गोष्ट एका प्रेमाची.
गोष्ट एका प्रेमाची.


तो : hii
ती : hii
तो : कशी आहेस ?
ती : मस्त.. मजेत..
तो : ( खूप धीर करून ) msg वगैरे काहीच नाही तुझा, कित्येक दिवसात...
ती : तू पण नाही केलास ना..
तो : मी केला होता, तू नाही दिलास reply...
ती : गरज होती तेव्हा केलास...
तो : तसं काही नव्हतं पण माझ्या मनात..
ती : मग काय आहे नक्की तुझ्या मनात हेही कधी कळू दिलं नाहीस मला..
तो : असं का म्हणतेस ?
ती : मग ? आपण committed झालो, त्यानंतर तू कायमच busy आणि मी कायमच free होते रे... काही महिन्यांनंतर तर general चौकशी करायलाही वेळ नव्हता तुला...
तो : अगं तेव्हा खरंच वेळ नव्हता..
ती : पण मलाही तेव्हा खरंच गरज होती तुझी.. आपल्याला स्वीकारलेल्या माणसाने आपल्याबरोबर वेळ घालवावा, असं नसेल वाटत का मला ?
तरी मी अगदीच समजून घेतलं.. तू तेव्हा busy होतास.. no problem.. पण तू free झाल्यानंतरही फक्त गरजेच्यावेळीच का आठवले रे मी तुला ? हे hurt झालं मला...
तो : मलाही वाटत होतं अगं.. खरंच.. मनापासून सांगतोय.. असं गरजेपुरतं वापरून घेण्याचा उद्देश नव्हता माझा.. खरंच..
ती : मला जाणवायला नको का रे पण हे ? मी संत नाहीये रे, सगळ्या गोष्टी आपोआप कळायला... कोणीतरी आपलं आहे, हे जाणवण्याची एक मानसिक भूक असतेच ना रे माणसाची.. ? ते एक feeling खूप सुखकर असतं रे..
तो : I am sorry..
ती : sorry नको म्हणूस तू.. मन वेडं आहे खूप.. तुझं "sorry " घोळत राहतं मनात.. आणि मग वाईट वाटत राहतं..
( तिच्या डोळ्यांत अश्रू येतात )
तो : तुला एक सांगू ?
ती : (अश्रू पुसत ) hmm
तो : तू इतकं प्रेम करतेस माझ्यावर हे खरंच माहीत नव्हतं मला...
तुझं हे प्रेम बघूनच आत्ता नव्याने प्रेमात पडलो मी तुझ्या..
ती : (नवीन आलेला अश्रू पुसत ) गप रे.. माझं आता काही प्रेमबिम नाहीये तुझ्यावर... sorryच..
तो : ( तिचा हात हातात घेतो )..... Will you marry me??.....
आणि...
ती काहीही न बोलता त्याला मिठी मारते....
साठा उत्तराची गोड गोष्ट एका उत्तरात सुफळ संपूर्ण !