STORYMIRROR

Pratibha Vibhute

Inspirational

2  

Pratibha Vibhute

Inspirational

आईला पत्र

आईला पत्र

2 mins
216

तीर्थरूप आईस,

शि.साष्टांग नमस्कार .

वि.वि.बरेच दिवसानंतर आज तुला पत्र लिहीत आहे.हल्ली फोनवर बोलण्याची सोय असल्याने पत्र लिहीणे बंदच झाले आहे. आज रचियता समूह नी मातृदिन असल्याने मनातील भावना या पत्राद्वारे तुझ्यापर्यंत पोहचवत आहे.


आई दोन महिने होत आले. तू कठीण आजाराला तोंड देत आहेस.... खरच खूप हिंमत आहे गं तुझ्यामध्ये! या संकटात आम्ही घाबरून गेलो आहोत पण तू एकटी धैर्याने या आजाराचा सामना करत आहे....आज तुझे वय बघता तू कसे सहन करते हा प्रश्न आम्हाला सदैव भेडसावत आहे....ज्यावेळी तुला खरोखर आमची गरज आहे त्यावेळी आम्ही तुला मदत करू शकत नाही ना तुझी घरी येण्याची इच्छा पुरी करू शकत.... काय म्हणावे या दुर्देवाला!! 

खरच खूप वाईट वेळ सर्वांवर आली आहे.आज तुला आॅनलाईन बघून तर खूप रडायला आले गं पण तुला वाईट वाटू नये म्हणून खोटे चेहऱ्यावर हसू आणू बोलत होते....काळीज मात्र पार पोखरून गेले आहे.... क्षणोक्षणी फक्त स्वामींना एकच मागणे मागते आहे. आईला या संकटातून सावरायला बळ.... बाकी दुसरे काही नको पण हसत खेळत सर्वांसोबत तिने अखेर श्वास घ्यावा हीच मनोमनी इच्छा आहे....हीच प्रार्थना मी श्री स्वामी समर्थांकडे रोज करत आहे...


याला कारण बाबा गेले त्यावेळेस मला त्यांचे अंत्यदर्शन देखील घेता आले नाही.ही खंत मला अजून ही स्वस्थ बसू देत नाही.बाबा गेल्यावर तूच आईनी तूच बाबा होऊन दोन्ही कार्य पार पाडले....आम्हा मुलांना तुझा किती आधार होता हे आता कळतय.पूर्वी कोणाचा फोन आला तर खूप आनंद व्हायचा... आज मात्र फोन वाजला की काळजात धडकी भरते... रात्र रात्र झोप लागत नाही... लागली तर जाग येता क्षणी आठवण झाली की डोळे भरून येतात.... प्रत्येक वेळी अपराधीपणाची भावना मनात येते... बाहेरच्या परिस्थिती मुळे तुला भेटायला येणे शक्य नाही... फक्त मनाची तडफड चालू आहे... दिवसभर कुठे तरी लक्ष लावण्याचा प्रयत्न करते.... चेहऱ्यावर हसू असले तरी हृदयाला किती वेदना होतात हे फक्त मीच समजू शकते... पिकले पान गळून पडणार हा जरी सृष्टीचा नियम असला तरी ही ती वेळ नाही.खूप सहन केलस. आता लवकर बरी हो. आम्ही सगळे तुझी आतुरतेने वाट पहात आहोत.

लहान मुलगी,जावई डाॅ. असल्याचा तुला खूप अभिमान होता.आज ते दोघे तुझी पुरेपूर काळजी घेत आहेत.तू खूप नशिबवान आहेस आई.आज मुली सारखी तुझी सून सेवा करत आहे म्हणून आम्हाला या बाबतीत काळजी नाही.आई ये लवकर घरी... सर्वजण तुझी वाट पहात आहोत...

तुझा तोच हसरा चेहरा पुन्हा एकदा बघायचा आहे....

स्वामी माझ्या आईला हे सर्व सहन करण्याचे बळ द्यावे आपण जगाचे माऊली आहात... कर जोडूनी एवढेच मागणे मागते... लेकीच्या पदरात आई नावाचे अनमोल दान द्यावे....


आज मातृदिनाच्या दिनी माझ्या डोळ्यातील आसवांची धार थांबत नाही...

मी येथेच लेखन थांबवते.

काळजी घे.....


तुझीच लेक.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational