Sangieta Devkar

Romance Tragedy Others

4.8  

Sangieta Devkar

Romance Tragedy Others

हमे तुमसे प्यार कितना

हमे तुमसे प्यार कितना

10 mins
1.7K


आजचा दिवस खुपच खास होता. मृणाल ला तिच्या कथेचे बक्षिस मिळणार होते, तिची कथा एका दिवाळी अंका मध्ये प्रथम क्रमांकाने प्रसिद्ध झाली होती. या बक्षिस समारंभाला ती आली होती. संपूर्ण ऑडीटोरियम भरगच्च भरलेला होता. प्रमुख पाहुणे मंडळी स्टेज वर बसलेली होती. निवेदकाने उपस्थितांचे स्वागत केले. आणि म्हणाले,तुम्हा सर्वाचा मी जास्त वेळ घेत नाही,दोनच मिनिटात अजुन एक विशेष सर्वांचे आवडते युवा नेता इथे येत आहेत,,ते पहा आलेच आपले युवा नेता,मा.मोहित नींबाळकर,जोरदार टाळयांनी त्यांचे स्वागत करूया. असे म्हणत निवेदकाने मोहित चे स्वागत केले,मृणाल मोहित कड़े पहातच राहिली,तिचा पुरता गोंधळ उडाला होता. मोहित च्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली,मृणाल ला पाहून तो ही आश्चर्य चकित झाला.तिला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते,याचा त्याला ही खुप आनंद झाला होता. अभिनंदन मृणाल,तिचा हात् हातात् घेत मोहित ने तिला शुभेच्छा दिल्या.तिने ही त्याचे आभार मानले. कार्यक्रम संपला. मृणाल हॉल बाहेर आली,तोच मागून आवाज आला,मृणाल,एक मिनिट ,तिने मागे पाहिले मोहित तिच्या कडेच येत होता. तो म्हणाला,मृणाल तुझी हरकत नसेल तर आपण कॉफी घेऊयात का? मोहित खरतर आता,,तिला मध्येच टोकत मोहित म्हणाला,प्लीज मृणाल नाही म्हणू नकोस.ओके चल घेऊया. बाजुलाच एक कैंटीन होते,तिथे ते गेले. त्याने कॉफी ची ऑर्डर दिली,तिला म्हणाला,मृणाल कशी आहेस तू? आणि कोल्हापुर ला कधी आलीस?


'मि ठीक आहे मोहित,आणि इथे येउन झाले 3/4 महीने.'

'मृणाल काय सांगतेस, इतके दिवस तू कोल्हापुर मध्ये आहेस,निदान मला सांगायचे तरी,,किमान एक कॉल,एक मेसेज,,,!'

'मोहित, तू हे बोलतोस,? मग गेली वर्षभर मी तुला केलेले मैसेजेस,कॉल्स,,याचे रिप्लाय कुठे आहेत?' मृणाल रागातच बोलली.

'मुनु,माझी परिस्थिति वेगळी होती ग,मी तुला रिप्लाय नाही दिला यामागे तसेच जेनियून कारण होते ,तुला नाही समजनार . मला माहित आहे, माझे वागणे चुकीचे होते पण तुझ्या काळजी पोटीच मी तसा वागलो.'

'राहु दे, मोहित शेवटी तू ही एक पॉलिटीशन, तू आमच्या सारख्या क्षुल्लक् लोकांना का लक्षात ठेवशील? मोहित तुला मी मुर्ख वाटले असेन् ना, तुला इतके मैसेज केले,कॉल केले,पण तू दगडा सारखा निश्चल बनून राहिलास ना, मृणाल नावाची आपली एक जिवलग मैत्रिण आहे,हे ही तू विसरलास,!!'

'तसे नाही मुनु,पण मी तुला खुप दुखवले आहे,त्यासाठी ऍम एक्सट्रिम्ली सॉरी,,मी तुझ्याशी बोलणे बंद केले,याचा अर्थ मी आपली मैत्री विसरलो,असा होत नाही ना!'

'मोहित तुला माहित नाही, अभय गेल्यावर मला तुझ्या आधाराची मैत्रीची किती गरज होती,पण तू मला पूर्णपणे इग्नोर केलेस. का मोहित असा का वागलास तू? आपली मैत्रीण कशी आहे,काय करत असेल,कोणत्या स्थितीत असेल,हे प्रश्न तुला पड़लेच नाहीत का? आपली घट्ट नितळ मैत्री तू कसा विसरलास?'

'नाही ग,मृणाल मी काही ही विसरलो नव्हतो,इवन मी अभयचा पण मित्र होतो,पण तेव्हा जर तुझ्या कॉन्टेक्ट मध्ये राहिलो असतो,तर मग तुझ्या नजरे तुन कायमचा उतरलो असतो, तुझा खुप मोठा गैरसमज झाला असता.'


तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता, ती म्हणाली, मोहित मला काहिही समजत नाही,तू काय हे कोड्यात बोलतो आहेस? मला समजेल असे काही बोल, बाय द वे मोहित तुझे लग्न झाल्याचे समजले, कशी आहे रे बायको तुझी? मला फोटो दाखव ना तिचा. तिच्या या बोलण्याने त्याचा चेहरा पुर्णपणे उतरला होता, त्याला सूचत नव्हते काय बोलावे,तो म्हणाला, मुनु अजुन एक एक कॉफी घेऊयात?

मोहित, विषय का टाळतो आहेस? मला पाहायच आहे या साडेसहा फुट ऊंच अभिषेक बच्चन ची बायको आहे तरी कोण? मोहित म्हणाला, मृणाल माझ्या कड़े तिचा फोटो नाही.

'हो,का,, की ती इतकी सूंदर आहे की माझी नजर लागेल तीला?' ती त्याला चिडवन्या साठी बोलली.

'प्लीज मुनु,ना तिचा फोटो आहे ना ती आहे माझ्या जवळ!! 'मोहित थोड़ा रागात च म्हणाला

   म्हणजे ,? काय बोलतोस मोहित ,नीट सांग ना,

'मृणाल, तिला आमचे लग्न मान्य नव्हते, तिचे अफेयर होते एका सोबत,घरच्यानी जबरदस्ती केली म्हणून ती लग्नाला तयार झाली.'

पण मोहित, लग्नाआधी तिने तुला हे सगळ सांगायला हवे होते ना?

नाही मुनु,ती लग्नाआधी भेटत् नव्हती. आणि आमचे जास्त बोलणे पण नाही झाले. मला वाटले नसेल तिला आवडत असे लग्ना आधी भेटणे, बोलणे सो आय इग्नोर्ड,(ignored).

वा मोहित ,इतरां साठी इतका सॉफ्ट ,दिलदार मनाचा तू आणि माझ्याशी तुला बोलायला पण आवडत नव्हते,! पूर्ण पणे तोड़ले होतेस मला,,

नाही मुनु, तू समजतेस तितका रुड (rude) नाही ग मी,,! तुला त्रास होऊ नये म्हणूनच तसा वागत होतो मी. ट्राय टू अंडरस्टैंड मी प्लीज,

आता मृणाल ला मोहित ची दया वाटत् होती,आपण उगाच त्याला वाटेल तसे बोलतो आहोत असे तीला वाटू लागले. पण त्या दोघांची मैत्री होतीच इतकी घट्ट आणि प्रेमळ,की ते दोघे हक्काने एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेयर करायचे,विविध विषयावर चर्चा करायचे,भांडण,वाद ही व्हायचे,पण परत ते एकत्र यायचे. यांच्या कड़े पाहून वाटायचे ,की खरच स्त्री आणि पुरुषां मध्ये मैत्री चे नाते इतके स्वछः ,निखळ असू शकते? पण हे खरे होते. त्यात ही मृणाल चे लग्न झालेले. मोहित इंजीनियरिंग संपवून लॉ करत होता. नेटवर दोघे एकमेकांना भेटले आणि जिवलग मित्र बनले. मृणाल चा नवरा अभय याला ही मैत्री माहित होती,तो ही मोहित चा चांगला मित्र बनला होता.

मृणाल ला शांत बसलेली पाहून,मोहित म्हणाला,काय रायटर कसल्या विचारात मग्न आहात?

काही नाही असच,, ती म्हणाली,

तू विसरतेस मुनु मी जरी पॉलिटिशन असलो तरी त्याआधी मी एक लॉयर पण आहे,, मी लोकांचा चेहरा वाचू शकतो,, तो हसत म्हणाला.

ओह्ह,, अच्छा मग मला सांगा लॉयर, ती बावळट मुलगी तुझ्याशी लग्न होई पर्यन्त गप्पच बसली, तीला हे लग्न मान्य नव्हते तरीही,,,

हो,मग लग्न झाल्यावर पहिल्याच रात्री तिने मला सांगितले की हे लग्न तिच्या मनाविरूद्ध झालंय,तिचे बाहेर अफेयर होते पण घरचे तयार नव्हते म्हणून बळेच ती तयार झाली. जेमतेम महीनाभर राहिली ती माझ्या सोबत,पण तिने स्ट्रिक्टली सांगितले होते की आपण जरी नवरा बायको असलो तरी तसे काही संबंध आपल्यात असणार नाहीत.

हे सर्व ऐकून मृणाल रागानेच म्हणाली,मोहित अशा मुलीला तू तेव्हाच का नाही बाहेर काढलेस ?

मला वाटले सध्या ती नाराज आहे,हळूहळू माझ्यात ती गुंतुंन् जाईल,विसरेल सगळ ,थोड़ी आपणच वाट पाहू.

वा ,छान मोहित इतका विशाल मनाचा तू कधी झालास,? माझ्याशी बोलायला मात्र तुझ मन,हृदय गोठुन् गेल होतं का,?

तुला वाटत मुनु,मी असा वागु शकतो? आपली मैत्री,तुझ्या सारख्या प्रेमळ मैत्रिणी ला मी विसरु शकतो? कधीच नाही मृणाल,,नेव्हर,,,,

मोहित खूपच इमोशनल झाला होता,

अरे तेच तर विचारतेय मी,का तू मला टाळत् होतास,? का माझ्याशी बोलणे बंद केल होतस,? तुला माहित नाही अभय असा अचानक माझ्या आयुष्यातुन कायमचा निघुन गेला,खुप खुप रडले,स्वहताला खुप त्रास करून घेतला,तेव्हा त्याक्षणी तुझी,तुझ्या मैत्रीची ,आधाराची मला किती गरज होती,पण तू कुठेच नव्हतास मोहित!! तिचे हे बोलणे ऐकून त्याला खुप वाईट वाटले,तो म्हणाला,मृणाल मी समजू शकतो की तू कोणत्या परिस्थिती तुन गेली असशील,तुझे आणि अभय चे लव्हमैरेज होते ,तू रायटर तो चित्रकार ,तुम्ही दोघेही कलाकार,म्हणूनच एकमेकांच्या प्रेमात पडलात ना,,छान चालल होतं तुमच.

छान,? नाही मोहित सुरवातीची 5/6 वर्ष चांगली गेली,त्यानन्तर आमच्या संसाराला नजर लागली रे,

म्हणजे,? काय झाल होतं तुम्हा दोघांमध्ये ,अभय नीट वागत नव्हता का तुझ्याशी? तुमच्यात भांडणे होतं होती का? पण तू तुम्हा दोघांबद्दल भरभरून उत्साहाने बोलायचीस ना मुनु,? मग,,

हो मोहित पण काही गोष्टी मी मुद्दाम तुला सांगत नव्हते,कारण तूझ्याशी बोलून,गप्पा मारून खुप रिलॅक्स व्हायचे मी सो आय डिलीट ऑल दँट थिंगज व्हिच आर मेक मि नर्व्हस.

मग अभय ला असे अचानक काय झाले होते मृणाल?

मोहित तुला माहित होतेच की, अभय एक उत्तम चित्रकार होता. तो स्केचेस,पेंटिंगज खुप छान करायचा. तो हुबेहुब स्केचेस करायचा,त्याच्या चित्रामध्ये जिवंतपणा असायच,म्हणूनच त्याच्या पेंटिगला खुप मागणी होती. स्केचेस साठी तो बाहेरगावी ही जायचा,मग काय हळूहळू त्यांच् नाव होतं गेल. भराभर प्रसिद्धिहि मिळत् गेली. भरपूर आमंत्रण यायची त्याला आणि सेलिब्रेशन देखील व्हायच. त्यात अभय झपाटुन काम करायचा. त्याला काळ वेळाच भानच उरल नव्हतं. नावाच्या,प्रसिद्धि च्या प्रहावात वाहत चालला होता. त्या सोबत ड्रिंक,स्मोकिंग ही वाढतच चालले होते, मृणाल ला मध्येच थाम्बवत मोहित म्हणाला, मुनु तू त्याला समजावून संगायचेस ना,तू इतके छान लिहितेस, बोलतेस तुझ ऐकले असते त्याने.

तुला काय वाटत् मोहित, मी नसेल समजावले त्याला?

खुप सांगितले, की अभय तुझ्या तबयेती कड़े लक्ष दे,या पार्टीज, खाणपिण, रात्रीची जागरण चांगले नाही. पण तो कुठला ऐकतो !! नशेत होता ना तो प्रसिद्धिच्या ,लोकांच्या स्तुतीच्या ,,आणि कसे असते ना मोहित कलाकाराने त्याची वाहवा,प्रसिद्धि ही मनातच ठेवायची असते ती डोक्यात नाही जावु द्यायची,कितीही आभाळाला हात टेकले तरी आपले पाय घट्ट जमीनीवर रोवुन् ठेवावेत नाहीतर त्याला कोसळायला वेळ लागत नाही. आणि शेवटी तेच झाले ,हृदयावर या सगळयाचा ताण पडला हार्ट

अ़ँटक ने संपले सगळे,,,!!!!

मृणाल चे हे बोलणे ऐकून मोहित ला खुप वाईट वाटले ,गेली वर्षभर तो तिला टाळत् होता पण त्याचा ही नाइलाज होता. टेबल वरचा पान्याचा ग्लास त्याने मृणाल ला दिला. तिला खरच पाण्याची गरज होती,तिने ते पाणी संपवले. मोहित ला तिच्या चेहरया वर दुःख स्पष्ट दिसत होते. त्यात भर होतीच ते त्यांच् वागण. तीला जाणुन् बुजुन टाळण. तो तरी काय करणार होता,त्या वेळी परिस्थितीच तशी होती.

 मोहित ने पुन्हा एकदा तिची माफ़ी मागितली,म्हणाला सो सॉरी मुनु ,तुला माझी गरज होती,तेव्हा मी तुझ्या जवळ नव्हतो. खुप हर्ट केले मी तुला.

मृणाल म्हणाली,मोहित झाल ते झाल,पण तुझ्या वागन्याचा अर्थ तेव्हा ही आणि आता ही समजला नाही मला. तुझ्या बाबतीत ही इतक सगळ घडून गेल,ते तू ही एकटयाने सहन केलेस ,तेव्हा ही माझी आठवण नाही झाली का रे तुला?

मुनु खुप आठवण आली तुझी ,तुझ्याशी बोलव,सगळ सांगावे,अस खुपदा मनात आले,पण नाइलाज होता ग माझा!!

अरे मोहित मघा पासून कोड्यातच बोलतो आहेस,मला नीट समजेल असे बोल,कोणता नाइलाज होता,असा की तुझ्या मैत्रिणी पासून दुर झालास तू,परक्या सारख वागलास तू,.

आता खरे काय ते मोहित ला सांगणे भाग होते,तो म्हणाला,मुनु ऐक तर मग सुरुवाती पासूनच जेव्हा आपण नेटवर भेटलो,गप्पा मारू लागलो,तेव्हा पासून तुझा स्वभाव ,तुझ बोलण,तुझ रूसण,तुझी काळजीवाहु मैत्री सगळच मला आवड़ायला लागल होतं,हळूहळू माझ्या ही नकळत मी तुझ्यात कधी गुंतत गेलो,हे मला देखील समजले नाही ग,मला तुझे अँडिक्शन होऊ लागले होते,पण हे पूर्णपणे चुकी चे आहे हे मला समजत होते म्हणूनच माझे हे वागणे योग्य नव्हते. तुझ्या आयुष्यात माझ्या मुळे काही प्रोब्लेम नको म्हणूनच मी तुझ्या पासून दूर गेलो,बोलणे बंद केले,तुझे फोन कॉल्स,मेसेजे याना रिप्लाय देणे ही बंद केले यामुळेच!!

मोहित काय बोलतोस तू हे,? मी नेहमी तुझ्याशी एक चांगला मित्र म्हणून बोलायचे,तू माझ्या पेक्षा लहान म्हणून तुझी काळजी वाटायची,बस्स इतकेच,! आणि आपली मैत्री अभय ला ही माहिती होती.

मृणाल तू म्हणतेस ते बरोबर आहे पण मीच तुझ्या मैत्रीला लायक नव्हतो,म्हणूनच दूर निघुन गेलो,पण दुर जावून ही तुला विसरू मात्र नाही शकलो. मुनु आजही माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे.

मोहित,वेड लागले आहे का तुला? काही ही काय बोलतो तू? 

मृणाल काय हरकत आहे,आपण चांगले मित्र आहोत,मग एकमेकांचा आधार बनलो तर त्यात काय वाईट आहे का? मी तुला थोड़ा देखील आवडत नाही का? सांग ना मुनु,प्लीज मला तू हवी आहेस असे म्हणत,मोहित ने तिचा हात् हातात घेतला. मृणाल ने रागाने तिचा हात् काढून घेतला. ती म्हणाली,मित्र म्हणुन तू आवडतोस मोहित,पण त्यापलीकडे मी कधी ही विचार केला नाही. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस मोहित.

हो,मुनु मग बेस्ट फ्रेंड जो असतो,तो आयुष्याचा जोड़ीदार म्हणून चांगलाच ठरतो हे मी तुला सांगायला नको. तू समजू शकतेस. आफ्टर ऑल यु आर द बेस्ट रायटर.

मोहित हा विचार डोक्यातुन् काढून टाक.ही गोष्ट अशक्य आहे. मोहित मृणाल कड़े एकटक पहात म्हणाला,का अशक्य आहे? काय अडचण आहे मला सांग.

मोहित तू हे का विसरतोस की आपल्या दोघांच्या वयामध्ये ८/९ वर्षाच अंतर आहे,तुला तुझ्या वयाची कोणतीही मुलगी मिळेल.

सो व्हॉट मृणाल,? वयातल अंतर या गोष्टीचा मला काही फरक पड़त नाही.मी समाज, लोक यांची कधी पर्वा केली नाही. संपूर्ण पणे विचार करुनच मी हे बोलतो आहे.हा तुझा माझ्या वर विश्वास नसेल तर तस सांग.

मोहित,तुला समजत कसे नाही ,माझा विश्वास आहे रे तुझ्या वर पण उद्या या गोष्टीचा तुला पश्चाताप होईल. मी वयाने मोठी आहे,हे समजून घे.

मुनु,मला काही समजून घ्यायचे नाही तू तर इतके जबरदस्त लिखाण करतेस मग तितकी डैशिंग (dashing) पण आहेस ना,मग कशाला या फालतु गोष्टीना महत्त्व देतेस.

मोहित,आम्ही कल्पना लढवून लिहितो,पण वास्तवातल जगण आणि स्वप्नातल ,कल्पनेतल जगण यात खुप फरक असतो.

मुनु तुला समजत कसे नाही ,मी तुझ्या शरीरा वर नाही ग,मनावर प्रेम करतो. खुप सुखात ठेवेन तुला. तुझ्या शिवाय मी दुसऱ्या कोणा सोबत नाही सुखी होऊ शकत प्लीज़ मुनु. असे म्हणत् मोहित ने तिच्या खांद्यावर त्याचे दोन्ही हात् ठेवले तिच्या डोळयात एकटक पहात म्हणाला,मुनु माझ्या डोळयात पाहून सांग मी तुला आवडतो की नाही, तुम्ही लेखक चेहरा वाचू शकता ना, सांग मग काय दिसते आहे, माझ्या चेहरयात अगदी प्रामाणिक पणे सांग.

मृणाल ला समजत होते की मोहित खरोखरच तिच्यावर जिवापाड प्रेम करत होता त्याचा चेहरा कमालीचा हळवा बनला होता. त्यांच् हे निःसीम हळव प्रेम तीला नाकारंण अशक्य होतं.

मृणाल त्याच्या कड़े पहात म्हणाली,मोहित तुझ्या चेहर्या वर जे दिसतय ना,ते मला पटले आहे. आय रियली ट्रस्ट यू,,,,मोहित ला हे ऐकून खुपच आनंद झाला,तो हसतच म्हणाला,मुनु म्हणजे तुला खरच पटलय का? माझ्या प्रेमाला तुझा होकार आहे ना?

होय,मोहित तुझ्या डोळयात मला माझ्या बद्दलचे प्रेमृणाल ला समजत होते की मोहित खरोखरच तिच्यावर जिवापाड प्रेम करत होता त्याचा चेहरा कमालीचा हळवा बनला होता. त्यांच् हे निःसीम हळव प्रेम तीला नाकारंण अशक्य होतं.म दिसत आहे.

मोहित ने त्याचे हात् खांद्या वरुन काढले आणि तिचे हात् हातात घेतले,. आनंदाने तो वेडा झाला होता. मुनु मी अभय इतक प्रेम नाही देवू शकणार पण त्यांन् रंग भरलेल्या या मृणाल नावाच्या चित्राला कधी बेरंग नाही करणार, या चित्रातले रंग कधी फ़िकट होऊ देणार नाही.

मोहित,झाली ना तुझी इच्छा पूर्ण,आता प्लीज़ पुन्हा गायब होऊ नकोस हा,,,

नाही ग,गायब नाही होणार माझ्या परीने तुला खुप सुखात ठेवन्याचा प्रयत्न करणार. हा,अभय ची जागा मात्र नाही घेणार तो तसाच राहु दे तुझ्या हृदया च्या कप्प्यात. हे त्यांच् बोलण ऐकून मृणाल चे डोळे भरून आले,ती म्हणाली,मोहित इतके प्रेम तू ,,तीला मध्येच थाम्बवत तो म्हणाला,मुनु इतकेच नाही खुप खुप प्रेम करतो तुझ्यावर आणि शेवट पर्यन्त करत राहीन.

पण महयु,,आज पहिल्यानदाच ती त्याला या नावाने बोलवत होती,,त्याला खुप छान वाटले,, तो म्हणाला,मुनु मला हे असे महयु च म्हण खुप भारी वाटत,,अगदी कोल्हापुरी ,,नाद खुळा,,,

होय,,मोहित,,असच बोलेन,,

सो महयु तू एक गोष्ट विसरतो आहेस,,

आता अजुन काही "पण" शिल्लक आहेत का मुनु,,?

हो,महयु,तू विसरतो आहेस की मला एक मुलगी पण आहे.

सो व्हाट मुनु? मी तिचा बाबा बनायला तयार आहे मँडु,,

मोहितच तिच्या वरच प्रेम पाहून तिच्या डोळयात आनंदाश्रु जमा झाले. ती म्हणाली,थैंक यू सो मच मोहित,,

तेव्हा मोहित ने आपल्या हाताने तिचे अश्रु पुसले, म्हणाला मुनु आता रडायचे नाही,तिचा हात् हाती घेत तो म्हणाला, सुनिये मैडम अर्ज किया है,,,

  ,,,"" तेरी आँखों के समंदर में हम डूब जायेंगे.

     इतना मत छलका इन्हे,हम टूट जायेंगे

   ले ले ख्वाब मेरी आंखोंसे और मुस्कुरा,

 तू साथ है,तो मेंरी आँखों में ख्वाब और बन जायेंगे.!!

मृणाल ने आनंदाने मोहित च्या खांद्यावर मान ठेवली,तृप्त समाधाना ने तीने डोळे बंद केले, मोहित चे  प्रेम ती मनातून, त्याच्या स्पर्शातुन अनुभवत राहिली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance