STORYMIRROR

Pratibha Vibhute

Tragedy

2  

Pratibha Vibhute

Tragedy

परिवर्तन

परिवर्तन

11 mins
170

सदा पाच वर्षांचा असताना च अल्पशा आजाराने त्याच्या आईचे निधन झाले. बिचारा गणप्पा , सदाचा बा बायकोच्या जाण्याने खूप दुःखी कष्टी झाला. काय कराव, कस सांभाळायच सदाला ? याची काळजी सतत त्याला वाटत होती. चार दिवस लोक येतील , मदत करतील पण पुढ काय? त्यात रोज सकाळ-संध्याकाळ सदा त्याच्या बा ला विचारायचा  " माझी आई कुठ गेली हाय , कधी येणार हाय?" त्याला कस सांगणार , समजावणार हेच गणप्पा ला कळायच नाही. तो सदाला पोटाशी धरून आश्रु गाळत असे. हळूहळू सदा समजून गेला . आईबद्दल विचारल्यावर आपला बा नुसता रडतो. मग तो आपल्या छोट्या छोट्या हाताने गणप्पा चे डोळे पुसत म्हणायचा " बा तू रडू नग , आई येईल लवकर बघ. " हे ऐकून गणप्पा सदाला छातीशी कवटाळून खूप रडत असे. 


  प्रत्येक दुःखावर काळ जाणे हाच उपाय असतो.तसा गणप्पा ही सदा कड बघून हळूहळू सावरायला लागला. शेजारीपाजारी मदत करायचे मग जवळच्या नातलगा न गणप्पा ला दुसर्या लग्नाची गळ घातली. तुला , सदाला या घराला सांभाळणारी कोणी हक्काची नको का? रोजचा कामधंदा , भाकर तुकडा कोण घालील तुमाला? पण सदाला सावत्र आई नीट सांभाळील का नाही याची भीती गणप्पाला वाटत होती म्हणून तो दुसऱ्या लग्नाला तयार होत नव्हता.रोज शेजारचे वडिलधारी माणस गणप्पाची समजूत घालायचे. " सदा लहान हाय , त्याला आई नी बा दोघाची बी गरज हाय . तवा लई इचार करू नगस " रामू काका दटावत गणप्पा ला म्हणाला. हळूहळू या बोलण्याचा परिणाम गणप्पा वर होऊ लागला. त्याला बी रामू काकाच बोलण पटल. तसा गणप्पा म्हणाला " मी लगीन करीन पण माझी एक अट हाय, मी लगीन त्याच पोरीशी करीन जी फक्त माझ्या सदाची च आई होईल." मी तिला मुल होऊ देणार नाही. रामू काका म्हणाला ठीक हाय . बघू कोण तयार होतय? लगेच नातलगान मध्ये शोधाशोध सुरु झाली. जवळच्या गावात राहणाऱ्या शेवंता नी ही अट मान्य केली कारण तिला आई-वडील नव्हते. लांबच्या नात्यातल्या काकाने तिला फक्त घरकामाला ठेवले होते. काकू खूप त्रास द्यायची. या कचाट्यातून सुटता येईल व आपल्या ला ही खात पीत घर व हक्काच माणूस मिळल म्हणून शेवंता या लग्नाला तयार झाली. फुकटची ब्याद घरातली जाते म्हटल्यावर शेवंताचे काका काकू ही लग्नाला तयार झाले. गणप्पा व शेवंता च लगीन झाल नी सदाला आई मिळाली. ठरल्या प्रमाणे शेवंताने पोटच्या पोरासारखा सदाचा सांभाळ केला. सदा वयात आल्यावर त्याला शोभल अशी मुलगी बघून त्याच्या लग्नाचा बार उडवून दिला. शेवंतान आपल्या पोराला आईची माया दिली नी आपल्याला चांगली साथ दिली म्हणून गणप्पा ही शेवंता ला जीव लावायचा. तू होती म्हणून माझा संसार चांगला झाला म्हणून शेवंता च कौतुक करायचा. शेव़ंताही आपल्या संसारात खूष होती.


   शांत, मनमिळाऊ इंदू शेवंता ची सून म्हणून या घरात आली. दोनाचे चार लोक घरात झाले. गणप्पाला पाच एकर रान नी राहायला घर एवढीच काय ती संपत्ती होती. घरातली सगळी माणसं दिवसभर शेतात राबायची त्यामुळे होईना वर्षाला पोटापुरत का अन्नधान्य मिळत असे. सगळ सुखात चालल होत. पुढे दोन वर्षाने सदाला मुलगी झाली. गणप्पा व शेवंता आजी आजोबा झाले. नातीच्या येण्याने घर आनंदून गेले.


घराची जबाबदारी वाढत चालली होती त्यात खाणारी तोंड वाढली. यंदा पाऊस ही खूप कमी पडला. पेरण्या झाल्या पण पाऊस न आल्याने धान्य वाळून गेले. वर्षभर काय करायच, काय खायच? सगळ्यांना च काळजी वाटत होती.गावात मजूरी मिळत नव्हती. खूप विचार करून सदाने गाव सोडायच ठरवल. त्याचे बरेच दोस्त यापूर्वी च शहरात बांधकाम करण्यासाठी मजूर , गवंडी , इतर काम करत होते. शहरात भरपूर मजूरी मिळायची पण आई बा या गोष्टीला तयार व्हायचे नाहीत . काय करावं, कस करावं ? न राहवून ही गोष्ट त्यानी इंदूला सांगितली. इंदू समजदार होती. घरच्या परिस्थितीची तिला जाणीव होती. ती सदाला समजावत म्हणाली "आपण काय नेहमी साठी आई , बा ला सोडून जाणार आहोत का? अधूनमधून येत जाऊ त्यांना भेटायला. शहरात आपला जम बसला की घेऊ बोलवून दोघांना तिकडच.तिच्या अशा बोलण्याने सदाला धीर आला. लवकर ही गोष्ट सदाने आई नी बा ला सांगितली तशी दोघही हिरमुसली. डोळ्यात पाणी आणून शेवंता म्हणाली "आम्हा म्हातारा- म्हातारी ला सोडून जाऊ नकोस, अर्धी चतकोर खाऊन राहू आनंदान इथ. पुढच्या वर्षी येईल चांगल पीकपाणी. सदाने कशीबशी आई-बा ची समजूत काढली. इथ अस उपाशीतापाशी रहाण्यापेक्षा मी, इंदू शहरात जाऊन काम करतो मग एकदा कामाचा ठिकाणा लागल्यावर तुम्हाला बी घेऊन जाईल अस म्हणत जड अंतःकरणाने सदाने आई -बा चा निरोप घेतला.आपल्या दोस्ताच्या मदतीने त्याला एका बांधकामावर वाॅचमन म्हणून काम मिळाले. रहायला चार पत्र्याची शेड व इंदूला काम मजूरी मिळायची ,अजून काय हव होत. सुरवातीला जरा अवघड गेल दोघांनाही पण हळूहळू ते रूळू लागले.अधूनमधून सदाचे आई, बा शहरात येऊन भेटून जात असे. चार पैसे जमले की तो बा ला देत असे. बघता बघता वर्ष निघून गेले.

