मंदिरे आता उघडायला हवीत का?
मंदिरे आता उघडायला हवीत का?
जवळपास दीड वर्ष होत आली आहे.सर्व मंदिरे बंद होऊन.तर ती उघडायला हवीत का? तर मी होय म्हणेल पण माझे का मंदिरे उघडावी याचे कारण मात्र वेगळे आहे.बहुतेकांना मंदिरात दर्शन मिळाले पाहिजे असू वाटते.भक्ती ही खरी असेल तर घरातही तुम्हाला देव भेटेल. मग मंदिरात जाऊन गर्दी कशाला वाढवता? *मनी नाही भाव नी देवा मला पाव* अशी बऱ्याच लोकांची भावना असते. देव आपण म्हणतो माणसां माणसात आहे मग असे असतांना मंदिरात रांगा लावून दर्शन घेण्याचा अट्टाहास कशाला? असो.
व्यक्ती तितक्या प्रकृती...
मला मात्र मंदिर उघडावी वाटता याचे कारण म्हणजे मंदिराच्या आसपास व मंदिरावर उपजिवीका करणारे छोटे व्यावसायिक याचे मंदिर बंद असल्याने फार हाल होत आहेत. जगण्यासाठी लागणारे साहित्य आणायला त्यांना पैसा मिळत नाही. या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. मंदिर उघडली तर तो प्रश्न सहज सुटेल यासाठी मंदिर उघडायला हवी पण कोरोनाचे सर्व नियम पाळूनच मंदिर उघडायला परवानगी द्यावी.
