पैठणी
पैठणी


आजही डोळयासमोर तो भारदस्त आणि माणसांनी भरलेला तो वाङा लख्ख दिसतो. बाहेर उघडणारा तो भलामोठा लाकडी दरवाजा त्याच्या आत कितीतरी गोष्टी दङवुन बसला असेल.जवळ जवळ 200 वर्ष जुना वाङा .पण दिमाखात उभा. मी हल्ली तिकडून जात नाही सहसा. साने आजोबा आता नाहीत. आणि आजी पण गेल्यात पुण्याला. पुर्वी फार येण जाण असायचं वाङयात. घरात काही गोडधोङ बनले की हमखास ङब्यांची देवाणघेवाण व्हायची. मला तर साने आजींनी केलेले सगळे च पदार्थ जाम आवङायचे. सुरळीच्या वङया तर त्या इतक्या सुंदर बनवायच्या की अजुनही कुठे तशी चव नाही. आळुवङी, तांदळाचे घावन, उकङीचे मोदक, पुरणपोळी, ओव्याच्या पानाचे भजे, किंवा उकरपेंढी असल काय काय करायच्या. लोणच्याचे प्रकार तर किती, कंरवंदाचे, लिंबाचे, मिरचीचे, गाजराचे, आणि बरेच. खुप काही आठवतय आता. त्या भल्यमोठया वाङयात साने आजी आजोबा राहयचे. एकच मुलगी, ती लग्न होउन पुण्याला होती. आजोबा रीटायर्ड शिक्षक, आजी घरकामात, कलाकौशल्यात हुशार. अजूनही घरात जातांना बाहेर सुंदर एकसारखी ठिपके जोङलेली रांगोळी दिसणार. शेजारी छोटेसे तुळशीवृंदावन. घरात फारसे सामान नाही पण नाही म्हणायला पुस्तकांनी गच्च भरून दोन लाकडी कपाटे होती. त्यात प्रत्येक पुस्तक छान कव्हर लावुन ठेवलेले.साने आजोबा पुस्तक शौकीन. बघावे तेव्हा कुठलतरी पुस्तक वाचत बसलेले दिसायचे.त्यातल्या एका कपाटावर जुना रेडिओ. रोज सकाळी ही दोघं रेडिओ ऐकायचे. संध्याकाळी जुनी गाणी.
संध्याकाळी अमीन सयाजीचा निवेदनाचा आवाज आजोबा कान देऊन ऐकत. आजी पण सुंदर गाणे म्हणायच्या. गोरयापान साने आजी राहयला पण खुप नीटनेटक्या. अंगात स्वच्छ काॅटनचे लुगङे, तेही इस्तरी केलेले, हातात काचेच्या बांगड्या, गळ्यात मंगळसुत्र, कपाळावर लालचुटुक चंद्रोकोर, कानात मोत्याच्या कुङ्या ,केसांत कधी मोगरयाचा तर कधी अबोलीचा गजरा.आणि चेहरयावर प्रसन्न स्मित हास्य. मी कधीच साने आजींना रागावलेले, तक्रार करतांना, चिङलेल्या असे पाहिलेच नाही. कुठलीच गोष्ट या जगात कारणाशिवाय घङत नाही. आणि प्रत्येक घटना परिस्थिती नुसार योग्यच असते.आपण चांगले तेवढे घ्यावे आणि बाकी विसरावे असे म्हणायच्या त्या.मी त्यांच्या कङे आदर्श म्हणून बघायचे. काही अङल की त्या उभयतांचा सल्ला आवर्जुन घ्यायचे.आपण परिस्थितीला मान देऊन शांतपणे सामोरे गेलो ना परिस्थिती निवळते. असे आजोबा सांगत. मला ही पटायच मग. त्यांचा आनंद निखळ असायचा.पैशातून मिळणारा आनंद पैसा संपला की निघुन जातो.म्हणून मग पैशाशिवाय आनंदी राहणे गरजेचे आहे हे त्यांनीच शिकवलेय. पुस्तक वाचनात, निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेत, जुना इतिहास, जुनी गाणी, आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे जुन्या आठवणी ह्या आपला खजिना. किती किती छान बोलणे असायचे ते.साने आजी तर बरयाचदा आठवणीतल्या गोष्टी सांगत बसायच्या. त्यांची आई खुप हुशार आणि शिस्तप्रिय होती. तिच्या आठवणींना उजाळा देत त्या खुप भावुक व्हायच्या. त्यांच्या आईची एक पैठणी होती .तिच्यात सोनेरी जरतारांचा वापर करून ती विणलेली होती.पण आजींना जेव्हा ह्या वाङयात घर घ्यायचे ठरले तेंव्हा ती पैठणी विकुन आलेल्या पैशातून हे घर घेतलं गेले असे मला कळले.
आजींचा तर अजुनही त्या पैठणीत खुप जीव होता.त्यांना पैठणीची सणासुदीला नेहमी आठवण यायची. पण बाकी एरव्ही त्या खुश असायच्या. अशीच एकदा सहज चक्कर मारायला म्हणून मी त्यांच्या घरी गेलेले. बाहेर छान पावसाळलेले वातावरण होते. मला ओव्यांच्या पानांची भजी खायची इच्छा झाली होती. पण घरात गेले तर आजोबा आरामखुर्चीत बसुन रेङिओ वर तलत महुमुद ऐकताय, हातात वाफाळलेला चहा. व्वा, आजोबा काय छान मैफिल जमवलीये. अग ,ये,ये, बस,थांब तुला मस्त आल गवतीचहा टाकुन चहा आणतो, अस म्हणून ते स्वयंपाकघरात गेले पण.बहुतेक आजी बाहेर गेलेल्या असाव्यात. आजोबांनी मस्त फक्कड चहा बनवला होता बाकी . आजी कुठेयेत? आमची वहिदा गेलीये भजनाला. आजपासुन रोज रामरक्षा शिकवायला घेतलीये तिने मुलांना. हो का.वा .छानच. एव्हाना माझा चहा पिऊन झाला होता. मी पण मंदिरात भेटते मग आजींना. असे म्हणुन मी निघतच होते तर आजोबांचा आवाज आला, अग, तु माझ एक काम करशील का ? हो ! पण कुणाला सांगू नकोस हम्म. अगदी तुझ्या आजीला पण नाही. मी जरा आश्चर्यानेच आजोबांना विचारले ,काय काम हो ? तसे ते म्हणाला, आमच्या हिला पैठणी ची भारी हौस आहे. पण परिस्थिती नुसार वागत गेलो अन तिला हवे ते कधी विचारलेच नाही ही खंत आहेच मनात. आता आयुष्याच्या संध्याकाळी मला कुठलीही खंत मनात ठेवावीशी वाटत नाही. तेव्हा हे मी पेन्शन च्या पैशातून थोङेफार जमवलेत पैसे. येत्या भाद्रपदात आमच्या लग्नाला पन्नासावं लागतय तेव्हा तु तुझ्या आवडीने तिला एक छानशी पैठणी आणुन देशील? मला तिला पैठणी नेसलेली बघायचेय. व्वा, का नाही आजोबा, लगेच आणुन देईल .त्यात काय एवढं. हो! पण हे आपल गुपित आहे हम्म. हो ,हो ,नक्की अस सांगून मी जवळ जवळ घरातून पळालेच. कारण आता साने आजी यायची वेळ झाली होती ना. मी दोनच दिवसांनी छान पैठणी आणुन ही ठेवली. आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या दोन तिन दिवस आधीच आजोबांना नेऊन पण दिली.पण नियतीने काही वेगळे च ठरवुन ठेवलेले. लग्नाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच सानेआजोबांना ह्दयविकाराचा झटका आलेला आणि त्यांना ङाॅक्टरांनी फक्त चोवीस तासांची मुदत दिलेली. मी हॉस्पिटल ला पोहचले तेव्हा आजी आजोबांचा हात हातात घेऊन बसलेल्या.
मला तर काय बोलावे तेच सुचत नव्हतं. मी गेले तशा साने आजी पटकन उठल्या अन मला म्हणाल्या, तु जरा बसतेस का यांच्या जवळ, मी पटकन घरी जाऊन येते, मी काही म्हणायच्या आत त्या पाठमोरया वळुन गेल्या पण.त्यांच्या अशा वागण्याचा मला जरा धक्काच बसलेला .वाटल, आता या अशा वेळी आजोबांना असे सोडुन या घरी का चालल्यात. पण मग मी आजोबांजवळ बसले. तलत महुमुद चे गाणे ऐकत बसणारे,छान छान गप्पा मारणारे आजोबा किती शांतपणे झोपले होते. थोडया च वेळात समोरुन साने आजी येतांना दिसल्या.त्यांच्या कङे बघून यांना वेङ तर लागल नसावं हा विचार माझ्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. त्यांनी ती मी आणलेली हिरवीगार, केशरी काठाची पैठणी नेसलेली, कपाळावर लालचुटुक चंद्रकोर, नाकात नथ अशा पेहरावात त्या आजोबांसमोर आल्या आणि म्हणाल्या, अहो ! कशी दिसतेय मी ? तसे ङोळे उघङुन आजोबा त्यांच्या कङे बघून छान हसले. मला म्हणाले , काय ग ? कशी दिसतेय आमची वाहिदा ? मी आपल खुणेनेच छान असे म्हटले कारण ङोळयात गच्च भरून आलेले पाणी मला काहीच बोलु देणार नाही हे मला माहित होत. तशा आजी म्हणाल्या,अग आयुष्याला चोवीस तासांची मुदत असली म्हणून काय झालं, प्रेम तर मनात जपुन ठेवलेल्या पैठणी सारखे असते. त्याला कसलीही मुदत नसते. ते अजरामर असते प्रेमाच्या जरीने विणलेल आणि विश्वासाच्या तारेने बांधलेले. भावना.
( कथा आवडली तर नावासकट शेअर करायला हरकत नाही)