 शहरातील वातावरण इंदूला चांगलेच मानवले होते. तिची तब्येत चांगली टवटवीत दिसत होती. ती रहात होतीत त्या कंपाऊंड ला लागूनच एक बंगला होता. त्या बंगल्यात माधवी -विजय हे जोडपे राहत होते. त्याचे दोन्ही मुल परदेशात होती. हळूहळू माधवी व इंदूची ओळख झाली. शेजारी म्हणून काही उरल सुरले अन्न , जुने कपडे, वस्तू माधवी इंदूला द्यायची. त्याबदल्यात इंदू माधवी ताईचे घरातले काम करत असे. एवढ्या श्रीमंत घरची असूनही माधवी स्वभावाने खूप चांगली व प्रेमळ होती.ती इंदूला आपल्या मुलीसारखी वागवत असे. दोघींना ही एकमेकींचा आधार वाटत असे.घरात कुठलाही पदार्थ बनवला तर माधवी इंदूला सोडून कधीही खात नसे. त्यामुळे त्या दोघींन मध्ये एक प्रेमाच नात निर्माण झाले होते. इंदूची मुलगी पिंकी तर सतत माधवीच्या घरात आजी आजी करत वावरत असे. माधवी व तिच्या मिस्टरांना ही पिंकीचा खूप लळा लागला होता. पिंकीमध्ये ते आपल्या नातवंडांना शेधत असत.असे दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस अचानक इंदूची तब्येत बिघडली. ती उलट्या मागून उलट्या करू लागली . माधवी धावतच आली. काय ग, काय झाले ? काय खाल्लेस रात्री ? असे विचारत माधवी म्हणाली चल लवकर , माझी मैत्रीण जवळच राहते ती डाँक्टर आहे .आपण तिच्या कडे जाऊन येऊ इंदूला घेऊन माधवी सकाळीच डॉ. निशा कडे गेली. निशाने इंदू ची तपासणी करून घाबरण्याचे काही कारण नाही , " गुड न्यूज असल्याचे सांगितले. इंदूला दिवस गेले आहेत ,नीट काळजी घेण्यास सांगितले. घरी आल्यावर इंदूने ही गोष्ट सदाला सांगितली . त्याला ही आनंद झाला पण या बरोबरच जबाबदारी वाढत असल्याची जाणीव झाली. इंदू तर सदैव विचारात मग्न असे. पहिल्या सारख मन मोकळे पणाने बोलत नसे , हसत नसे. काय झाले या मुलीला? माधवी ला काही समजत नव्हते . न राहवून एक दिवस तिने इंदूला विचारले " दुसऱ्या मुलाच दडपण आहे का तुला , का आणखी काही कारण आहे तुझ्या काळजीचे ?" सांग ना. काही नाही हो ताई म्हणत इंदूने बोलण टाळून दिले. आम्ही दोन तीन दिवसांसाठी गावी जाऊन येतो असा माधवी ला निरोप देऊन सदा - इंदू मुलीसह गावी निघून गेले. नातीला भेटून आजी आजोबा ला आनंद झाला. बरेच दिवसांनी सगळे एकत्र आल्यामुळे घर भरल्यासारखं वाटत होतं. तस इंदूला दिवस गेल्याचे समजल्यावर शेवंता म्हणाली " या खेपेला वंशाला दिवा पाहिजे बर का इंदू , आम्हा म्हातारा - म्हातारी ची एवढी इच्छा पूरी झाले की आम्ही डोळे मिटायला मोकळे झालो." सदाची बी इच्छा होती यावेळेला पोरगा व्हावा व आई ,बा ची आस पूरी व्हावी.आई - बा ने किती केलय माझ्यासाठी? या अशा बोलण्याने इंदू मात्र घाबरून गेली होती. हे काय माझ्या हातात हाय काय? देवाला हात जोडून नमस्कार करत म्हणाली. खर तर हेच कारण होत तिच चिंता करण्याच पण ती कोणाला सांगू शकत नव्हती. जवळचे नातेवाईक इंदू सदाला भेटायला येत होते. इंदूची गोड बातमी समजली की सर्वांन समोर शेवंता म्हणायची " आता नातूच व्हायला पाहिजी." हे आवर्जून इंदूला सांगायची. त्यामुळे तर इंदू पार बिथरून गेली होती त्यात शेवंताची शेजारीण म्हणाली " आपल्या गावच्या रखमादाई ला कळत बघ, पोरगा हाय का पोरगी ? जरा इंदूला नेऊन दाव. झाल हे ऐकल नी शेवंताने इंदूला चल आपण बाहेर जाऊन येऊ म्हणत रखमाकडे घेऊन गेली.इंदूला बाहेर बसवून शेवंता रखमाला भेटायला आत गेली. थोड्या वेळाने परत येऊन इंदूला घेऊन आत गेली. रखमाने इंदूच्या हाताची नाडी बघीतली , तिला काही प्रश्न विचारले . एखाद्या भित्र्या सशावाणी इंदू हे सगळ चूपचाप बघत होती. सासू पुढ बोलायची हिंमत नव्हती तिची , काय करणार बिचारी? इंदूला बाहेर बसवून शेवंता परत रखमाला बोलण्यासाठी आत गेली. रखमा म्हणाली " तुझ्या नशिबात काही नातू नाही ग , या खेपेला ही पोरगीच हाय." शेवंताचे डोळे भरून आले. ती म्हणाली " नग नग दोन दोन पोरी काय करायच्या हायत ? माझ्या पोराला किती कष्ट कराव लागतय, खर्च निभत नाही, त्यापरीस खाली करून टाकू. " इंदूला संशय आल्यामुळे हे सगळ बोलण बाहेर कान लावून ऐकत होती. इंदूच काळीज धडधडायला लागलं. " पोटची पोर मारून टाकायची, काय गुन्हा हाय तिचा ? ती पोरगी हाय म्हणून जन्माला येण्याच्या आधीच ... इंदूच्या डोळ्यातून आश्रुधारा वाहू लागल्या. सासू बाहेर येताना दिसताच तिन पटकन डोळे पुसले नी स्वत:ला सावरीत शेवंताला म्हणाली " काय म्हणत होती दाई मावशी?" तशी शेवंता म्हणाली " काही नाय ग तुझी तब्येत नाजूक हाय , काळजी घ्या म्हणाली.ही औषध दिली हाईत .दोन दिवस घे मग समंद ठीक होईल म्हणत व्हती. आपली सासू आपल्या शी खोट बोलती हे इंदूला कळून चुकलं होत . काय करावं? ही गोष्ट नवर्याला सांगावी का नाही? कारण सदाचा आपल्या आईवर खूप विश्वास होता. ती गप्प बसली. हात जोडून देवाला म्हणाली " देवा माझ्या पोरीला सांभाळ रे बाबा.   दुसऱ्या दिवशी सदा, इंदू व पिंकी शहरात जायला निघाले. आई - बा ने इंदूची नीट काळजी घे म्हणून सदाला बजावून सांगितले. 


   इंदू घरी आली .सदा कामाला निघून गेल्यावर इंदू लगेच माधवी ताईच्या घरी गेली. तिला पाहून माधवीला आनंद झाला. कशी आहेस इंदू ? अस माधवीने विचारताच इंदू जोर जोराने रडू लागली. काय झाले ? अग अशी रडतेस काय? घरी कोणी काही बोलले का? माधवी अनेक प्रश्न विचारत होती पण इंदू फक्त रडतच होती. त्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ जाऊ दिला. पिण्यासाठी पाणी दिले. मग म्हणाल्या " आता शांतपणे काय झाले आहे ते सांग" हे बघ तू सांगितले नाही तर आम्हाला कळणार कसे ? मग इंदू म्हणाली " ताई माझ्या पोटात पोरीचा गर्भ हाय ." माझ्या सासूला या वेळेला नातू पाहिजे. मी काय करू?ते काय माझ्या हातात हाय का? अस म्हणून गावी घडलेली सगळी घटना माधवीला सांगितली. हे ऐकून माधवीला ही काळजी वाटू लागली. काय करावे ? मुलगा , मुलगी होणे हे आपल्या हाती थोडच असत पण अशा अविचारी माणसांना कस समजावणार? असा विचार करत असतानाच तिला तिची मैत्रिण डॉ. निशा ची आठवण झाली. इंदूला धीर देत ती म्हणाली " चल उठ , काळजी करू नकोस. मी आहे ना ? यावर आपण काही तरी मार्ग काढू. इंदू घरी गेल्यावर माधवीने डॉ.निशा ला फोन करून इंदूची व तिच्या परिवाराची सर्व माहिती दिली. काही कर पण इंदूचा गर्भपात होऊ देऊ नको. ती खूप चांगली मुलगी आहे. तिला स्वत:ला पोटची मुलगी मारायची नाही .तेव्हा निशा तू तिला मदत करावी असे मला वाटते. डॉ. निशा म्हणाली " मला थोडा वेळ दे. मी करते काहीतरी , तू फक्त तिच्या सासरच्या लोकांना घेऊन माझ्याकडे ये."असे सांगून निशाने फोन कट केला. माधवीने ताबडतोब इंदूला निरोप दिला. तुझी तब्येत ठीक नाही हे कारण सांगून सासू सासर्यांना इकडे बोलावून घे. ते आले की आपण जाऊ डाॅ. कडे. घाबरू नको. 

ठरल्या प्रमाणे तब्येत ठीक नसल्याचे नाटक इंदूने केले. सदा हाती इंदूने सासूला निरोप धाडला. लवकर या म्हणून सांगितले. सासूला माहितच होते. आपण दिलेल्या औषधाने इंदूचा गर्भ पडला असणार . तसच असल अस समजून शेवंता व गणप्पा ताबडतोब शहरात आले. इंदू झोपूनच राहिली. उद्या डॉ. कड जायच हाय. आपल्या सगळ्याना बोलवल हाय. दुसऱ्या दिवशी सकाळी च माधवी व इंदूचा परिवार सगळे डॉ. निशाकडे गेले. इंदूला घेऊन माधवी निशाच्या केबिन मध्ये गेली. डॉ.निशाने इंदूची तपासणी केली. तपासणी झाल्यानंतर इंदूच्या घरच्या लोकांना आत बोलावले. इंदूची तब्येत ठीक आहे. मी काही औषधे लिहून देते ..... म्हणत ती इतरांचे निरीक्षण करू लागली. शेवंताची चुळबुळ सुरु झाली. ठीक हाय म्हणंजी काय झाल हाय? डाॅक्टरीनबाई इंदूला. काही नाही ती अशक्त आहे म्हणून तिची चांगली काळजी घ्या अस तुम्हाला सांगण्यासाठी मी बोलावले होते. बाकी काही नाही. एक इचारू का ? अस म्हणून शेवंताने मुद्याला हात घातला. बोला, निशा सावध होती. शेवंता म्हणाली " या खेपेला तरी इंदूला पोरगा व्हायला पाहिजे. " पहिली एक पोरगी हाय नी आमाला बी नातू पाहिजे ना? याच संधीची डॉ.निशा वाट पहात होती. ती रागातच बोलली मी मुलगा आहे का मुलगी हे सांगू शकत नाही. असे करणे कायद्याने गुन्हा आहे आणि हो मीहजर तुमच्या विरूध्द पोलीसात तक्रार केली तर तुम्हाला ही याबद्दल शिक्षा होऊ शकते. 


डॉ.बाई अस रागावलेली बघून शेवंता हात जोडत म्हणाली " माफ करा बाई , आम्ही गरीब लोक , दोन दोन पोरीचा खर्च आमाला परवडत नाही. पोरीच लगीन , हुंड्याला पैका कुठून आणायचा? घरची हालत लई बेकार हाय म्हणून इचारल , माफ करा बाई म्हणत हात जोडले. डॉ.निशा थोडी विचारात पडली मग म्हणाली "दोन पोरीचा खर्च परवडत नाही नी मुलगा झाला तर परवडतो का खर्च?" .. तस नाही बाई सदा परत निशाला हात जोडत म्हणाला " माझी आई आडाणी हाय, जुन्या इचाराची .नातू पाहिजे एवढीच तिची इच्छा हाय. माझ्या साठी लई केल हाय. तिची शेवटची इच्छा पुरवायची म्हणून.... सदा चाचरत म्हणाला. तशी निशा म्हणाली तुम्हाला एकच मुलगी हवी ना? तशा सगळ्यानी माना डोलावल्या. मग एक करा, (सदाच्या मांडीवर बसलेल्या पिंकी कडे बोट दाखवत ) " ही मुलगी तुम्ही मला द्या. मी हिचा माझ्या मुली प्रमाणे सांभाळ करेल. इंदूच्या पोटात वाढणारी मुलगी तुम्ही सांभाळा " म्हणजे एकाच मुलीचा खर्च तुम्हाला करावा लागेल. एवढ्यात शेवंताने पटकन पिंकीला जवळ ओढून घेत म्हणाली " हे काय बोलताय बाई ? आमची पोटची पोर तुम्हाला कशी देणार ? " का नाही देणार? , तुम्हाला एकच नात हवी ना ? " , जी मुलगी अजून जन्माला आली सुध्दा नाही तिला मारायला तुम्ही तयार आहात. का ती तुमच्या पोटची नाही का? निशाच्या रागाचा पारा चढला होता. बोला सदा , कमीत कमी तुम्ही तरी इंदूचा विचार करायला पाहिजे होता. आज चार महिन्यांपासून तिच्या पोटात मूल वाढत आहे नी तुम्ही त्याला संपवण्याचा विचार करत आहात? सदा व शेवंताला आपली चुक लक्षात आली. तशी शेवंता ,सदा हात जोडून म्हणाले " माफ करा बाई , खर हाय तुमच पण आमा अडाण्याला नाही समजायच. वंशाला दिवा पाहिजे अस सारा गाव म्हणायचा. मग आमाला बी तसच वाटायला लागलं. न बघितलेल्या जीवाच काही बी वाटत नव्हत पण तुमी आमाला चांगला धडा शिकवीला. आमचे डोळे उघडले. " आता इथून पुढ पोरग नग नी पोरगी नग. या दोन पोरीस्नी शिकवून शान बनविल." एक डाव माफ करा बाई, पाया पडतो अस म्हणत खरच शेवंता निशाच्या पायावर झुकणार इतक्यात ती मागे सरकली. अस पाया नका पडू , तुमची चुक लक्षात आली ना? हे चांगले झाले. आता घरी जा नी इंदूची चांगली काळजी घ्या आणि हो. इंदूला माफ करा . तुमचे व दाईचे बोलणे तिने गुपचूप ऐकले होते म्हणूनच तुम्ही दिलेली औषध तिने घेतले नव्हते. ती तुमच्या खोट बोलली पण चांगल्या कारणासाठी. तेव्हा तिला माफ करा.


  शेवंताने इंदूच्या पाठीवर प्रेमान हात फिरवत म्हणाली " इंदू मला माफ कर. चुकल माझ . तुझ्या हुशारी न आज माझी नात सुखरूप हाय. बर बाई ,येतो , आणि लई उपकार झाल तुमचे बाई अस पाप करण्यापासून वाचवल आमला. डॉ. निशाने माधवी कडे पाहिले. ती मनोमनी आनंदली होती. माधवी कृतार्थता डोळ्यातून व्यक्त करत निशाचा विचार करत होती. किती हुशारीने निशाने संपूर्ण कुटुंबाचे मत परिवर्तन केले होते ते ही अशा अडाणी कुटुंबाचे.तिला आपल्या मैत्रीणीचे खूप कौतुक वाटले.सर्वजण जायला निघाले. इंदूने ही डॉ.निशाचे आभार मानले.

डॉ.निशाला खात्री पटली होती , या परिवाराचे पूर्ण पणे मत परिवर्तन झाले आहे. तेव्हा ती सर्वांना म्हणाली " अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली आहे." बर का आजीबाई तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला नात नाही तर नातू होणार आहे." मी मुद्दाम ही गोष्ट अगोदर सांगितली नव्हती. सदाने आईकड नी आईनी सदाकड बघितलं पण त्याच्या विचारामध्ये काहीच बदल झाला नाही. ठीक हाय बाई , जे काय हुईल ते आमचच राहिल. आता त्यात बदल होणार नाही.येतो आम्ही अस म्हणत इंदूच्या हाताला धरून शेवंता व तिचा परिवार तेथून निघून गेला.

     खरच आज एका कुटुंबाचे मत परिवर्तन केल्याचे समाधान डाॅ.निशा अनुभवत होती...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy