गुंतता हृदय हे - भाग ११
गुंतता हृदय हे - भाग ११


https://storymirror.com/read/story/marathi/qgf7qzyo/gunttaa-hrdy-he-bhaag-10/detail
आज सकाळपासून सुमती काकूंची लगबग सुरु होती.. त्यांना तर काय करू काय नको असं होत होते.. अहो, कारणच तसं होतं ना! त्यांची मुलगी गौरी चक्क २ वर्षांनी शिक्षण पूर्ण करून घरी येणार होती.. समीर नेहमीप्रमाणे सकाळचा नाश्ता करायला शास्त्री यांच्या घरीच आला.. तेव्हा त्याला कळले की, पुढच्या महिन्यात येणारी गौरी याच महिन्यात भारतात येत आहे.. ते पण आजच.. त्यालाही काकूंना काही मदत करावीशी वाटत होती.. पण तो काय मदत करणार.. ह्याच विचारात असताना.. अचानक प्रमोद शास्त्री यांचा समीरला फोन आला.. आज एका महत्वाच्या मीटिंगमुळे ते सकाळी लवकरच ऑफिसला गेले होते व गौरीच्या अचानक येण्याच्या बातमीमुळे ते त्यांची मीटिंग पुढे ढकलू शकले नाही आणि आता त्यांना ऑफिसमधून निघणेही मुश्किल होते.. म्हणून त्यांनी समीरला गौरीला एअरपोर्टवरून घरी घेऊन यायची विनंती करायला फोन केला होता..
समीरलाही कोणत्याही प्रकारे का होईना पण शास्त्री कुटूंबाला मदत करायला मिळतेय याचे समाधान वाटले.. त्याप्रमाणे तो वेळेच्या आधीच गौरीची आणायला एअरपोर्टवर पोहोचला.. गौरीला तिचे बाबा तिला ऐरपोर्टवर न्यायला येतील असे अपेक्षित होते.. पण इथे तर कोणीच दिसत नव्हते.. तिने शास्त्रींना फोन लावायचा प्रयत्न केला.. पण तो लागत नव्हता.. मग तिने सुमती काकूंना फोन लावला.. तर तो व्यस्त येत होता.. "ही आई कोणाशी बोलतेय? ही पण ना" गौरी स्वतःशीच पुटपुटली.. इतक्यात एक तरुण, हँडसम, डॅशिंग, गोरागोमटा मुलगा तिच्या समोर आला आणि म्हणाला, "तुम्ही गौरी शास्त्री का?"
गौरी त्याला बघतच राहिली.. त्याच्या चेहऱ्यावरून तिची नजरच हटत नव्हती.. यात ती उत्तर द्यायचंही विसरून गेली..
इतक्यात तिला भानावर आणत त्याने तिला पुन्हा तेच विचारले.. तसे तिने हो असे उत्तर दिले..
मग स्वतःची ओळख गौरीला करून देत तो म्हणाला, "हाय, मी समीर पटवर्धन. मला तुमच्या बाबांनीच तुम्हाला घरी न्यायला पाठवलंय.."
तेवढ्यात सुमती काकूंचा समीरला फोन आला.. तसे समीरने गौरीशी भेट झाल्याचे काकूंना सांगितले व गौरीला बोलायलाही दिले..
गौरी गाडीत बसली.. अर्धा वेळ तर ती समीरलाच न्याहाळत होती.. समीर शांतपणे गाडी चालवत होता.. काहीतरी बोलावं म्हणून गौरीने संभाषण सुरू केले व ती म्हणाली, "तुम्ही बाबांच्या ऑफिसमध्ये नवीनच कामाला लागलात का? कारण मी तुम्हाला या आधी कधी बघितलं नव्हतं.. आणि बाबा का नाही आले?"
यावर समीरने तो इथे आल्यापासून ते शास्त्री कुटूंबाशी झालेली ओळख आणि आज शास्त्री काकांना अचानक आलेले महत्वाचं काम.. इथपर्यंत सर्व काही सांगितलं..
बोलता बोलता कधी घर आलं कळलंच नाही..
समीरने गाडीतून गौरीचं सामान उतरवलं व गौरी आणि तो शास्त्रींच्या घरी गेले.. सुमती काकू गौरीची फारच आतुरतेने वाट पाहत होत्या.. त्यांनी गौरीला आत घ्यायच्या आधी तिच्यावरून भाकर तुकडा ओवळला आणि तिच्या पायावर पाणी टाकले व तिच्या डोळ्यांना पाणी लावून तिला त्यांनी घरात घेतलं.. समीरने गौरीचं सामान घरात ठेवलं आणि सुमती काकू आणि गौरीचा निरोप घेऊन तो ऑफिसला निघून गेला..
सुमती काकूंची तर नुसती बडबड चालू होती.. पण गौरीचं ह्या सगळ्याकडे लक्ष कुठे होतं.. ती तर समीरचा विचार करत गालातल्या गालात हसत होती.. जणू हे सगळं एक स्वप्नच असेल!! ती मनातल्या मनात गुणगुणत होती,
कैसी हलचल है
हर पल क्यूं चंचल है।।
ये किसने जादू किया
क्यूं मेरा झुमे जिया।।
क्या मेरा दिल खो गया।।
ये मुझको क्या हो गया।।