घुसमट
घुसमट


"अवंती" वय साधारण 35 असावं पण तीशीच्या आसपास दिसणारे. गौर वर्ण, रेखिव नाक डोळे, नऊ वर्षाच्या इशान ची आई पण सडसडीत बांधा . लांब सडक केस राहणीमानही नीटनेटकेपणाचे. पाहता क्षणी कोणालाही आवडणारी. इंप्रेसिव्ह पर्सनॅलिटी म्हणतात ना तशीच. लग्ना आधिची अवंती लिमये. आई वडीलांची एकुलती एक . माहेरची परिस्थिती अगदी बेताचीच होती.
आई गृहीणीच होती. वडील एका दुकानात सेल्समन चे काम करत होते, शिवाय त्यांना अस्थमाचा त्रास . अशा सगळ्या वातावरणात स्वतःचे शिक्षण पुर्ण केलेली. दहावी पास झाल्यावरच एका क्लिनीक मधे रिसेप्शनिस्ट चे काम करून पुढचे शिक्षण तीने पुर्ण केले आणि आवंतीला जरा बऱ्या पगाराची नोकरी मिळाली!
चाळीत राहणारी लिमये फॅमिली आता भाड्याच्या फ्लॅट मधे राहायला आली. बिल्डिंगमध्ये शेजारी राहणार्या शंतनुला पहताक्षणी ती आवडली. शंतनु राजाध्यक्ष शिक्षण फार तर बारावी पर्यंतचे असावे. दिसण्यातही फार इंप्रेसिव्ह वैगरे म्हणता येईल असा नाही. घरबसल्या आॅनलाईन नेटवर्किंग करयचा. वडील कंपनीतून मोठ्या पोस्ट वरून नुकतेच रिटायर्ड झाले होते. आई शाळेत शिक्षिका होती. लिमयेंपेक्षा परिस्थिती फारच बरी. शंतनुच्या आई वडीलांना देखिल ती आवडली. दिसायला सुरेख शिवाय कर्तबगार सगळ्याच दृष्टीने सुमार असलेल्या त्यांच्या मुलासाठी तिला मागणी घातली. मुलगी सधन घरात पडतीय शिवाय शेजारीच म्हणून आई वडील पटकन हो म्हणून गेले. तीलाही होकार द्यायला भाग पाडले आणि ही आता अवंती राजाध्यक्ष झाली आणि त्यानंतर वर्ष भरात इशानची आई देखिल. एकी कडे मास्टर्स करत होती. ते पूर्ण झाल्यावर चांगल्या काॅरपोरेट कंपनीत नोकरीही मिळाली. प्रमोशन्स मिळत गेले .आता पगारही गलेलठ्ठ मिळत होता. तसं म्हंटलं तर शंतनु च्या गळाला चांगलाच मासा लागला होता.
रोजची हीची ओढाताण, घरातले स्वयंपाकपाणी इशान ची शाळा, ऑफिसची गडबड, सणवार कुठल्याच गोष्टीत याची मदत नसायची. सगळं काही एकटीच पार पाडायची. दोघांमधे वैचारीक देवाणघेवाणही फारशी होत नव्हती. रात्रीपुरतेच नवरा बायकोचे नाते अशी त्याची भूमिका असायची. या सगळ्यामधे तीचे मन कधी त्याच्याशी जोडले गेलेच नाही.
तिने बघितलेले जोडीदाराचे स्वप्न म्हणजे उच्य शिक्षित, तिच्याबरोबर वैचारीक देवाण घेवाण करणारा. शाररीक मानसिक सर्वार्थाने तिच्याशी एकरूप होणारा , नवरा बायको पेक्षा त्याबरोबर मैत्रीचे नाते जास्त असावे असा, एकमेकांबरोबर घालवले क्षण कधी संपूच नयेत असं वाटायला हवं असा. शंतनु यात कुठेही बसत नव्हता. तरीही ही सुन म्हणून पत्नी म्हणून मुलगी म्हणून सगळ्या जवाबदार्या अगदी चोख पार पाडत होती.
अशातच ऑफिस मधे नुकताच जाॅइन झालेल्या विरेन बरोबर हीची छान मैत्री झाली. दिसण्याबरोबर बाकी बाबतीतही तो हिच्या स्वपनातल्या राजकुमारासारखाच होता. पहता क्षणी कोणालाही भुरळ पडेल असे हिचे रूप मग विरेन तरी कसा वाचावा त्यातून. नकळत ती विरेन मधे गुंतत गेली. इंदौर वरून नोकरी साठी पुण्यात आलेला विरेन एकटाच रेंटल फ्लॅट घेऊन रहात होता. खाण्यापिण्याची अबाळच मग हीच त्याच्यासाठी लंच घेऊन येऊ लागली. हळूहळू दोघांचे बाहेरही भेटणे चालू झाले. विरेनलाही तिचा सहवास हवाहवासा वाटायचा. दोघंही प्रेमपाशात कधी अडकले ते त्यांना कळलेच नाही. विरेन च्या फ्लॅटवर ही हिचे येणे जाणे चालू झाले. पण शाररिक जवळीकीसाठी हि तयार नव्हती . समाजाची भिती शिवाय संसार मोडला तर इशानचे काय? आई वडीलांची मान खाली जाऊ द्यायची नव्हती. बर्याचदा वाटायचे डिव्होर्स घ्यावा आणि विरेनबरोबर लग्न करावे. पण मग विरेनच्या बोलण्यातून जाणवले त्याच्या घरून कधिच डिव्होर्सि मुलीबरोबर लग्नाला परवानगी नाही मिळायची. हे ही जाणवले तो इथे असेपर्यंत मन रमवण्यासाठी आपला वापर करतोय. हीने वेळीच स्वतःला सावरले.
पुन्हा तीच घुसमट तेच रटाळ नवरा बायकोचे नाते पण तीचा इशान... त्याच्यात ती आनंद मानून दिवस ढकलत गेली.
विरेनचा अंदाज आल्यापासून ती त्याच्यापासून लांब राहू लागली. त्याला टाळू लागली. विरेनला ते प्रकर्षाने जाणवू लागले. एक दिवस ऑफिस नंतर त्याने तिला काॅफी शाॅप मधे भेटायला बोलावले ही ने ते टाळण्याचा प्रयत्न केला. विरेन ऐकायलाच तयार होईना. शेवटी ही गेली. विरेनने तिला तिच्या वागण्यातील बदला विषयी विचारले. त्याला उत्तर देणे तीने टाळायचा प्रयत्न केला. उशिर होतोय म्हणून ही जायला निघाली. विरेनने पिच्छाच पुरवला. शेवटी तिने सांगून टाकले. आपल्या या नात्याला काहीच अर्थ नाही.
निखळ मैत्रि असेल तर मान्य आहे पण मी मैत्रिच्या पलिकडे गेले आहे. मी तुझ्यात खुप गुंतले आहे. वेळेवरच मी स्वतःला थांबवलेले बरे. मी अशी दुहेरी कसरत नाही करू शकत. माझ्यातल्या आईचा माझा मलाच सन्मान ठेवायला हवा. माझ्या मनाने वाट भरकटली होती. पण मला वेळीच माझा मार्ग सापडला. पुन्हा न भरकटण्यासाठी मी तो आता सोडू शकत नाही. तू देखिल वाट चूकला आहेस. तुझ्या योग्य मार्गाचा शोध घे. आणि ती निघून गेली. काही दिवसांत विरेनने कंपनी चेंज केली. त्याच्या जागी संजना माखिजा नावाची न्यू एमप्लाॅयी जाॅइन झाली. वागण्या बोलण्यातला तिचा बिनधास्त पणा , सगळ्या गोष्टी कॅज्युअली घेण्याचा स्वभाव, तीचे मोठमोठ्यांदा खळखळून हसणे. चील मार यार , भाड मे जा रे अशी तोंडून निघणारी भाषा. टेन्शन को मारो गोली हे अॅटीट्यूड.
तिच्या येण्याने ऑफिसचे वातावरणच बदलून गेले.
संजना साधारण अवंतीच्याच वयाची. मनासारखे आयुष्य जगणारी. नाॅयडा वरून आलेली, अंवंतीला तिचे हे स्वच्छंदी वागणे फार आवडून गेले. दोघींची छान मैत्रिही झाली. दोघी अगदी परस्पर विरोधी स्वभावाच्या. अवंती इतरांच्या मनाचा विचार करून वागणारी तर ही स्वतःला हवे तसेच जगणारी. संजना अवंतीची मैत्री झाली. संजना पुण्यात नविन असल्यामुळे अवंतीला घेऊन शाॅपिंगला भटकायला जाऊ लागली. दोघी एकमेकींकडे आपली मनं मोकळी करत होत्या. संजनाने लग्न केलेले नव्हते. तिला करायचेही नव्हते. कुठल्या बंधनात अडकून राहणे तिला पसंत नव्हते. लग्न करून नसत्या जवाबदार्या ओढून कशाला घ्यायच्या असं तिचं म्हणणं होतं.
संजना एकटीच राहात असल्याने अवंती तिला बऱ्याचदा विकेंडला घरी बोलवायची. तिची बडबड , मोठमोठ्यांदा खिदळणे तिचे आगाऊपणाने सगळीकडे नाक खुपसणे, तिने घातलेले कपडे हे सगळे राजाध्यक्षंच्या घराला मानवणारे नव्हते. अवंतीच्या सासु सासर्यांना ते आवडत नव्हते. शंतनुची भुमिका नेहमी प्रमाणे तटस्थच होती. पण इशान आणि संजना आन्टीची मस्त गट्टी जमली. संजनाला अवंतीच्या घरातल्या लोकांचा ,शंतनुचा एकूण अंदाज येऊ लागला होता.
ती अवंतीला म्हणाली देखिल अरे यार मुझे नही लगता तू इस शादीसे खुश है. अवंती क्यू तूने इस लल्लू से शादी की? दुसरा कोई अच्छा नही मिला क्या तुझे? तुम इतनी क्वाॅलिफाइड हो ,ब्युटीफुल हो . ऐसा क्या है उसमे? कुछ खास कमाता भी नही है और तेरे सास ससुर वो तेरी जरा भी कद्र नही करते. कैसे रेहती है तू इनके साथ? यावर अवंतीने तीला समजावले कशा परिस्थितीत तिचे लग्न झाले, कसा तीचा नाइलाज होता. आणि आम्ही मिडल क्लास सोसायटीत वाढलेल्या मुली कितीही हायली क्वाॅलिफाइड असलो, कितीही कमवत असलो तरी नाते असे सहजासहजी तोडू नाही शकत. त्यावर संजनाचे म्हणणे हेते ऐसे घुटघुट के जीने मे क्या फायदा? तू इशान को लेकर अलग क्यू नही हो जाती? मुझे पता है शादी को इतने साल होकर भी तू शांतनू से प्यार व्यार नही करती. तू तेरे मम्मी डॅडी से बात कर और अलग हो जा . अकेली औरते क्या बेटे को बडा नही कर सकती? अवंतीला संजनाचे म्हणणे पटायचे. पण इशान चा विचार यायचा त्याच्या बाबांबरोबर आजी आजोबांबरोबर त्याला अटॅचमेंट होती. असा स्वार्थी विचार करून ,लग्न मोडून त्याच्यावर अन्याय नाही का होणार? या सगळ्या विचारांत पून्हा तीची घुसमट. त्यावर ती संजनाला म्हणाली, मेरा छोड तूने अभी तक शादी क्यों नही की? ऐसे अकेली कब तब रहोगी? त्यावर संजना ने तीला सांगितले लहान असतानाच तिच्या आई वडीलांचा डिव्होर्स झाला होता, हिचे सारे शिक्षण बोर्डींग स्कूल मधे झाले. पुढे नोकरीच्या निमित्ताने मुंबई , पुणे . बरीच वर्ष एकटीच राहीले. फॅमिली काय असते तीला माहीतच नव्हते. सतत एकटीला मन मानेल तसे जगायची सवय लागली होती. आई वडीलांचे जे झाले तेच परत आपल्याही वाट्याला आले तर म्हणून ही कधी लग्नाला तयार नव्हती. अवंती तीला म्हणत होती. सब रिश्ते ऐसे नही होते. सब टूटते नही है. शादी करके खुशिया भी मिलती है. ढूंढ ले तूझे तेरा सोलमेट कही ना कही मिल जाएगा. पण तीला काही ते पटत नव्हते . अवंतीला त्यावरून हे जाणवले की ही वर वर अशी आनंदी असल्याचे भासवतीय. हिची नात्यांमधे अडकावे का नाही अशी घुसमट झाली आहे.
मग वाटले आपले आई बाबा दोघेही विरूद्ध स्वभावाचे , बाबांचे आजारपण , नोकरी ही धड नव्हती यात आईचीही झाली असेल का घुसमट? पण तीने ती जाणवूही दिली नाही आपल्याला. शंतनु च्या आई बाबांचे ही असेच आईंना फिरण्याची , नाटक बघण्याची कित्ती आवड!! पण बाबा मात्र सतत कामात गर्क असायचे, त्यांना या सगळ्याची आवड तर नव्हतीच त्यात र्ऑफिस मधून दमून आल्यावर त्यांना कुठे जाण्याची फिरण्याची गप्पा मारण्याची देखिल ईच्छाच नसायची आता रिटायर्ड झाल्यावर तब्येतीच्या तक्रारी. आईंची ही घुसमट झालीच असणारच की. बंडखोरी करून त्यातून सुटका करणे सगळ्यांना जमणे अवघड असते. सगळं मनासारखं जुळून येणं तर अवघडच असतं . सिनेमा आणि कादंबऱ्यांमध्ये असतं तसं सुखी समाधानी सहजीवन फार विरळच बघायला मिळत. तडजोड करूनच आपण आपलं आयुष्य सुखी करू शकतो. शांतनूला गोड बोलून आपणच काहीतरी उद्योग , नोकरी करायला भाग पडावं!! सगळं काही ठीक होईल, नाही झालं तर मी जिद्दीने ते ठीक करेन!!
मनासारखा जोडीदार नाही मिळाला म्हणून एक्स्ट्रा मरायटल अफेअर करणे, डिव्होर्स घेऊन एकटे राहणे, यात मुल झाले असेल तर त्याची नाही का घुसमट होणार? तीने ठरवले घुसमटी मधून आपली सुटका होवो ना होवो पण इशान ला घुसमटीमधे अडकू द्यायचे नाही आणि संजनाला तीचा सोलमेट मिळवून द्यायचा एकटेपणाच्या घुसमटीमधून तीची सुटका करून द्यायची.
(आज काल छोट्या छोट्या कारणावरून बरेच कपल्स डिव्होर्स घेतात, एक्स्ट्रा मरायटल अफेअर करतात थोडीशी ही तडजोड करून नाते निभावणे त्यांना जड जाते. त्यात मुलं झालेली असतील तर त्यांची फरफट होते. तुम्हीच विचार करा. )