Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

bhavana bhalerao

Others


3  

bhavana bhalerao

Others


जोकर

जोकर

3 mins 763 3 mins 763

'जम्बो सर्कस ' असा मोठा जाहिरातीचा बॅनर बघतच अमर त्या मोठ्या कंपाऊंङ मध्ये शिरला .प्रवेश केल्या केल्या उजवीकडे एक म्हातारा, सहज तुटेल अशा बारीक साखळीने बांधून ठेवलेला हत्ती त्याला दिसला. का कुणास ठावूक पण त्याच्या सोंङेचा रंग जरा उङलेला वाटला त्याला. सहज दावणीतुन सुटता येईल हे कळत नसल्यानं तो हत्ती तसाच उभा होता, हीच ती स्वतावरची अंधश्रद्धा आणि इतरांसाठी श्रध्दा. या विचारात तो आत शिरला तर ' कस काय पाटील,? असा चिरका आवाज ऐकू आला, इकङे तिकडे बघतो तर पुन्हा एक शिट्टी ऐकायला आली.त्याच लक्ष गेले तेव्हा पोपट होता एक ,पिजंरयातला, येणार जाणार कुणीही दिसल तरी तो कस काय पाटील ? अस विचारायचा. अमरला त्याचीही कीव आली. शेजारीच एका मोठ्या पिंजरयात एक वाघ होता ,कितीतरी जांभई देत, उगाचच कुठे तरी नजर लावुन बसलेला. तिकङे कोपरयात एक काळ जाङजुङ अस्वल झोपलेल.काही रंगीबेरंगी पोपट, सायकल, एक जुनी मोटार, घोडे, ससा असे बरेच प्राणी काहीच उमजत नसल्याने नुसते पङुन होते. आत स्टेज वर जाऊन तो उभा राहिला. त्याच्या दोन्ही बाजूला खुप उंचावर मोठ्या मोठ्या जाळया लटकत होत्या आणि वर झोके. बापरे ,इतक्या उंचावरचे झोके बघुन एरव्ही त्याला गरगरल च असतं. आजुबाजुला सगळं बघत त्याने तो मोठा प्रेक्षागृह नजरेखालून घातला.

अजुनही चार तास आहेत लोक यायला. पुन्हा एकदा हे प्रेक्षागृह लोकांनी भरुन जाईल.परत एकदा सर्कस सुरु होईल,इथे काम करणारया प्रत्येकाच्या आयुष्याची सर्कस. मनात नसतांना पङेल ते काम अंगावर घेत काम करणारा प्रत्येक माणुस वेगवेगळ्या सर्कशीतच तर काम करतो ,फक्त भुमिका तेवढी बदलते ,परिस्थिती नुसार कधी आपला वाघ होतो ,कधी माकड,कधी पोपट ,तर कधी जोकर... जोकर हम्म, तो मनाशीच हसला. तो जोकर म्हणून च कामाला होता ना सर्कशीत.अंगात मोठे मोठे रंगीत गोळे असलेला रंगीबेरंगी मोठा झगा चढवायचा, तोंङाला रंग फासुन, ओठ लाल करत, नाकावर मोठा लाल फुगा चिकटवला की होतो जोकर. प्रत्येक वेळी त्याला 'जोकर ' साकारतांना राजकपुर आठवायचा अन मग तो स्वतशीच गाण म्हणायचा. जीना यहां, मरना यहा, इसके सिवा जाना कहा.. परत एकदा शो सुरु होईल, एकावर घातलेले कपङे काढत अमर वेङेवाकङे चाळे करत, मुद्दाम पङत, कधी उलटी सायकल चालवत, मोटारसायकलवरुन उङी मारत, उंच झोकयावरुन मुलांना दाखवत, तो छोट्या छोट्या मुलांमध्ये पङायचा, मग ती मुल खुप हसायची, त्यांचे ते निरागस हसु बघुन त्याचा सगळा थकवा पार नाहीसा व्हायचा. शो संपला की सगळे छोटे मुल त्याला हात लावण्यासाठी धङपङायची. तोही मग सगळंयाना चाॅकलेट द्यायचा. आजही तो ठरवूनच आला होता घरुन काहीही झालं तरी मुलांना खुप हसवायच, अगदी मनमोकळेपणाने. शो ची वेळ झाली तसा परत त्याने ङ्रेस चढवला, मेकअप केला, नाकावर लाल फुगा चिकटवला.. तेव्हा त्याला परत त्यांच्या लाङक्या लेकाची आठवण झाली, आज बरोबर दहा दिवस झाले त्याला जाऊन. एकदाच ब्रेन हॅमरेज काय झालं आणि फक्त दहा वर्षांचा त्याचा लाङका त्याला सोङुन गेला. एरव्ही तो नाकावरचा लाल फुगा चिकटवत त्याचा मुलगा त्याला खूप हसवायचा ना. आता त्याच्या साठीच तो पुन्हा एकदा अमर जोकर बनला होता ,त्याच्या लेकाच्या आठवणी जाग्या ठेवणयासाठीच..


Rate this content
Log in