गजरा
गजरा
रमा: हॅलो , हॅलो.. अहो अजून किती वेळ आहे. संध्याकाळ होत आली. हल्ली बाई कातरवेळी जीव माझा घाबरा घुबरा होतो. या बर लवकर...
दिपक: अग येतो लवकर, एखाद्या नव्या नवरी सारखी तुझी अवस्था झाली आहे.
रमा : इश्य!! हे काय? मी काही तशा अर्थाने नाही बोलले. अहो काळजी वाटते तुमची. बी.पी , शुगर आहे म्हणून वेळेवर जेवण झालेले बरे...
दिपक: अग आज ही तू नव्या नवरी सारखीच लाजतेस. तिथे असतो तर...
रमा: बस् झाल आता हे, तुमच्या जिभेला काही हाड आहे का?
दिपक: अग रमा जिभेला काही हाड असत का? तुझ आपल काही तरीच...
रमा: बर बर बस् करा. या बर लवकर घरी. वाट बघून बघून जीव मेतकुटीला आला आहे.
दिपक: हा बघ, निघालोच आता.अग पण तू फोन ठेवला तर मी निघेल ना? ...हा.हा.हा.
रमा: असो हसताय काय? मी पण जरा वेंधळीच आहे. हे ठेवते बघा फोन. या आता लवकर...
दिपक:आज राणी सरकारला
फारच काळजी लागली आहे.काय भानगड आहे...?
रमा: झाले का पुन्हा तुमचे सुरु? आता या वयात काय भानगड असणार?....
दिपक: तेच तर विचारतोय?
रमा: चिडून, हे ठेवते फोन आता. या लवकर... जोरात फोन ठेवते.
रमा: मुल परदेशात गेल्यापासून घर अगदी खायला उठते. नवीन लग्न झाले होते तेव्हा किती धावत येत होते दिपक नी आज. वाट बघून बघून डोळे दुखायला लागतात. घरी कोणी वाट बघत असेल याची जाणीव सुध्दा नसते.
टि्ंग टि्ंग ...दाराची बेल वाजते.
रमा: दार उघडते . दारात दिपक उभा. कितीदा सांगितले तुम्हाला एवढा वेळ बाहेर नका राहू म्हणून. काही घरदार आहे का नाही?
दिपक: अग हे काय? पूर्वी कशी मी बाहेरून आलो की प्रेमाने मला चहापाणी विचारत होती नी आता...?
रमा: अहो आता काय पूर्वीचे दिवस राहिले आहेत का? सूना , नातवंड आली आली आहेत...
दिपक: येऊ दे ग. ते बघ कसे आनंदाने राहतात तसे आपण ही राहू की. कुणी सांगितलं की सूना मुल आल्यावर आपण प्रेम करायचे नाही....
रमा: अहो आज काय झाले आहे तुम्हाला? फारच रोमांटिक मूड मध्ये आहे स्वारी...
दिपक: अग चल. लवकर तयार हो. छान साडी वैगरे घाल... मी ही तयार होऊन येतो.
रमा: अहो आताच तर बाहेरून आला आहात.आता पुन्हा कुठे जाणार आहात?
दिपक: अहो चला हो राणी सरकार. आज मस्त हाॅटेल मध्ये जेवण करून
बगीच्यात फिरायला जाऊ..
रमा: मला तर काही कळेना, काय चाललंय यांचे...
दिपक: अग रमा, झाली का नाही तयार....
रमा: हो, हो.. आलेच... अस म्हणत रमा पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी दिपकने घेतलेली सुंदर साडी घालून दिपक समोर उभी राहते....
दिपक: वाह!! मॅडम आज ही तुम्ही पूर्वी एवढ्या सुंदर दिसत आहात.... किंबहुना त्यापेक्षा जास्त....
रमा: चला तुमच आपल काही तरीच... आणि हो तुम्ही ही अजूनही चाॅकलेटी हिरो दिसतात... अस म्हणत रमाने जीभ चावली...
दिपक: रमा किती छान लाजतेस... आज मला पुन्हा पूर्वीचे दिवस आठवले...
रमा: बर चला आता...
दिपक: कशाची तरी आठवण येते. उठून आत जातो. हातात पुडा घेऊन येतो. रमा ये रमा..
डोळे बंद कर जरा...
रमा : आता हे नवीन काय? अहो आपण काय लहान आहोत का?..
दिपक: कर ग रमा....तिला प्रेमाने जवळ घेत....
रमा : डोळे मिटून घेते..
दिपक: हळूवार पुड्यातून पांढ-या शुभ्र मोगर्याचा गजरा काढतो नी रमाच्या केसात माळतो..... मोगर्याचा सुगंधाने रमाचे मन गंधीत होते...
दिपक: उघडा डोळे. रमाबाई
रमा: तिचे डोळे आश्रुंने भरून येतात... किती दिवसांनी आज दिपकने तिच्या साठी तिचा आवडता मोगर्याचा गजरा आणला होता.
दिपक: हे काय? असे डोळ्यात पाणी का?
रमा: काही नाही. थांबा हं.... मी आलेच म्हणत रमा स्वयपांक घरात जाते. आज दुपारीच तिने गाजराचा हलवा करून ठेवला होता.... ती गाजराचा हलवा घेऊन येते नी आपल्या हाताने दिपकला भरवते.....
दिपक: म्हणजे राणी सरकारला आजच्या दिवसाची आठवण होती म्हणायची.... मला वाटतं वयोमानानुसार विसरली की काय....?
रमा : अस बर विसरेन. तुम्ही तरी कुठे विसरलात आजचा दिवस....
दिपक: खर आहे. नवरा बायको च नात हे जन्मोजन्मी चे असते. ते कधी विसरत नाही....
रमा: आज लग्नाला पस्तीस वर्ष झाली. दिवस कसे फुलपाखरा सारखे भरभर उडून गेले... ते कळले नाही.
दिपक: हो ना. तू माझ्या आयुष्यात आली नी माझे जीवन बदलून गेले. मुल झाली , संसार केला पण तुझ्याशिवाय राहणे मला नाही जमणार मला....
रमा: अहो माझी ही तीच अवस्था आहे.तुमच्या शिवाय माझे पान हालत नाही.
दोघे एकमेकांचा हात हाती घेऊन बसतात.
दिपक: रमा.... ये रमा...
खर सांगू आता भीती वाटते ग.... तू तू...मला.. सोडून...
रमा: दिपकच्या तोंडावर हात ठेवत बोलते.. माझे जरा ऐकाल... तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले. मला खूप सुख दिले.मी आपल्या संसारात समाधानी आहे पण.. पण...
दिपक: पण.. पण काय रमा? बोल ना स्पष्ट..
रमा: मला एक वचन द्याल आज..
दिपक: बोल रमा.. आज पर्यंत तू माझ्याकडे काही मागितले नाही. आज निःसंकोचपणे माग... काय हवे ते.
रमा: खर सांगू... आपण जन्मभराचे सोबती आहोत हे जरी खरे असले तरी शेवटचा निरोप कोणी तरी अगोदर किंवा नंतर घेणार हे सत्य आहे... त्यात जर मी गे...ले..
दिपक: नाही नाही रमा....
मी तुझा विरह नाही सहन करू शकणार...
रमा: एवढ्यासाठी च मी वचन मागते .... तुम्ही स्वत:ला सांभाळून घ्यावे..
द्याल वचन मला....
दिपक: अस नको बोलू रमा... रमा..जीव.. कासाविस होतोय माझा....
जाऊ नको तू सोडून
जाईल प्राण हा निघून...

