Sangieta Devkar

Romance Tragedy

3  

Sangieta Devkar

Romance Tragedy

हारजित पर्व नवे (भाग 10)

हारजित पर्व नवे (भाग 10)

4 mins
233


मामांना काय सांगायचे ते तूच सांग. सुमित तुला राग आला का? राग काय मला नेहमीच येतो ना नवीन काय त्यात. मग जेवण करून ते ऑफिसला आले. सुमित नंतर तिच्याशी इतके बोलला पन नाही. त्याला समजत नव्हते प्रीति अशी का वागते आहे. मग दोन चार दिवस सुमित प्रीतिशी फक्त कामापुरता बोलत होता. संध्याकाळी घरी जाताना ती म्हणाली सुमित तू असाच वागणार असशील तर मी एकटी जाते घरी. का आता मी नको यायला का सोडायला. मग बोलत का नाहीस नीट तू. चल बाहेर बोलू इथे नको. म्हणत सुमित केबिनमधून बाहेर पडला. दोघे कारमध्ये बसले. थोड्या अंतरावर एका बाजूला सुमितने कार थांबवली. म्हणाला, प्रीती असे का करत आहेस तू? माझे काय चुकले ते तरी सांग.

सुमित कोणाचेच काही चुकले नाही पण माझे मन तयार होत नाही आता लगेच एंगेजमेंट करायला इतकंच.

सुमितने तिचा हात हातात घेतला, हे बघ जान तू माझी आहेस माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर मग कुठेतरी जरा पझेसिवनेस येणारच ना. मला अनसिक्युअर वाटणारंच गं कारण प्रेम आहे माझं तुझ्यावर.

सुमीत मला समजतात तुझ्या भावना पण...

तिला मध्येच तोडत तो म्हणाला, प्लीज काही नको बोलूस मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय.

सुमित अरे मी तुला कुठे सोडून नाही चालली. तूच आज बोलला नाहीस माझ्याशी.

राग तर येणार ना तू अस बोलल्यावर की एंगेजमेंट पुढे ढकलू.

पण सुमित याचा अर्थ मी बोलणार नाही भेटणार नाही असा होत नाही ना. तू तुझ्या पध्दतीने सगळे अर्थ लावून घेतोस.

ओके प्रितु तुला जे योग्य वाटेल ते कर. मी तुला फोर्स करणार नाही. जेव्हा तुला वाटेल तेव्हा एंगेजमेंट करू आणि नाहीच करावी वाटली तर मला काहीच प्रोब्लेम नसेल.

यावर प्रीती काहीच बोलली नाही. तिला घरी सोडून सुमित ही घरी आला. जेवण करून तो आपल्या रूममध्ये आला. त्याला मामांचा फोन आला. काही कामानिमित्त त्याला सकाळी मुंबईला जा असे मामा म्हणाले. ठीक आहे जातो असे सांगून सुमितने फोन ठेवला. त्याने मग प्रीतीला कॉल केला हैल्लो प्रीतू जेवण झाले का?

हो आताच तू जेवलास का सुमित?

हो, ऐक ना सकाळी मला मुंबईला जायचे आहे काम आहे. दोन दिवस लागतील.

ओके सुमित नीट जा ड्रायवर असेल ना सोबत?

हो गं तू तुझी काळजी घे आणि मामा आहेतच काही काम असेल तर त्यांना सोबत ने.

हो तू माझी काळजी नको करु, तू लवकर ये परत मी वाट पाहते सुमित.

हा जान आय लव यू अँड मिस यू लॉट.

मिस यू टू सुमित


मग गुड़ नाईट म्हणत दोघांनी फोन ठेवला. सकाळी लवकरच सुमित मुंबईला गेला.त्याने जाताना प्रीतीला मेसेज केला. उठल्यानंतर प्रीतीने त्याला रिप्लाय केला. प्रीती तिचे आवरून ऑफिसला आली. आज तिला ऑफिसमध्ये अजिबात करमत नव्हते. रोज़ तिच्यासोबत सुमित असायचा. आज तिचे कामातही लक्ष लागत नव्हते. मग तिने सुमितला कॉल लावला.

हैल्लो जान बोल.

तू कामात आहेस का सुमित? असलो तरी तुझ्यापुढे काम महत्वाचे नाही मला.

तू नाश्ता केलास का?

हो ग आणि मीटिंगच्या जागी पोहोचलो पण. फोन का केलास काही काम होत का?

सुमित मी ऑफिसला आले पण तू नाहीस ना आज इथे.

मग माझी आठवण येते का तुला.

हो मग खूप खूप मिस करते तुला. मला नाही करमत तू ये ना लवकर.

अरे काम झाले की येणारच आहे ना.

सुमित काम तुझे दोन दिवसांनी संपणार मग तू येणार.

असं काही नाही लवकर काम झाले तर लवकर पण येवू शकतो.

सुमित आय मिस यू लॉट आणि अचानक ती रडू लागली.

अरे प्रीतू वेडी आहेस का तू रडतेस का?

मला नाही माहित मला खूप आठवण येते तुझी.

हो प्लीज रडू नकोस तू, तू रडली तर मला वाईट वाटेल मला नाही आवडणार.

तू ये पण लवकर.

हो आय मिस यू टू प्रीतू. माझं पण लक्ष लागेल का सांग आता इकडे.

सॉरी सुमित.

बरं मी नंतर कॉल करतो काळजी घे.


इतके बोलून सुमितने फोन ठेवला. प्रितीला जरा बरे वाटले त्याच्याशी बोलून. आज ती लवकरच घरी निघून आली. रात्री सुमितने कॉल केला. खूप वेळ बोलला. दुसऱ्या दिवशी छान मूडमध्ये प्रीती ऑफिसला आली. मामा आले होते. प्रीतीने त्यांना गुड मॉर्निंग विश केले.

मामा म्हणाले, प्रीति दुपारी आपल्याला एका मीटिंगला जायचे आहे.

हो चालेल मामा, असे बोलून ती तिच्या केबिनमध्ये आली. पण कामात आज ही लक्ष लागेना. मग ती मोबाईलमधले सुमितचे फ़ोटो बघत राहिली. दुपारी ती मामांसोबत मीटिंगला निघाली. मामा आणि एक जण त्यांच्यासोबत होते.


प्रीति हे माझे स्नेही विनायक जाधव. प्रीतीने त्यांना नमस्कार केला. मामा म्हणाले प्रीती तू पुढे बैस आम्ही दोघे मागे बसतो.

हो म्हणत ती ड्रायवरसोबत पुढे बसली. त्यांना एमआयडीसी शिरोलीकडे जायचे होते. कोल्हापूर सोडून आता ते हायवेला लागले होते. मामा आणि त्यांचे मित्र गप्पा मारत होते. प्रीतीने एफएम सुरु केले. ती गाणी ऐकण्यात गुंग झाली. हायवे असल्याने कार जरा स्पीडमध्येच होती...

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance