त्रास देऊ नका कोणाला
त्रास देऊ नका कोणाला
अगदी खरे आहे.त्रास देऊ नका कोणाला पण हे कितपत लोकांना कळेल. आपल्यामुळे इतरांचे मन दुखावले जाता किंवा समोरची व्यक्ती हळवी आहे.तिला अपल्यामुळे फार त्रास होतो याची जाणीव तरी असते का? त्रास देणाऱ्यांना. हा विचार माझ्या मनात सतत येतो. मन बेचैन होते.
कधी कधी कळत नकळत आपल्या काही कृतीमुळे किंवा सहज बोलण्यामुळे कोणाचे मन दु:खावल्या गेले तरी आपण मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफी मागतो.यात कमीपणा नाही.आपली चुक कबूल करायला ही मनाचा मोठेपणा असायला हवा. तो सर्वांजवळ असेलच असे नाही पण माझे कधी चुकतच नाही मी माफी का मागू? असा जेव्हा मी ची किंवा ग ची बाधा होते ,तेव्हा ती व्यक्ती माणसात जमा आहे असे वाटत नाही.
शेवटी "व्यक्ती तितक्या प्रकृती " असो. आपण आपले चांगले विचार कोणामुळे सोडायचे नाही. जगात खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास होतो, हा माझा अनुभव आहे ,असे असले तरी त्रास कोणाला देऊ नये."जगा नी जगू द्या." हाच सृष्टीचा नियम आहे.यात आपण बदल करणारे कोण आहोत?
