भूक (अलक)
भूक (अलक)
1 min
747
सदा वाईट दोस्तांच्या संगतीने पार दारूच्या नशा पाई सदा पुरता बरबाद झाला होता. बायजाला आजकाल उपासमारीमुळे अंगावर दुध येत नव्हते. कामाचा पगार हातात पडताच ती धावत दुकानाकडे धावली.समोर सदाला बघून घाबरली. तेवढ्यात सदा ने तिच्या हातातले पैसे हिसकावून घेत दोन-तीन शिव्या दिल्या. ती हात जोडून गयावया करू लागली. सदा काही न ऐकता निघून गेला. भुकेने कळवळून रडणाऱ्या बाळाला बायजाने पोटाशी धरले नी त्या माऊलीला परत पान्हा फुटला...
