Sheetal Ishi

Abstract Thriller

3.0  

Sheetal Ishi

Abstract Thriller

हिरकणी (भाग-3)

हिरकणी (भाग-3)

2 mins
219


हिरकणी (भाग-3) 


आज रविवार असल्याने रूपाली सावकाश उठली. फ्रेश होऊन वाफाळता चहा घेऊन बाल्कनीत येऊन बसली. 

आज लग्नाचा १० वाढदिवस. मन नकळत भूतकाळात तरंगू लागले. 

रमेश देखणा राजबिंडा तरूण. त्याची पुण्याच्या काॅनफरन्स मध्ये झालेली अविस्मरणीय भेट. नकळत एकमेकांकडे आकर्षीत झालो होतो रमेश साऊथ चा आपण महाराष्ट्रीय. पण प्रेमाला बंधन नसते. सगळ्यांचा विरोध पत्करून लग्न केले होते. सुखाचा दॄष्ट लागल्यासारखा संसार चालला होता. अन्विका 1 महिन्याची असतांना कोविड ची साथ आली आणि....... रमेश गेला.... का देवा असा घात केला.....? पोरके झालो..... रूपाली उन्मळून पडली होती.... अश्रू थांबत नव्हते. इतक्यात खट् आवाज झाला...रूपाली भूतकाळातून वर्तमानात आली.....पाहते तर काय.... १ वर्षाच्या अन्विका ने बाल्कनीचे ग्लास डोअर आतून बंद केले होते..... रूपाली घाबरली ....अन्विका.....दार उघड......थोडा वर हात कर आणी खटका दाब..... अरे देवा...हिला माझा आवाज पोचत नाहीये......हातवारे करून अन्विका ला खटका दाबायला सांगितले पण लहान असल्याने हात पोचत नाहीये... सकाळ चे आठच वाजलेत..... 

खाली पण कुणी दिसत नाही..... आधीच रमेशच्या आठवणी ने अश्रू थांबत नव्हते... त्यात हे..... इशारे करून रुपाली थकली होती... अरे...... पुढचा दरवाजा तर उघडा आहे... . . आशेचा एक किरण दिसला होता... लागलीच लक्षात आले.. सविता भाभी गावाला गेल्यात....पून्हा निराश झाली....ह्या सगळ्यात एक तास होऊन गेला होता......एकदम लक्ष बाल्कनीत वाळत टाकलेल्या साडी कडे गेले... डोळे लकाकले... क्षणाचाही विलंब न करता...... साडी काढून बाल्कनी च्या जाळीला बांधली...... दुसरे टोक खाली सोडले.... साडी पकडून दुसऱ्या मजल्यावरून उतरायला सुरवात केली ....हृदय धडधडत होते..... अश्रू थांबत नव्हते.... पहीला मजला... मग तळ मजला..... पाय जमिनीवर लागताच... आनंदीत झाली...... धावत बिल्डींग च्या पुढील बाजूला आली... धावत जिना चढली... घरात येतात अन्विकाला कवेत घेऊन पटापट मूके घेतले... आनंदाश्रू घळाघळा वाहत होते.... आज आधुनिक हिरकणी तळमळीने अन्विका जवळ पोचली होती.... 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract