Aparna P

Drama Tragedy Others

2.5  

Aparna P

Drama Tragedy Others

Different strokes

Different strokes

7 mins
1.0K


      

सिद्धांती आणि अभिराज चे लग्न यथासांग पार पडले आणि आता रिसेप्शन.

मोठ्ठा लाॅन , हाय क्लास इव्हेंट मॅनेजमेंट, जगाच्या नकाशातील अर्ध्या देशांमधले मेन्यू , वेडिंग कपल चे डिझायनर काॅस्च्युमस . सगळा करोडोंचा मामला. का नसणार?पुण्यातील प्रथितयश कार्डीयाॅलाॅजिस्ट डाॅ. मोने यांची लाडकी लेक आणि न आर आय बिझिनेस मन मि.देसाई यांचा धाकटा हॅन्डसम मुलगा यांचा विवाह सोहळा होता तो. सगळे मस्त एन्जाॅय करत होते.

अभिराज हा देसाईंचा धाकटा सुपुत्र तर आर्यन थोरला. अभिराजने नुकतेच एम बी ए केले आणि वडीलांच्या कंपनी चा भार उचलला. आर्यन थोडा वेगळा होता त्याला पेंटिंगची ,लिखाणाची ,फोटोग्राफीची आवड होती.तसे त्याने इंजिनिअरींग कंप्लिट केले होते वडलांच्या इच्छेखातर.

अरविंद देसाई आणि रमा देसाई यांचे हे दोघे चिरंजिव.

अरविंदराव बरेच वर्ष यू स मधे एक कंसट्रक्शन फर्म चालवत होते. तर रमा ताई इंडियन रेस्टाॅरंट चालवत होत्या. बघता बघता दोघांच्याही बिझिनेसचा पसारा वाढत गेला. अरविंदरावांनी मेडिकल इक्विपमेंटस , फार्मसी यातही इनव्हेस्टमेंट केली. रमा ताईंच्या रेस्टाॅरंट चेन्स वाढत गेल्या. जाॅर्जिया टेक मधे शिकत असताना सिद्धांति आणि अभिराज ची ओळख झाली. रमा ताईंच्या अभिआर्य इंडियन कॅफे ची सिद्धांति फॅनच होती. परदेशात राहून असे रूचकर मराठी पदार्थ चाखायला मिळणे म्हणजे पर्वणीच होती सिद्धांतीसाठी अभि सिद्धि ची मैत्रि वाढत गेली , मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.दोघांचेही मास्टर्स झाले आणि आता लग्न ही.

तर मग आता आर्यन चे काय? त्याने लग्न का नाही केले? आलेल्या सगळ्या गेस्टस् च्या मनात हाच प्रश्न घुटमळत होता.

  गोरापान, राजबिंडा, प्रचंड बडबडा, म्युझिक, डान्स ,खाण्याची आवड असलेला तसेच वेगवेगळ्या रेसिपीज हौसेने बनवणारा आर्यन वेगवेगळ्या कला सुद्धा जपणारा होता. ऊत्साह ,चैतन्य त्याच्यामधे अखंड सळसळत होते. बिंगहॅमटन युनिवर्सीटी न्यु याॅर्क मधे शिकत असताना सगळ्या इव्हेन्टस ,अॅक्टीविटीज मधे टाॅपर होता.

त्याला आधिपासुन ओळखत असलेल्यांना आज या लग्न सोहळ्यात त्याला बघुन हाच आर्यन आहे हा विश्वासच बसत नव्हता. तो कोणाशी फारसे बोलताना दिसत नव्हता. कोणामधे मिसळत नव्हता. अगदी एकटा ,अलिप्त कोपरा पकडून उभा होता. अधुन मधुन रमा ताई त्याला बोलवून कोणाकोणाची ओळख करून देत होत्या. मीत हास्य करून पुन्हा हा आपला कोपरा पकडत होता. लग्न रिसेप्शन सगळे पार पडले. अरविंद राव ,रमा ताई आर्यन यू स ला परतण्याच्या तयारीला लागले . अभि आणि सिद्धी नंतर येणार होते.

सकाळ पासून डाॅ. मोनेंना अभिनंदन, कौतुक या निमित्ताने फोन येत होते. त्याच बरोबर आर्यनसाठी स्थळे ही सूचवत होते. डाॅ. मोने बघतो ,विचारतो ,बोलतो अरविंद रावांशी अशी उत्तरे देऊन वेळ निभावत होते.

शेवटी डाॅ. मोनेंनी अरविंद रावांशी बोलायचे ठरवले.

आता आर्यन च्या लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे.त्या सगळ्यातून आता तो बाहेर आलाय.

अरविंदराव विचारात पडले , म्हणाले कोण मुलगी त्याचा पास्ट ऐकुन त्याच्याशी लग्न करायला तयार होईल? मला कोणाची फसवणूकही करायची नाही.

हे संभाषण ऐकुन रमा ताईंचे मन चार वर्ष मागे हरवले.

बिंगहॅमटन युनिवर्सिटी मधे शिकत असताना ज्युनिअर

सिनिअर ग्रुप प्रोजेक्टसची लगबग चालु होती. आर्यन सिनिअर्स चा प्रोजेक्ट लिडर होता तर नभा ज्युनिअर्सची . धांदरट , सतत बडबडी ,कुरळ्या केसांची, पिंगट डोळ्यांची ,रंगाने गोरिपान हनुवटीवर परमनंट खळी असलेली अशी नभा . डोक्यात प्रोजेक्ट च्या भन्नाट आईडिया . त्यामुळे अमेरिकन गोरी मुलं ,सगळे प्रोफेसर्स देखिल तिच्यावर इंप्रेस्ड होते. एकत्र प्रोजेक्ट करत असताना आर्यन आणि तीची ओळख झाली.

नभा चिटणीस मुळची मुंबई ची . तिला देखिल पेंटिग ची ,भटकण्याची ,खाण्याची प्रचंड आवड. सतत बडबड आणि हसणे . मग काय आर्यन चे आणि तिचे सूर जुळायला वेळ लागला नाही. दोघांची चटकन गट्टी जमली . थोड्याच दिवसात एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. सतत एकत्र ,एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते. पार्टीज ,मुव्हीज, नाईट क्लब्ज नवनवीन ठिकाणी भटकंति ,खादाडी चालूच होती.

आर्यनचे ग्रॅज्युएशन झाले. त्याचेच सेलिब्रेशन म्हणून दोघे liberty island ला गेले होते . गप्पांमधे रमले होते. तेवढ्यात एक माथेफिरू अवतरला आणि फायरिंग चालू केले. सगळ्यांची धावपळ चालु झाली.

आर्यन नभा पण घाईने पळू लागले.तिथेच नियतीने घात केला ,नभाला गोळी लागली, ती खाली कोसळली आणि तिथेच तिने प्राण सोडला. आर्यनच्या हाताला गोळी घासून गेली ,तो थोडक्यात बचावला पण बेशुद्ध होऊन खाली कोसळला . पोलिस त्या माथेफिरूला घेऊन गेले. अॅम्बुलन्स आल्या डेड बाॅडीज ऊचलल्या जात होत्या. आर्यन ला हाता ला जखम झालीच होती. तो ही हाॅस्पिटल मधे दाखल झाला. इकडे नभाचे आई वडिल आले सगळ्या प्रोसिजर्स पुर्ण करून थोड्याच दिवसात मुंबई ला परतले. थांबून करणार तरी काय होते?

आर्यन ला डिसचार्ज मिळून तो ही घरी परतला.

आर्यन घरी आला खरा . तीन महिने होऊन पण तो अजून सावरलेला नव्हता . सावरणार तरी कसा? ऊत्साहाचा ,चैतन्याचा तो झरा पा...र आटून गेला होता. आर्यन नैराश्याच्या गर्तेत बुडाला आणि हळुहळु ड्रग्ज च्या विळख्यात सापडला. रमा ताई पण फार खचून गेल्या. जाॅर्जिया टेक मधून अभिराज अधून मधून येऊन सगळ्यांना धीर देत होता .अभिराज आणि अरविंद रावांनी यातून मार्ग काढायचे ठरवले,दोघांच्याही महत् प्रयासाने आर्यनला रिहॅब मधे दाखल केले. वर्ष भरात आर्यन मधे बरिच सुधारणा झाली. थोड्याच दिवसात अभिराज मास्टर्स करून घरी परतला आणि बिझीनेस मधे लक्ष देऊन अरविंद रावांचा भार थोडा हलका केला.आर्यन ला ही घरी आणण्याची परवानगी मिळाली पण पुढचे काही महिने काऊन्सेलिंग सेशन्स चालू ठेवायला सांगितले.

देसाई कुटुंब हळुहळु सावरायला लागले.     आर्यन एकलकोंडा झाला होता . जास्त कोणामधे मिसळत नव्हता.  

  काही दिवसात डाॅ. मोने नी फोन करून सिद्धांती आणि अभिराज च्या लग्ना बद्दल विचारणा केली.

लग्न ठरले ,त्यासाठी देसाई कुटुंब पुण्यात दाखल झाले.

