Sheetal Ishi

Thriller

4.0  

Sheetal Ishi

Thriller

हिरकणी भाग 2

हिरकणी भाग 2

2 mins
174


    सकाळपासून रत्नाची कामाची लगबग चाललेली होती. सकाळपासूनच तिचे कामे उशीरा झाले होते. सर्व काम ती पटापट हाता वेगळे करून कामावर जायला पाहत होती. पाच वर्षाची तनया तिच्याजवळ लुडबुड करत होती. रत्ना तिला समजावून बाजूला करत होती . आपले कामे आवरत होती. रत्नाचा हाताबरोबरच तोंडाचा पट्टा अविरत चालला होता. काम न करणाऱ्या दारुड्या नवऱ्याला ती शिव्या शाप देत होती. तनयाला खाण्याचे सांगून ती घराबाहेर पडली. जाताना बाजूच्या देवका मावशीला तनयावर लक्ष ठेवायला सांगितले .आज मालकिन बाईंकडे पाहुणे येणार असल्यामुळे रत्नाला खूप सारी कामे होती झपाझप पावले टाकत रत्ना 'देवरथ' अपार्टमेंटला पोचली. दाराची बेल वाजवून क्षणभर विसावली. आतून मालकिन बाईंनी दार उघडले. घरात पाऊल टाकताच बरोबर तिला सूचना द्यायला सुरुवात केली. रत्नाने पटापट घरातली साफसफाई केली. का कुणास ठाऊक पण आज रत्नाचे मन फार घाबरा गुबरे झाले होते. संध्याकाळचे सहा वाजण्यात आले होते. रत्नाची घरी जायची वेळ झाली होती. चित्त तिच्या सानुल्या तनयाकडे होते. पाहुणे निघताच बरोबर मालकिन बाईंची परवानगी घेतली आणि रत्नाने घराकडे धाव घेतली. आज का कुणास ठाऊक तिचे मन थाऱ्यावर नव्हते .घरी पोहोचायला अंधार पडला होता. काळीज धडधडायला लागले होते. झोपडीचे दार ठोठावले पण आतून काही आवाज येईना. मनातली भीती खूप वाढली. तनया कुठे दिसत नव्हते. शेजारच्या देवका मावशीकडे ती पाहून आली होती. देवका मावशीने ती तिच्या वडिलांसोबतच घरात होती असे सांगितले. धक्का मारून रत्नाने दार उघडायचा प्रयत्न केला. पुढच्या धक्क्या सरशी दार उघडले गेले . समोर पाहते तर काय आपला मद्य धुंद नवरा लहानग्या पाच वर्षाच्या तनयावर जबरदस्ती करायचा प्रयत्न करत होता. तनयाचे तोंड त्याने दाबून धरले होते. रत्नाची तळपायाची आग मस्तकावर गेली. तनयाला जोरात हिसकावून तिने आपल्याजवळ ओढून घेतले आणि बाजूला सारले आणि नवऱ्याला बेदम मारायला सुरुवात केली जवळच लाकडाचा ओंडका पडलेला होता रत्नाची अंगाची लाही लाही होत होती जीवाच्या आकांताने तो ओंडका तिने उचलला आणि नवऱ्याच्या डोक्यात टाकला. रागाने रत्ना सैरभैर झाली होती. आज ती वेळेवर आली नसती तर लहान तनयाची काय हालत झाली असती. या विचाराने ती जीवाच्या आकांताने ती रडत होती काय करावे तिला कळत नव्हते तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे गोळा झाले आज पुन्हा एकदा आधुनिक हिरकणीने आपल्या तानुलीला वाचवले होते धन्य ती माता धन्य ती हिरकणी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller