Pratibha Vibhute

Others

2  

Pratibha Vibhute

Others

विनोद (अनुभव)

विनोद (अनुभव)

1 min
126


आमच्या घरच्या व्यवसायात मिस्टरांना मदत करत असे. मिस्टर सकाळी लवकर ऑफिसला जायचे .मी घरचे सर्व कामे आवरून मग जेवणाचा डबा घेऊन नंतर जात असे.


एके दिवशी नेहमी प्रमाणे मी घरचे सर्व आवरले नी पटकन गरम भाजी डब्यात घातली. पटकन पोळ्या घेतल्या नी निघाले.सिटर रिक्षा कधीहयेते ते वाट पाहत असतांनाच एक रिक्षा येऊन माझ्या जवळ थांबली. आत एक महिला नी पुरूष बसलेले होते.मी रिक्षात बसले. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले शेजारी बसलेली बाई सारखी माझ्याकडे निरखून पहात होती. नकळत माझे लक्ष तिच्याकडे जात होते. शेवटी ती न राहून बोलली ताई तुमचे अंग किती गरम लागते. तुम्हाला ताप आला आहे का? तिच्या मी या प्रश्नावर सहज बोलले! नाही माझे अंग असेच गरम असते.तरी त्या माऊलीचे माझ्याकडे बघणे चालूच होते. शेवटी माझा स्टाॅप आला, मी रिक्षाचे पैसे दिले नी खाली उतरले. खाली उतरतांना मला गरम भाजीच्या डब्याचा चटका बसला. जी भाजी मी घाईघाईने गरम असतांना डब्यात भरली होती. मला करंट लागला. अरे रिक्षात शेजारी बसलेल्या बाईला बहुतेक याच डब्याचा चटका बसला होता म्हणून ती अजब नजरेने माझ्याकडे पहात होती. हे समजल्यावर मला हसू आवरत नव्हते. मी एकटी रस्त्यावर हसत चालले होते तेव्हा इतर माझ्याकडे पाहून हसत होते. कशी फजिती होते कधी कधी.


Rate this content
Log in