सगळे काही छान पार पडले. आता परतीची तयारी चालली होती. डाॅ. मोने नी आर्यन च्या लग्नाचा विषय काढला खरा पण पुढे पाऊल उचलण्याची कोणाची हिंमत होईना. आर्यन शी या विषयावर बोलण्याची तर नाहीच नाही.अभिराज ला एक कल्पना सुचली त्याने आर्यनला थोडे दिवस इंडिया मधे थांबवायचे ठरवले.

वेगळ्या वातावरणात राहिल्याने आर्यन मधे अजुन बदल घडेल असे त्याला वाटत होते. अरविंद रावांना ही हे पटले. रमा ताई अन ते यू स ला रवाना झाले.

      अभि आणि सिद्धी त्याला वेगवेगळ्या पेंटिंग एक्सिबिशनला म्युसिक काॅन्सर्टसला घेऊन जात होते.

कधी सिद्धांती च्या फ्रेंडस् बरोबर पार्टीज ला जात होते. पण आर्यन कोणामधे मिसळत नव्हता. अरविंद राव ,रमा ताई फोनवर अपडेटस् घेत होते.

डाॅ. मोने नी त्याला पेंटिंग मटेरियल गिफ्ट केले. पण त्याने ते सोडलेच होते.

एक दिवस डाॅ . मोने त्याला प्रभात रोड वरच्या आर्ट गॅलरी मधे घेऊन गेले. तिथे एक एक्सिबिशन होते.

काही वेगळीच पेंटींग्ज होती. एक जण गेस्टस् ला ते पेंटिंग्ज एक्सप्लेन करत होती. तीच्या आवाजात इतके माधुर्य होते की आलेला प्रत्येक जण मंत्रमुग्ध होऊन तीला ऐकत होता. आर्यन देखिल त्या पेंटिंगज मधे काही काळ हरवून गेला. पेंटिगज मधून मूक बधिर ,मानसिक विकलांग ,काही वृद्ध ,लास्ट स्टेज कॅन्सर ग्रस्त रूग्ण यांच्या मनातील विचार व्यक्त केले होते. ती आर्यना ला ही काहितरी एक्सप्लेन करत होती आणि आर्यन चक्क तीच्याशी बराच वेळ बोलत

होता.पेंटिंगज बघून आर्यनला त्याचे दुःख किरकोळ वाटू लागले. डाॅ. मोने नी ही चर्चेत सहभाग घेतला. बोलता बोलता तीची माहिती काढून घेतली.आणि तीचा काॅन्टॅक्ट नंबर देखिल.

  ओवी महाजन एम एस सी सायकाॅलॅजी झालेली. मन करा रे प्रसन्न नावाचे कर्वे रोड वर ती काऊंसेलिंग क्लिनिक चालवते.

रूबी हाॅल ,इनलॅक्स बुधरानी हाॅस्पिटल मधे काऊन्सेलर म्हणून काम करते. तसेच सिप्ला फाऊंडेश हाॅस्पिटल, कामायनी , जीवन ज्योत , सुह्रुद मंडळ अशा विकलांग मुलांच्या शाळेत, अनेक वृद्धाश्रमांमधे अधून मधून भेट देते. रंगाने गहु वर्णी, काळे भोर बोलके डोळे, अगदी साधी, सतत जीन्स कुर्ती असाच पोषाख. उत्तम संभाषण कला , बोलण्यात इतका गोडवा की लोकांच्या मनात घर करून बसणार.

डाॅ. मोनेंनी काॅल करून तीला आर्यन ची केस ऐकवली,घरी येऊन भेटण्याची विनंती केली.

ओवी वेळ काढून रविवारी भेटायला आली.आर्यन शी

बराच वेळ बोलली. वारंवार अशाच भेटी चालू राहिल्या, आर्यन तिच्याजवळ मोकळेपणाने गप्पा मारत होता . ओवी बरोबर अनाथ आश्रमात , हाॅस्पिटल्स मधे जाऊ लागला,लोकांशी संवाद साधू लागला.हळुहळु आता आधीचा आर्यन परत येतोय. ओवी बरोबर छान गट्टी जमलीय.दोघे मिळुन काऊन्सेलिंग करतायत.

आता देसाई कुटुंब सावरलय. अरविंद राव आर्यन साठी ओवीला मागणी घालणार आहेत. पण दोघांना अजुन थोडा वेळ द्यावा असे डाॅ. मोनेंचे म्हणणे आहे.

लवकरच दोघं विवाह बंधनात अडकतील अशी खात्री आहे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama