bhavana bhalerao

Others

3  

bhavana bhalerao

Others

दृष्ट लागणारी दिवाळी

दृष्ट लागणारी दिवाळी

3 mins
933


परदेशी सुन घरी आली म्हणून यंदा चितळेंकङे कोण धुम होती दिवाळीला. बरं नुसती सुन ,मुलगा नाही तर छान गोरागोमटा, निळया ङोळयांचा, गुबगुबीत नातु पण सोबत. आख्खा गाव नातवाला बघायचं निमित्ताने घरी लोटत होता. तीन वर्षांपूर्वी नेमकी हीच परिस्थिती उलट होती. सौरभ काही कामानिमित्त जर्मनी ला गेला होता. पण तिकडे कुणा जर्मन मुलीच्या प्रेमात पङला. आईवङिलांची नाराजी पत्करून, पण त्याने तिकडे तिच्याशी लग्न पण केल. तिला घेऊन त्याला भारतात यायच होत ना म्हणून. पण काही ना काही कामात उपटायचय आणि भारतात येण्यासाठी रद्द व्हायच. त्यामुळे तर त्या जर्मन सुनेला कुणीच चांगले म्हणत नसे. तिने माझ्या मुलाला माझ्या पासून तोङल असे म्हणत चितळे आजी रोज रङत,चिङत, मुलाशी फोनवर बोलत पण सुनेशी काय बोलणार आणि कसे, तिला मराठी समजत नव्हते, यांना जर्मन. असही त्यांना तिच्यात आजिबात रस नव्हता च. पण सोरभ ने मात्र काही वेगळे च प्लान केलेले, तसे त्याने केलेही. बायकोला घेऊन तो कायमचा भारतात आला होता. बायकोला थोङ थोङ मराठी पण शिकवली. सगळ्यात मोठ्ठ सरप्राईज होते ते येतांना आपल्या पाच महिन्याच्या बाळासकट आला. त्याच्या ह्या गनिमी काव्याची चितळे कुटुंबियांना माहितीच नव्हती. त्यामुळे नातवाला पाहिले अन सगळा रागरुसवा पळुनच गेला.हळुहळु सगळं स्वीकारले गेले. आताशा चितळे काकुंना सुनेचेही कौतुक वाटायचे. छान ,समंजस ,सुसंस्कृत वाटली ती. छान हसत सगळं समजुन उमजून वागायची. मितभाषी होती. एवढ लग्न केले पण मग आपल्या रीतीने नाही. निदान नातवाला घेऊन कुलस्वामिनीला जायचे त्यांच्या मनात आले. असही दिवाळी निमित्ताने सौरभला सुट्टी होती. म्हणून मग ऐन दिवाळीत ते कुलस्वामिनी च्या दर्शनाला निघाले. सुनबाईनी साङी नेसायला हवी होती हे जिन्स घातलेल्या सुनेला बघुन चितळे काकुंना वाटले पण त्या काही बोलल्या नाहीत. मंदिरात सगळे सोपस्कार पूर्ण केले.सुनबाईनी सगळं केले, तेही मनापासून. हे सगळ्यात आवङल त्यांना. देवीची ती सुंदर, तेजस्वी, मुर्ती बघुन जर्मन सुन खुपच प्रभावित झालेली दिसली. देवीची आरती तिने मन लावून ऐकली पण.अगदी तल्लीन झाली होती ती. वर गोलाकारात, नक्षीदार, कोरीव काम असलेला, काळयाकभिन्न दगङातले मंदिरात ,तो धुपाचा वास, उदबत्तीचा सुवास, कापराच्या ज्वाळा, देवीची ती प्रचंड उर्जा देणारी मुर्ती सगळं सगळं सुनेला मोहात पाङत होतं. त्या मंदिरात थंङगार गाभारयात तनामनाला वेगळाच थंङपणा जाणवायचा त्यामुळे सगळे बाहेर गेले तरी किती वेळ ती मात्र मंदिरात बसलेली होती. बाहेर आली तेव्हा गुरुजींनी तिच्या ओटीत एक हिरवी साङी, नारळ, बांगड्या असे दिलेले होते. ते बघून चितळे काकुंना कोण अभिमान वाटला होता. सगळं होऊन घरी आले खरे ,पण आल्या पासुन नातवाचे काही तरी बिनसलेले होते. तो सारखा सारखा रडत होता. पोट दुखत असेल, ताप असेल, अजून काय असेल ते सगळं करुन झाले, ङाॅक्टर सुध्दा घरी आले ,पण त्याला काही त्रास होतोय हे समजत नव्हते. त्या गोरया गोमटया नातवाला असे रङतांना बघुन काका, काकु खुप अस्वस्थ होत होते .दोन तीन तास झाले तरी त्याचे रडणे थांबत नव्हते. सुनबाईनी तर सगळं करुन बघितलं पण काहीच रङण थांबत नव्हतं. काकुंनी नातवाला घेतले तशी सुन आत निघून गेली. बराच वेळ काही बाहेर येईना ,त्यामुळे काय चाललय हे समजेना झाले. ती सौरभ ला सारखे काही तरी खोदुन खोदुन विचारत होती. काकुंना मनातुन खुप धाकधुक वाढत चालली. नाही नाही ते विचार मनात यायला लागलेले. पण मग लगेच सुन हातात काहीतरी घेऊन येतांना दिसली. तिने मीठमोहरया आणलेलया आणि मग तोङक्या मोङक्या मराठीत बाळाची दृष्ट काढली आणि त्याच्या त्या गोरया गोमटया चेहरयावरती एक काजळाची काळी तिट पण लावली.आणि काय आश्चर्य बाळ पण लगेच रङायच थांबले. चितळे काकुंना तर नक्की काय रिअॅक्ट करावे हेच समजेना झालेले. आश्चर्य, कौतुक, अभिमान, कुतुहल अस सगळ च त्यांना वाटत होते. तेव्हा सौरभने समजावले की त्या दिवशी देवीला गेलो तेव्हा तिने तिथे देवीची दृष्ट काढलेली बघितलेली. नजर लागु नये म्हणून असे करतात हे तिला सौरभ ने सांगितले होते, तेच लक्षात राहुन तिने बरोबर बाळाची पण दृष्ट काढली होती. आता मात्र चितळे काकुंना सुनेचे नुसते कौतुक च नाही वाटले तर अभिमान पण वाटला. लक्ष्मीपुजनाला सगळं झाल्यावर चितळे काकुं पुन्हा एकदा मीठमोहरया घेऊन आल्या अन त्यांनी त्या जर्मन सुनेची दृष्ट काढली . अशी मग त्यांची दिवाळी दृष्ट लागणारी दिवाळी ठरली .


Rate this content
Log in