हाताची घडी अन तोंडावर बोट
हाताची घडी अन तोंडावर बोट
हाताची घडी अन तोंडावर बोट
काय चाललंय तेच कळत नाही , आम्हाला खरंच कळत नाही कि कळत पण वळत नाही कधी कधी वाटत आपलया पेक्षा पशु तरी बरे भूक लागल्यावरच शिकार करतात . केवढी उठाठेव पोटासाठी ,विपुल इथे साधन संपत्ती तरीही का मग भिक्षांदेही ? माणसासाठी धर्म कि धर्मासाठी माणसं ? जीवन म्हणजे काय गडे? जगन , मरण यातील मौलिक अंतर जगून घ्या मनसोक्त आनंदानं मनुष्यजन्म नाहीच नंतर ..सहिष्णुतेचा कानमंत्र कुणी हो चोरला कि माही त्याचा सोयीस्कर अर्थ लावला . कि फुले, शाहू आंबेडकरांचे वारस आम्ही याचाच विसर पडला .आमहाला एवढं कस कळत नाही त्यांच्यालेखी आपण तर भोळी भाबडी जनता नव्हे नव्हे वेड्याचीच जत्रा जगलो मेलो आपण त्यांना काय फरक पडतो .त्यानाच व्यवहारच गणित पक्के असते .नेमकाआपला अंदाज चुकतो. संवेदना झाल्यात बोथट , माणुसकी तर केव्हाचं संपलीय . टिपण्या सर्वकाही निष्प्रभ लेखणी .
माणूस माणसाचा झालाय वैरी , त्यांनी मनात आणलं आणि आपल्याला आपापसात भिडवल क्षणात सर्वकाही मातीमोल झालं . धर्म नि माणूस काय आहे नातं ? माणसासाठी धर्म कि धर्मासाठी माणूस. माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होतो. कृष्णानेही कर्मयोग सिंधांत सांगितलेला आहे. कर्मधर्मसंयोगाने चांगले होईल असेच वाटत होते पण आता (कर्मधर्मसंयोगाने) या शब्दाची हि आता भीती वाटू लागली आहे.
थोड
ी तरी माणुसकी दाखवावी ना राव पण कसली माणुसकी नि कसलं काय ?घाणेरड्या राजकारणाने घातचं केला,जातीयतेने अंध झालेले मानवतेचे वैरी झाले . दंगली धोपायानी उभा महाराष्ट्र पेटला . काही झालं तरी अजिबात बोलायचं नाय राजेहो ! शाळेती सल्ला सगळ्यांच्या लक्षात हाय हाताची घडी तोंडावर बोट .आपला बांधव सीमेवर लढतो आपण मात्र श्रद्धांजली वाहून मोकळे होतो. हल्ली कुना कशाचं काही वाटेनासं झालै . बर आपला इवलासा संसार अन बायको अन पोर नाही दिशाहीन समाज , संधीसाधू नेतें , मुजोर प्रशासक , उदासीन जनता सर्वकाही आनंदी आनंदच हाय. . राजे तुम्ही येण्याची आता खरी गरज आहे. पुन्हा मावळ्यांना शिवशाहीचा विसर पडला आहे. अमावश्येच्या काळरातीत होते गुपित दडले देशबांधणी करणाऱयनीच होते लचके तोडले. स्वंत्रसमयी होते जे खळखळून हसले दृश्य विदारक हे पाहत शाहीतहि असतील बावरले .
चल मित्रा ! तू नको एवढा विचार करू ,निवडणूक आली जवळ आपलं मताच राजकारण करू जाणून बुजून येड्याची जत्रा ती . चाल जाऊ दे एक एक पेग भरू अन अवघाचि संसार सुखाचा करू आपलंही माहिती आहेत तुम्हाला सत्तेपुठे शहाणपण चालत नाही अन शाळेत शिकवलं कि लहानपणी आपल्याला अजिबात बोलायचं नाही हाताची घडी अन तोंडावर बोट