Sheetal Ishi

Abstract Thriller

3  

Sheetal Ishi

Abstract Thriller

हिरकणी (भाग-४)

हिरकणी (भाग-४)

3 mins
216


जया चा नवरा जाऊन दहा दिवस झाले होते रडून रडून जयाचे डोळे सुजले होते. डोळ्यासमोर भविष्यातला अंधार दिसत होता. बारावे आटपून सर्व नातेवाईक आपापल्या घरी गेली. पदरी तीन वर्षाची सीमा एक वर्षाचा नरेश. कारखान्यातील मजूर असल्यामुळे पदरी काहीही नव्हते. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. काय करावे जयाला सुचत नव्हते. जो दिवस आला तो रडण्यात घालून भूतकाळ आठवत दिवस जात होते .दोन महिने झाले तरी मार्ग दिसत नव्हता .शेवटी आपल्या मुलांचा विचार करून जया घराबाहेर पडली. दोन दिवस वणवण केल्यावर एका सोसायटीत तिला घरकाम मिळाले .पाटील बाईंना विनंती करून तिने मुलांना सोबत आणण्याची परवानगी मिळवली. सकाळी आठ वाजता कामाला यायचे होते आणि दुपारी बारा वाजेपर्यंत घरातले सगळे काम संपवून जाता येणार होते. एवढा वेळ मुलांना सोडणार कुणाकडे हा मोठा प्रश्न जया पुढे होता. सीमा अजूनही लहान होती. रोज ती कामावर मुलांना घेऊन येत होती. सोसायटीतल्या पार्किंग मध्ये एका झाडाखाली खेळायला बसवत होते. मध्ये येऊन भेटून जात होती .आईचं हृदय ते काम करत बाल्कनीतून मुलांवर लक्ष ठेवत होती सीमाला नरेशला सांभाळायला सांगत होती. हळूहळू जयाला त्याच सोसायटीत दुसरी कामे मिळाली. जयाने अगदी मन लावून कामे केली .पैसे मिळू लागले ते दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत मिटली होती. कामे करत करत वर्ष पूर्ण झाले होते. जयाने सीमाला शाळेत टाकायचे ठरवले. काहीही झाले तरी मुलांना शिकवायचे ठरवले होते. आपला आयुष्य जसे अंधारात गेले तसे मुलांचे जायला नको म्हणून ती धडपडत होती. मालकिन बाईंना विचारून सरकारी शाळेचा तपास केला. त्यात सीमाची ऍडमिशन केली. सीमा ची शाळेत ऍडमिशन झाल्यामुळे नरेश ला कोणाकडे सोडावा ?हा मोठा प्रश्न झाला होता .स्वतःच्या जीवाचे हाल करत सकाळी लवकर उठून घरातील आवरून मुलांना खायला प्यायला बनवून ती सीमाला शाळेत सोडत होती आणि नरेशला सोबत घेऊन कामावर येत होती.काम करता करता आपल्या बाजूलाच त्याला बसवत होती असे करत करत नरेश आता तीन वर्षाचा होण्यात आला होता .जीवाच्या धडपडीने ती मुलांना चांगल्या गोष्टी शिकवत होती. कळत नकळत मुलांवर चांगले संस्कार होत होते. असेच एक दिवस नरेश खाली पार्किंग मधल्या गार्डनमध्ये खेळत होता. जया पाटील यांच्या बाल्कनीतून त्याच्याकडे बघत काम करत होती बाल्कनीत जेव्हा कपडे टाकायला आली जया तेव्हा तिने पाहिले की एक माणूस काहीतरी बोलतोय पुन्हा तिथे स्तब्ध होऊन पाहू लागली. दुपारचे तीन वाजेची वेळ होती. पार्किंग मध्ये कोणी नव्हते. नरेश आपला खेळत होता. तो माणूस त्याला काहीतरी देत होता. तेवढ्यात जयाचे लक्ष गेले इथे माणसाने त्याच्या तोंडावरती रुमाल धरून त्याला पकडून नेऊ लागलाय . तीने ओरडायला सुरुवात केली सोड त्याला......सोड त्याला ........धावा...वाचवा...धावतच जिना उतरून खाली आली. ती माणसाच्या पाठोपाठ पळू लागली. जीवाच्या आकांताने जया त्याच्या मागे पळत होती. पळता पळता तिच्या पायाला ठेच लागली ती पडली डोक्याला खोच लागली रक्त वाहू लागले तसेच उठून ती परत त्याच्या मागे पळू लागली तेवढ्यात गेटवरील सिक्युरिटी चे लक्षात आले की काहीतरी गडबड आहे त्यांनी पटकन गेट बंद केले. गेट बंद केल्यामुळे त्या माणसाला नरेशला बाहेर नेता आले नाही. तेवढ्यात जया त्याच्या जवळ पोहोचली. त्या माणसाला धक्का देऊन नरेश ला आपल्या ताब्यात घेतले त्या माणसाला मारायला सुरुवात केली. सोबत आता सेक्युरिटी होता. त्यामुळे जय आता सरसावली होती. नरेश बेशुद्ध झालेला होता. आणि जवळील बाकावर नरेशला झोपले. सिक्युरिटी च्या मदतीने त्या माणसाला पोलिसांच्या हवाली केले. एक मोठा मुलं पकडणाऱ्या टोळीचा आज डाव उघड झाला होता. जवळजवळ दहा मुलं पकडलेली आज सापडलेली होती. जया नरेशला घेऊन डॉक्टर कडे गेली. डॉक्टरांनी औषध देऊन त्याला शुद्धीवर आणले. सगळ्या गडबडीत सीमा ची शाळा सुटली होती. तिला घ्यायला जायला उशीर झाला होता. जयाच्या छातीत धस्स झाले होते. एकाला वाचवले दुसऱ्या वर पुन्हा संकट आले की काय? तिने तशीच रिक्षा केली आणि सीमाच्या शाळेत गेली तर तिथे कळले की पाटलीन बाई येऊन सीमाला घेऊन गेलेले आहेत. आणि तिथूनच तिने वाटली नाही बाईना फोन लावला सीमा त्यांच्या घरी सुखरूप असल्याचे ऐकून तिच्या जीवात जीव आला. त्याच रिक्षाने ती पाटलीन बाईंच्या घरी आली होती.जया रडत दोन्ही मुलांना कवटाळून बसलेली होती. तिचे प्रेम पाहून पाटलीन बाईंना ही भरून आलेले होते नकळत त्यांच्या तोंडून शब्द निघाले .. "प्रत्येक आई हिरकणी असते जया"



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract