखिल ला.

प्रियु चे घर बाजारा पासून जवळच होते. आई नी त्याला पाणी दिले. प्रियु सोफ्यावर बसली होती. तिच्या जवळ जात निखिल म्हणाला, हे सगळं काय आहे आणि तू मला काहीच का नाही सांगितलेस? प्रियु रडत बोलू लागली. निखिल तू फॉरेन ला गेलास आणि दोन महिन्यानंतर माझा एक अपघात झाला. त्यात मी माझा एक पाय कायमचा गमावला. तुझं माझ्या वर खूप प्रेम आहे हे मी जाणून होते त्यामुळे तू मला या अवस्थेत बघू शकला नसतास. तुझ्या समोर तुझं संपूर्ण आयुष्य पडले होते ते तू माझ्या सारख्या अपंग मुली सोबत घालवावे अस मला वाटत नवहते. मग मी हळूहळू तुला मेसेज, कॉल करणे बंद केले. तुला माझ्या अपघाता बद्दल समजले असते तर तू त्या ही स्थितीत माझ्याशी लग्न केले असतेस म्हणूनच मी एक खोटी लग्न पत्रिका बनवून तुला पाठवून दिली. पुण्यात ले घर आम्ही रेंट ने दिले आणि इथे येऊन राहू लागलो. माझा नंबर ही मी बंद केला. प्रियु अग तुझा माझ्यावर विश्वास नवहता का? मी प्रेम केलं आहे तुझ्यावर ते इतकं कमकुवत नाही ग आणि लग्नानंतर जर तुला अपघात झाला असता तर मी काय तुला सोडून दिली असती का? माझ्या प्रेमाची हीच पारख केलीस का? तुझ्या शिवाय रोज एक दिवस मी जिवन्तपणी मरण अनुभवत होतो. आय रियली लव यु प्रियु आणि तू जशी आहेस तशी मला हवी आहेस तो तिचे हात पकडून रडू लागला. निखिल आय अल्सो लव यु प्रियंका ही म्हणाली. प्रियंकाचे आई बाबा खूप खुश झाले. असा जीवनसाथी प्रियंका साठी शोधून सापडला नसता. निखिल ने मग प्रियु आणि तिच्या आई बाबांना आपल्या सोबत पुण्याला घेऊन आला. त्याच्या आई बाबांना प्रियंका बद्दल त्याने कल्पना दिली. पुण्यात आल्यावर लवकरच चांगला मुहूर्त बघून निखिल आणि प्रियु चे लग्न झाले. " तुम साथ हो तो कट जायेगा कोई भी सफर,बस्स तू हमेशा साथ देना ये मेरे हमसफर"!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance