गुंतता हृदय हे!! (पर्व १)भाग ६
गुंतता हृदय हे!! (पर्व १)भाग ६
आज आर्या गुणगुणतच घरी आली....
ती खूपच खुश होती..
तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली होती..
आज रात्री जेवताना ही आर्याच लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं..
तिने भराभर जेवण आटपलं आणि तिच्या खोलीत झोपायला गेली..
तिने लागलीच फोन चेक केला तर अनिशचा मेसेज होता.. "जेवलीस का?"
आर्याने सुद्धा रिप्लाय दिला आणि मग रात्रभर दोघेही मेसेजने बोलत होते..
अनिशने फोन ही केला होता पण आर्याला सध्या तरी घरी कळू द्यायचे नव्हते. म्हणून तिने घरी नीट सांगेपर्यंत रात्री फक्त मेसेजने बोलायचे असे ठरविले. अनिशने ही आर्याला समजून घेतले..
(दुसऱ्या दिवशी सकाळी)
"गुड मॉर्निंग मुंबई!!"
मी आहे तुमचा सर्वांचा आवडता RJ अमेय.
तुमच्या सर्वांचे स्वागत आहे "गुंतता हृदय हे!!" च्या आजच्या ब्रँड न्यू एपिसोड मध्ये.
हुश्श!! तुमचं किती प्रेम आहे हो माझ्यावर..मला भेटण्यासाठी तुम्ही इतक्या कथा पाठवल्यात..
Woww..amazing!! मी खूप खूप आभारी आहे तुमचा..
असो, ह्या प्रतियोगीतेचे विजेते कोण आहेत..हे मी तूम्हाला लवकरच सांगेन..आणि त्या भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे मला भेटण्याची संधी..
(टाळ्यांच्या कडकडाटाचा आवाज येतो)
सो guys, प्रेम हे सगळेच करतात, पण जे अनुभवतात त्यांची बातच और आहे..तो स्पर्श, तो सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो..प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून त्याची/तिची आठवण होते आणि नकळत ओठांवर हे शब्द येतात..
जीव दंगला, गुंगला, रंगला असा,
पिरमाची आस तू जीव लागला,
लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
पैलतीरा नेशील, साथ मला देशील,
काळीज माझं तू सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल
सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू
खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढींचा इटाळ
माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू
खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण
तुझ्या पायावर माखेल माझ्या जन्माचं गोंदण
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
आर्या बेडवर लोळतच रेडिओ ऐकत असते..
"किती छान गाणं होतं..मिस यु अनिश💕" आर्या म्हणते.
इतक्यात मेसेजची बीप वाजते..
"गुड मॉर्निंग my love"
आर्याची सगळ्यात रोमँटिक सकाळ होती ही..
तिने ही रिप्लाय केला व काही वेळ अनिशसोबत chat केला.
इतके रोमँटिक गाणं ऐकल्यावर तुम्हीच विचार करा ना काय चाट केला असेल तो😁
इतक्यात तिचं घड्याळाकडे लक्ष गेले मग तिने शेवटचा मेसेज सेंड केला की, ऑफिसला निघाल्यावर तुला कॉल करते म्हणून आणि ती ऑफिसला जायच्या तयारीला लागली..
स्निग्धाचा आजही काहीच पत्ता नव्हता..ती फोन सुद्धा उचलत नव्हती..म्हणजे आजपण ऑफिसला येण्याचे चान्सेस कमीच होते..
आर्याने अनिशला फोन केला आणि बोलतबोलत ती कधी ऑफिसला पोहोचली तिला तिचे कळलेच नाही..
ती तिच्या डेस्कजवळ गेली आणि तिने तिथे पर्स ठेवली. तेवढ्यात तिचं लक्ष समीरच्या डेस्क कडे गेलं..पण तिथे कुणीच नव्हतं..म्हणजे समीर अजून ऑफिसला आला नव्हता..कॉफी पिण्यासाठी आर्या कॅन्टीनमध्ये जाणार इतक्यात समीर आला..
अचानक आलेल्या पावसाच्या सरीमुळे त्याचे केस थोडेफार भिजले होते..तो आज रोजच्यापेक्षा खूपच handsome दिसत होता..आर्या ही एक क्षण त्याच्याकडे बघतच राहिली..
अचानक समीरने "गुड मॉर्निंग आर्या" अशी हाक मारल्यावर ती भानावर आली..
तिला काय बोलावे हेच सुचत नव्हते..
तिने फक्त हाताने कॅन्टीनकडे खूण केली..
समीर पण त्याची बॅग ठेवून कॅन्टीनमध्ये आला..
दोघांनीही कॉफी घेतली.
तेवढ्यात आर्या पटकन म्हणाली, "समीर, तुला काल मला काहीतरी सांगायचं होतं ना?, सॉरी मी इतकी घाईत होते की, anyway आता बोल ना काय सांगायचे होते ते".
त्यावर समीर म्हणाला, "काही खास नाही गं. पण वेळ आल्यावर तुला नक्की सांगेन"
दोघांनी आपापली कॉफी संपवली आणि आपापल्या कामाला लागले..
आज काम भरपूर असल्यामुळे लंचला ही फुरसत नव्हती..
त्यामुळे दोघांचा लंच ही त्यांच्या सोयीनुसार कामातून वेळ मिळेल तसा झाला..
कामाच्या व्यापात ऑफिस सुटायची वेळ कधी झाली हे ही दोघांना कळले नाही..
आज बाहेर भरपूरच पाऊस पडत होता..
त्यामुळे आर्याला स्टेशनपर्यंत जायला ऑटोरिक्षाही मिळत नव्हती.
तिने १-२ रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच थांबायला तयार नव्हते..
समीर लांबूनच आर्याची धडपड बघत होता. न राहवून मग त्याने सरळ त्याची बाईक आर्याच्या समोर उभी केली आणि अगदी हक्काने बोलतात तसा बोलला, "बस बाईकवर. मी सोडतो तुला स्टेशनपर्यंत."
आर्या ही कोणतेही आढेवेढे न घेता त्याच्या बाईकवर बसली. समीरने आर्याला स्वतःचे जॅकेट ही घालायला दिले.
"Be comfortable. मी सांभाळून नेईन तुला", समीर म्हणाला आणि बाईक चालू केली.
समीर आज खूपच खुश होता कारणही तसचं होतं ना!! अहो, आर्या जी बसली होती बाईकवर!!😍
त्याला मनात असे वाटत होतं की, हा रस्ता कधीच संपू नये..
तो मनातल्या मनात गाणं गुणगुणत होता...
गारवा
गारवा
वाऱ्यावर भिर-भिर-भिर पारवा, नवा नवा
प्रिये, नभात ही
चांदवा नवा नवा
गारवा
गवतात गाणे झुलते कधीचे
गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सर-सर-सर काजवा, नवा नवा
प्रिये, मनात ही ताजवा नवा नवा
गारवा
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर-थर-थर नाचवा, नवा नवा
प्रिये, तुझा जसा गोडवा नवा नवा
गारवा
मधेमधे आरशातून आर्याला चोरून बघत होता..
आर्याला समीरला पकडून बसायला थोडं uncomfort वाटत होतं..
पण रस्त्यात इतके खड्डे होते की, समीरला धरून बसण्याशिवाय आर्याकडे पर्यायच नव्हता..
Just imagine करा काय क्षण असेल तो!!
एव्हाना पावसाचा जोरही थोडाफार कमी झाला होता..आणि स्टेशनही आलं..
समीरने नाइलाजाने बाईक थांबवली..त्याचं मन करत होतं की, दिवसभर आर्या सोबत राहाव..पण त्याने मनाला आवरलं..
आर्या खाली उतरली आणि समीरला म्हणाली, "Thank you so much समीर, चल बाय, उद्या भेटू"
ती पुढे निघालीच होती की, तिच्या लक्षात आले.
समीरचं जॅकेट तिच्याकडेच होतं..
म्हणून ते परत द्यायला ती वळली..
तर समीर तिथेच उभा होता..
तिने जॅकेट काढून समीरला दिले आणि निघणार
तेवढ्यात..
समीरने आर्याला हाक मारली आणि तिला बोलू लागला, "आर्या मला तुला काहीतरी सांगायचं आहे"
ती थांबली आणि म्हणाली "हा बोल ना काय बोलायचंय."
समीर म्हणाला, "actually आर्या, मी कसं सांगू हेच कळत नाहीये..hope तू मला समजून घेशील..आर्या प्लीज तू माझ्यावर रागवू नकोस?"
"किती कोड्यात बोलतोयस..आता जर तू नाही बोललास तर मात्र मी नक्की रागविन..बोल पटकन.." आर्या म्हणाली.
समीरने आर्याचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, "आर्या I love you..माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे..अगदी पहिल्या दिवसापासून..जेव्हा मी तुला पाहिल्यांदा ऑफिसमध्ये बघितलं होतं..तुझं माझ्याबरोबर नेहमी भांडणं आणि माझा राग राग करणं..सगळ्या ऑफिसच्या मुली माझ्या पाठी असताना सुद्धा तुला माझ्यात इंटेरेस्टच नसणे..आणि मग प्रोजेक्टच्या निमित्ताने आपण एकत्र घालवलेला वेळ..काय आणि किती सांगू.."
आर्या त्याच्याकडे बघतच राहिली..
तिला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की, समीर कधी तिच्यावर प्रेम करेल..कारण नेहमी त्याच्या आजूबाजूला मुलींचा घोळका असे..त्यामुळे त्याच्याशी कधीच कामाव्यतिरिक्त बोलण्याचा प्रश्नच नव्हता..
प्रोजेक्ट पासूनच तो आर्याबरोबर ऑफीसमध्ये जास्त वेळ घालवू लागला होता..तेव्हाच या दोघांची घट्ट मैत्री झाली होती आणि त्या मैत्रिमुळेच आज आर्या निःसंकोचपणे त्याच्या बाईकवर बसली होती..
पण तो असा काहीतरी विचार करेल हे तिला खरचं वाटलं नव्हतं...
ती मनात म्हणाली की, "समीरला अनिश बद्दल सगळे सांगायला हवे..नाहीतर तो जास्तच सिरीयस होईल"..
आर्याने पहिला स्वतःचा हात त्याच्या हातापासून लांब केला व ती बोलू लागली, "समीर प्लीज मला चुकीचं समजू नकोस..तू खरचं खूप चांगला मुलगा आहेस..प्रत्येक मुलीला तुझ्यासारख्याच लाइफपार्टनरची अपेक्षा असेल..पण माझं दुसऱ्याचं व्यक्तीवर प्रेम आहे आणि त्याचं ही माझ्यावर..मी तुझ्या भावना समजू शकते पण स्वीकारू शकत नाही..प्लीज मला माफ कर समीर..पण आपली मैत्री आहे तशीच राहील नेहमी..प्लीज मला समजून घे"
असे बोलून ती निघून गेली..
आर्याच्या लाइफमध्ये दुसरे कोणीतरी आहे हे समीर सहनच करू शकत नव्हता पण त्याला हे ही माहीत होतं की, प्रेमात नेहमी दिलं जातं..प्रेम कधीच जबरदस्तीने नाही केलं जात..
तो आर्या नजरेआड होईपर्यंत तिला बघत होता..
पाऊसाचा जोर पुन्हा वाढला होता..
समीर त्याच जागेवर उभा होता.
त्याचे डोळ्यातल पाणी...पावसाच्या पाण्यात कधी मिसळल हे त्याच त्यालाच कळल नाही..
त्याने इतके प्रेम कधीच कुणावर केले नव्हते..
जितके आर्यावर केले होते..
आज आभाळही फाटलं होतं..
सरीवर सरी बरसत होत्या आणि त्या त्याच्या डोळ्यातील अश्रूंना स्वतःमध्ये सामावून घेत होत्या..
आणि अचानक कुठेतरी हे शब्द ऐकू येत होते..
पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे
उठला हा जाळ आतून करपल रान रे
उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान
डोळ्यातल्या पाण्याने हि भिजेना तहान. तहान...
दूर दूर चालली आज माझी सावली
दूर दूर चालली आज माझी सावली
कशी सांज हि उरी गोठली
उरलो हरलो दुखः झाले सोबती
उरलो हरलो दुखः झाले सोबती
क्रमशः
(ही कथा आवडल्यास like आणि share करायला विसरू नका..)