भूक ( अलक )
भूक ( अलक )
दारूच्या नशा पाई सदा पुरता बरबाद झाला होता. बायजाला आजकाल उपास मारीमुळे अंगावर दुध येत नव्हते. कामाचा पगार हातात पडताच ती धावत दुकानाकडे धावली. तेवढ्यात सदा ने तिच्या हातातले पैसे हिसकावून घेत दोन-तीन शिव्या दिल्या नी निघून गेला. भुकेन कळवळून रडणार्या बाळाला बायजाने पोटाशी धरले नी त्या माऊलीला परत पान्हा फुटला.....
