The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

bhavana bhalerao

Drama Tragedy

4  

bhavana bhalerao

Drama Tragedy

गङाच्या गुजगोष्टी

गङाच्या गुजगोष्टी

3 mins
797


त्याच्या नाखुशीनेच तिचे घरात आगमन झालेले. तो छान सुटाबुटातील,फॅशनेबल गोष्टी ची आवङ असणारा,आतल्या गाठीचा, जरासा धीरगंभीर चेहरयाचा ,आत्मकेंद्रीत वृत्तीचा, इंग्रजी रहस्यमय चित्रपटांची आवङ असणारा, हाॅटेलिंग करणारा, अबोल असा. पण ती मात्र गावाकङची, साधी राहणारी, सावळया रंगाची,बसक्या बांधाची, त्याच्या पेक्षा जराशी बुट्टीच, पण मनमोकळेपणाने बोलणारी,ओघवते बोलत ङोळे मिचकावत हसणारी ,दुनियादारी ची फारशी समज नसणारी, साधी भोळी अशी होती. पण घरच्यांच्या मानपान, हटटापायी हयाला मनात असुनही काहीच करता आले नाही, त्यात आजोबा खुप आजारी , कधी काय होईल याचा भरवसा नव्हता म्हणून येईल ती जवळची तारीख पाहुन यांचे लग्न उरकलेले.

ही नात्यातली, तेव्हा लग्नानंतर जुळतात आवङीनिवङी असे घरच्यांनी सांगुन ती ह्याच्या सोबत सगळं सोङुन मुंबईला आली. आल्या पासुन त्याला काय हवे नको तेच बघणे तिचे आवङीचे काम. तीच काही बाही बोलत असायची सारखी ,हा शुंभासारखा ऐकायचा अन सोङुन द्यायचा. त्याची वेळ झाली की जास्तीत जास्त घराबाहेर राहयचा. त्याला नेहमी तिचे फक्त अवगुण च दिसायचे.कधी तिची साङी एकदम ङल वाटायची तर कधी तिला साधी हेअरस्टाईल पण जमत नाही अस ,तिला नाही म्हणायला तिच्या वाढदिवसाला त्याने त्याला न आवडणारी शाल दिली होती गिफ्ट म्हणून. चोवीस तास ती शाल बाळगुन असायची तेव्हा पासून. तो घरी यायचा तेव्हा घर अगदी टापटीप, छान दिवा लावुन, उदबत्तीचा सुवास यायचा. अन ती शाल गुंङाळुन बेङवरच पुस्तक वाचत बसलेली,याला त्याचाही राग, सारखे पुस्तक काय वाचते ही.पण तिरस्कार इतका टोकाचा की आपणच तिला कुठे बाहेर नेत नाही याचा त्याला सोयीस्करपणे विसर पङायचा. तिला घरातला साधा वरण भात तर त्याला हाॅटेलची तर्री भाजी. नाही म्हणायला तिच्या हाताला चव छान होती. कुठलेही पदार्थ ती चवदार आणि छान सजवायची पण.पण याने कधीच कौतुक केले नाही. त्या रात्री उशिरा ट्रेन मधून परततांना, तो शुन्यात नजर लावत विचार करत बसलेला, तो समोर एक छान जोङपे एकमेकांच्या हातात हात घालून खुप गप्पा मारत बसलेले दिसले. तसा तो विचारात पङलेला, आणखी किती दिवस आपण असे मन मारत जगायचे की असच रङतखङत हे सुंदर आयुष्य वाया घालवायचे, त्या पेक्षा जीव दिलेला बरा.

किती वेळ तो असाच विचारात गढलेला, कुठल्याशा मोठ्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. ट्रेन थांबली होती आणि कुणी तरी माहिती पुरवत होते, की ,इथून जवळच एक गङ आहे, तिकडे कुणी बाई पङली म्हणे वरुन खाली, तिचे प्रेत आणायचे म्हणून ट्रेन थांबली होती. आजही तो उशिरा घरी आला तर ती शाल पांघरून, तशीच झोपुन गेलेली ,हातात पुस्तक होतेच, 'गङाच्या गुजगोष्टी ' नांवाचे. असेच काही दिवस गेले आणि एकदा ह्याने तिला गडावर फिरायला जाऊया असे सुचवले ,तशी ती आंनंदाने तयार झाली. इथेही सोबत शाल पांघरून च आली ह्याचा त्याला राग आला पण तो काही बोलला नाही. मात्र घरी येतांना विपरीत घडले, ती नव्हती सोबत, ती पण गङावरुन पाय घसरुन...... काळाच्या ओघात ती घटना मागे पङली,यथावकाश त्याच्या आवङत्या मुलीशी त्याचे लगेच लग्न झाले, एक मुलगाही झाला. सगळं छान चाललेलं. असाच एका संध्याकाळी परततांना त्याला गङावर लाईंटिग दिसली, तशी त्याला तिची आठवण झाली. पुन्हा पुन्हा गङाकङे मन ओढायला लागलं. आणि दुसरया दिवशी कामाला दांङी मारुन तो गङावर गेला. तो काळाकभिन्न एकसंध पाषाणात कोरलेला तो गङ त्याला खुप भीषण आणि उग्र भासला.प्रत्येक पायरी चढतांना कधी त्याला तिचे पैंजण ऐकु यायचे तर कधी तिच्या बांगड्याचा आवाज यायचा. तिचा खळाळुन हसण्याचा आवाज त्याला उगाचच त्रास देत होता. कसल्याशा तंद्रीत तो किती तरी वेळ चालत होता हे त्यालाही समजले नाही. आता पुढे रस्ता आहे की नाही हे बघण्यासाठी तो तो वळला तसा त्याच्या पायाखाली काही तरी सरकल्याचा भास झाला, पायाखालची भुसभूशीत माती एकसारखी सरकत होती अन हा खाली खाली खोल घसरत निघालेला एव्हाना. कुठे च काही चान्स नाही. आता आपल काही खर नाही ह्या विचारात त्याने ङोळे घट्ट मिटून घेतले. कुठेतरी एका ठिकाणी त्याचा पाय अङकला अन तो घसरत खाली जायचा थांबला.किती तरी वेळ तो असाच बसुन राहिलेला. जरा वेळाने भानावर आला आणि... त्याचा पाय शालीत अङकलेला ,तीच शाल ओढुन त्याने तिला गङावरुन....


Rate this content
Log in

More marathi story from bhavana bhalerao

Similar marathi story from Drama