Aparna P

Tragedy

4.8  

Aparna P

Tragedy

तो क्षण प्रेमाचा

तो क्षण प्रेमाचा

10 mins
1.1K



समिर आणि मिनल चे अरेंज मॅरेज झाले होते. समिर मॅकॅनिकल इंजिनिअर होता तर मिनल ने कंप्युटर सायन्स घेऊन ग्रॅज्युएशन केलेले होते. . समिर एका कंपनी मधे चांगल्या पोस्ट वर जाॅब करत होता. मिनल आय टी कंपनीत जाॅब करत होती.. मिनल रंगाने गोरी पान , मोठे बोलके काळे भोर डोळे. दिसायला खुपच सुंदर ..

आई वडिलांचा एकुलता एक ,स्वतःचे मोठे घर असलेला. तीच्यासारखाच उंचपुरा.रंगाने तसा सावळा . दिसायला  यथा तथाच पण अत्यंत हुशार कर्तृत्ववान . सुरूवातीला परिस्थिती बेताचीच होती. पण समिर लहानपणापासूनच हुशार, स्काॅलरशिप मिळवत गेला. शिकला इंजिनिअर झाला. कॅम्पस इंटरव्हू मधेच नामवंत कंपनीची ऑफर आली.पॅकेजही चांगले . दोन वर्षात परिस्थिती पालटून गेली. स्वतःचे घर ,गाडी घरात सगळ्या सुखसोयी आल्या त्यानंतर आई वडिलांना त्याच्या लग्नाचे वेध लागले.

इकडे मिनल साठी ही स्थळे शोधणे चालूच होते. मिनलचे आई वडिल दोघे ही काॅलेज मधे प्राफेसर . मिनल तशी सधन कुटुंबात वाढलेली मुलगी. आईच्या मैत्रिणीने मिनल साठी समिर चे स्थळ सुचवले. एकंदरीत छानच होते. फक्त दिसण्याच्या बाबतीत मुलाची बाजू कमकुवत होती. स्वभावाने देखिल प्रेमळ , समंजस होता. मध्यस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिनलच्या आई वडिलांना हे स्थळ पटले. लेकीला ही समजावले सगळं छान आहे आणि दिसण्याचं म्हणशिल तर मुलाचं कर्तृत्व बघावं . संसार करायला चांगली नोकरी ,मुलाचे शिक्षण चांगला स्वभाव, एकमेकांना समजून घेणे महत्वाचे .दिसणे ही गोष्ट दुय्यम असते. ती देखिल आई वडिलांच्या शब्दा बाहेर नव्हती. बघण्याचा कार्यक्रम झाला. पसंती झाली लग्न झाले. लग्ना नंतर चे सत्यनारायण, गोंधळ , कुलदेवतेचे दर्शन सगळे पार पडले .राजा राणीच्या संसारात आपली अडगळ कशाला म्हणून समिर चे आई वडील गावी निघून गेले. नव दाम्पत्य सिमला कुलु मनाली ला हनिमुनला जाऊन आले. दोघांचे नेहमीचे रूटिन चालू झाले. साधारण महिना झाला असेल समिर ला तीन महिन्यांसाठी कंपनीच्या कामा निमित्ताने टोकीयो ला जावे लागले. मिनलचेही रोजचे ऑफिसचे रूटीन चालू होतेच. लग्नानंतर तीचे रूप जास्तच खुलले होते.

समिर घरी नसल्याने वीकेंड ला ती मैत्रिणींना भेटायला गेली. श्वेता, रश्मि , अदिती या तीच्या खास मैत्रिणी

तीघीही तीच्या शाळेपासून बरोबर होत्या. पण आता सगळ्याच आपापल्या जाॅब मधे बीझी झाल्या होत्या. मिनल मैत्रिणींना लग्नानंतर आज बर् याच दिवसांनी भेटत होती. छान तयार होऊन ती त्यांच्या नेहमीच्या काॅफी शाॅप मधे ठरलेल्या वेळेत पोहोचली. मिनलच्या लग्नानंतर सगळ्याच खुप दिवसांनी एकमेकींना भेटणार म्हणून उत्साहात होत्या . खुप गप्पा हसणं खिदळणं चालू होतं. मिनलने तीच्या हनिमुनचे फोटो देखिल दाखवले मैत्रिणींना. बोलताना नेहमीच तारतम्य न बाळगणारी सडेतोड बोलणारी रश्मि तिला म्हणाली अगं समिर खुप हुशार आहे चांगलं कमवता आहे हे मान्यय पण तो तुला अजिबात शोभत नाही गं . तु एखाद्या माॅडेल सारखी दिसणारी तो तुझ्यापुढे अगदिच काहितरी वाटतो गं.मिनल त्यावर तीला म्हणाली अगं तेवढीच एक बाजू सोडली तर सगळं छान आहे गं मला समजून घेणारी माणसं आहेत लग्नामधे याच गोष्टी महत्वाच्या असतात.

अदिती त्यावर म्हणाली पण रोमान्स करायला हॅन्डसम दिसणारा रूबाबदार पर्सनॅलिटीचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर असतो ना. कळायला लागल्यापासून आपण राजकुमाराचे स्वप्न बघतो ना तसं.त्यावर श्वेता म्हणाली ए सोडा गं आता झालय तीचं लग्न . त्यावर तो विषय तिथेच थांबला.

त्या दिवशी चौघी जणींनी खाणं पिणं धमाल केली आणि परत लवकरच भेटू असं ठरवून आपापल्या घरी परतल्या. कॅब मधून घरी परताना मिनल च्या डोक्यात रश्मिने समिरच्या दिसण्यावर केलेल्या कमेंटचा किडा अस्वस्थ करू लागला. आपण घाई केली का लग्न करताना? आई वडिलांच्या म्हणण्यावर विश्वास ठेऊन लग्न कले खरं पण आपला स्वप्नातला राजकुमार आणि समिर यांच्यात काहीच साम्य नाही. ती समिरचे फोटो परत परत पहात राहिली. आणि तीला तो दिसण्यात खुपच खराब वाटायला लागला. ती स्वतःची आणि त्याची तुलना करू लागली. त्याच विचारात ती घरी पोहोचली ,झोपून गेली. सकाळी उठून आवरून ऑफिसला पोहोचली.

ऑफिसमधे ही तोच विचार तीच्या डोक्यात घोळत होता. उगाच आपण घाईने समिरशी लग्न केले असे देखिल वाटायला लागले.त्या दिवसानंतर समिर चा तीला फोन आला तर ती त्याच्याशी तुटक तुटक बोलत होती. कधी कधी फोन घेणेच टाळायला लागली.

त्याच दरम्यान हॅन्डसम दिसणार् या रूबाबदार पर्सनॅलिटीच्या नविन बाॅस ची ऑफीस मधे एन्ट्री झाली. नविन बाॅस अनय यु के वरून नुकताच इंडियात आला होता. त्याने सगळ्यांशी इंट्रो करून घेतला. ऑफिसमधले सगळेच या हिरो सारख्या अनय ला पाहून आवाक झाले होते तर मिनल शी इंट्रो करून घेताना अनय तीच्या मोठ्या टपोर् या डोळ्यात दोन मिनीटं हरवल्या सारखा झाला पण लगेचच तो सावरला. हळुहळु तो ऑफिसमधे स्थिरावला. पहिल्याच भेटीत मिनल त्याच्या नजरेत भरली होती. त्यानंतर तो तीला बरेच दिवस ऑबझर्व करत होता .

रोज काही ना काही कारणास्तव तो मिनलला केबिन मधे बोलवू लागला . त्याच्या प्रोजेक्ट गृप मधे तीला लीड देऊ केला. ज्या निमित्ताने तो तिच्या सहवासात जास्त काळ राहू लागला.ती नुसतीच दिसायला सुंदर नाही तर कामात ही खुप हुशार आहे एन्थु आहे हे त्याला कळले. मग या ब्युटी वीथ द ब्रेन्स ला आऊट डोर मिटिंगज, प्रोजेक्ट साठी तो बरोबर घेऊन जाऊ लागला. मिनलला ही अनय च्या सहवासात त्याच्या बरोबर काम करताना छान वाटायचे. अनय ला ती समिरच्या जागी पाहू लागली. नकळत अनय मधे गुंतत गेली. ऑफिस नंतर ही अनय बरोबर बाहेर वेळ घालवू लागली. या सगळ्यात समिरच्या नसण्याने त्याला जणू विसरूनच गेली होती. एकंदर ती अनय बरोबर ,तीच्या ऑफिस रूटीन मधे खुष असायची.

तीन महिने निघून गेले आणि समिर टोकीयो वरून परतला.

समिर आल्यापासून ती त्याच्याशी तुटकपणेच वागत होती.

तो आल्याचा मिनलच्या चेहर् यावर आनंद दिसलाच नाही.समिर ने तीला विचारले देखिल काय झालंय? तीने बरं वाटत नाही शिवाय ऑफिस च्या कामाचा लोड आहे असं उत्तर दिलं.

आता ऑफिस संपल्यावर अनय बरोबर वेळ न घालवता लवकर घरी पोहोचावे लागणार या चिंतेत ती होती. विचारांती ऑफिस मधे वर्क लोड वाढलाय नविन प्रोजेक्ट मी सांभाळतीय असं सांगून ती घरी उशिरा यायला लागली.

तब्बेत बरी नाही, ऑफिस च्या कामाने थकून गेलेय अशी कारणे सांगून ती समिर पासून रात्री देखिल दूर राहू लागली. समिर मुळातच समंजस शांत स्वभावाचा त्यानुसार त्याने मिनल वर खरचच प्रोजेक्टची जबाबदारी असल्याने कामाचा ताण असेल ,म्हणून त्याने तीला समजून घेतले. उलट घर कामात तीला होईल ती तो मदत करत होता. तीला आनंद वाटेल असेच वातावरण घरात ठेवत होता. समिर कितीही चांगला वागला तरी अनय बद्दल वाटणारी ओढ ती थोपवू शकत नव्हती.

ऑफिस काॅन्फरन्स च्या निमित्ताने मिनल चे अनय बरोबर बाहेर गावी जाणे नित्याचेच झाले होते. समिर ची कुठली ही अडकाठी बंधनं नसल्याने ती एकंदर मजेत जगत होती.

अनयवर ती सर्वार्थाने प्रेम करत होती. अनय ला ती मॅरिड असल्याचे माहित असून देखिल काही फरक पडत नव्हता.बाहेर गावी गेल्यावर राजरोस पणे दोघं एकच रूम शेअर करत होते. अनय च्या प्रेमात ती आंधळी झाली होती. समिरच्या साध्या स्वभावाचा फायदाच घेत होती जणू.असे गेले वर्ष भर चाललेले होते.

  एक दिवस संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर मिनल तापाने फणफणली होती. आल्या बरोबर सोफ्यावर तीने अंग टाकून दिले समिर तीच्या आधीच घरी पोहोचला होता. तीला असे बघून तो काळजीत पडला, तीचे अंग चांगलेच तापलेले होते. त्याने लगेचच त्यांच्या फॅमिली डाॅक्टरांना फोन करून बोलावले डाॅक्टर येऊन चेक करून गेले औषधे लिहून दिली. समिरने घाईने जाऊन औषधे आणली. तीला दिली. रात्र भर सारखा मधून उठत तीचा ताप चेक करत होता. सकाळी ताप उतरलेला होता. पण खुप अशक्त पणा वाटत होता मिनलला .तीला अंथरूणातून उठवतच नव्हते. म्हणून ती ऑफिसला गेली नाही. तीने अनय ला तसे मेसेज करून कळवले. तीन दिवसांनी ती पुर्ण बरी झाली. कधी एकदा अनयला भेटतीय असं तीला झालं होतं .घाईने आवरून ऑफिसला गेली.

सात आठ दिवसांनंतर तीला परत असाच खुप ताप आला. समिरने परत डाॅक्टरांना बोलावले. त्यांनी चेक करून तीला काही ब्लड टेस्ट करून आणायला सांगितल्या. दुसर् या दिवशी फ्लेबाॅटाॅमिस्ट घरी येऊन मिनल चे ब्लड सॅम्पल घेऊन गेला. रिपोर्टस् येई पर्यंत समिर ची घालमेल चालली होती. संध्याकाळी रिपोर्टस् मिळाले. रिपोर्ट मधिल मेडिकल टर्मिनाॅलाॅजी त्याला फारशी कळली नाही पण काहितरी सिरिअस आहे हे मात्र जाणवले. ते रिपोर्टस् घेऊन तो डाॅक्टरांना दाखवायला गेला. डाॅक्टरांनी ते बघून समिर ला शांतपणे समजावून सांगितले की या रिपोर्टस् वरून असं कळतय की मिनल ला अॅक्युट मायलाॅईड ल्युकेमिया झाला आहे. म्हणजेच ब्लड कॅन्सर . समिर ला ते ऐकून जबरदस्त धक्का बसला. डाॅक्टरांनी त्याला धीर दिला आपण अजून एक सेकंड ओपिनीअन घेऊ असे म्हणाले.

समिर खुप टेन्स झाला होता पण घरी आल्यावर त्याने मिनल ला इतक्यात काही कळायला नको म्हणून चेहर् यावर खोटे भाव आणले. तीला त्याने सांगितले अजून काही ब्लड टेस्ट करून घ्यायला सांगितल्या आहेत त्या उद्या करून घेऊ आणि अजून आठवडाभर तुला आरामच करायला सांगितला आहे. आठवडाभर अनय ला भेटता येणार नाही ती जरा अस्वस्थच झाली. दुसर् या दिवशी सेकंड ओपिनिअन साठी ब्लड टेस्ट केल्या गेल्या. रिपोर्टस् सेमच आले. डायग्नाॅसिस कन्फर्म झाले .

दोन दिवस आराम झाल्यावर मिनलला बरे वाटत होते. ताप ही उतरला होता. सकाळी उठून ती ऑफिसला जायची तयारी करू लागली. समिर ने तीला ऑफिसला जाऊ नकोस तू पुर्णपणे बरी झाली नाहीस असे समजावले पण तीने त्याचे काहीच ऐकले नाही.ती त्याला न जुमानता ऑफिसला गेली. पोहोचल्या बरोबर अनयच्या केबिन मधे जाऊन त्याला घट्ट मिठी मारून भेटली. तुझ्या पासून आता लांब रहाणं मला नाही सहन होत त्याला म्हणाली. लवकर काहितरी निर्णय घ्यायला हवा. ओके मी विचार करतो काय करता येईल अनय तीला म्हणाला.

तीला ऑफिसमधे विकनेस जाणवत होता. परत ताप आल्यासारखे जाणवत होते. अनय मिटींग मधे बीझी होता. त्याला न सांगताच ती कॅब ने घरी आली आणि झोपून गेली. विवेकने घरी आल्यावर तीला झोपलेले बघितले ताप होताच गाडी काढून तो तीला हाॅस्पिटल मधे घेऊन गेला.डाॅक्टरांनी तीला अॅडमिट करून घेतले. तीच्यावर ट्रिटमेंट चालू झाली.रोज ब्लड काऊंट माॅनिटर केले जात होते. केमोथेरपी झाली. आठ दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. समिर ने घरी आल्यावर तीला तीच्या आई वडिलांना बोलावून घेतले. शांतपणे त्याने सगळ्यांना मिनल चे डायग्नाॅसिस काय झाले आहे ते सांगितले. डाॅक्टरांनी सांगितलेच होते आता केमोथेरपी वारंवार लागणार मिनल पासून खरं लपवून चालणार नाही. काय आहे त्या सत्याला तीने ही सामोरे गेलेच पाहिजे.

मिनल ते सगळं ऐकून शाॅक झाली. समिर ने तीला धीर दिला. घाबरायचं कारण नाही रिसेंटली खुप रिसर्च झाले आहेत ब्लड कॅन्सर पुर्ण पणे बरा होतो. मी सगळी माहिती गोळा केली आहे. आपण युस ला जाऊन ट्रिटमेंट घेऊ . केमोथेरपी , अॅन्टीबायोटीकस् या सगळ्याने आठ दिवसांत मिनल चे रंग रूप पार पालटले होते. तीच्या चेहर् या वरचे तेज नाहिसे झाले होते. थोडे बरे वाटतय म्हणून ती ऑफिसला निघाली. समिर ने परत तीला अडवायचा प्रयत्न केला त्यावर तीने उत्तर दिले हातातले प्रोजेक्ट कंप्लिट करायला हवे माझ्या कडेच सगळ्या फाईलस् ,डिटेल्सआहेत ते संपले की रिझाईन करेन. नाईलाजाने समिर ने तीला जाऊ दिले.

ऑफिसमधे पोहोचल्यावर ती अनय ला भेटायला गेली. त्याच्या केबिन मधे लीना तीची कलीग होती. ती एकदम आत आल्याने दोघंही चपापल्या सारखे झालेले मीनलला जाणवले. मी मेसेज करून माझ्या बद्दल कळवून सुद्धा तु मला भेटायला आला नाहिस साधी फोनवर देखिल चौकशी केली नाहिस . म्हणून त्याला विचारत होती. वर्क लोड खुप आहे , डेड लाईन चे टेन्शन आहे असं सांगून त्याने तीची समजूत घातली. खरं काय ते त्याच्या नजरेतून समजले होते. मिनल बद्दल कळल्यावर आता हिचा काही उपयोग नाही. हिला टाळलेलेच बरे असं त्याने ठरवलं होतं आणि आज एकूणच मिनलचा ओढलेला चेहरा डोळ्याखाली जमा झालेली काळी वर्तुळं पाहून अनय चा तिच्यामधला इंटरेस्ट संपलाच होता जणू.तो तिच्याशी तुटक तुटकच वागला .खरं तर आज तीला अनय च्या सोबतीची फार गरज भासत होती. त्याच्या मिठीत शिरून क्षणभर तरी आपल्या आजाराचा विसर पडेल असं तिला वाटत होतं पण तीची निराशाच झाली.ती अनयच्या केबीन मधून रडवेली होऊन बाहेर आली.

अनय चे आपल्यावर प्रेमच नव्हते मी फक्त त्याची त्या त्या क्षणाची गरज होते. तिला कळून चुकले. मी नाही तर माझ्या जागी लिना, माझ्या ऑफिसमधे नसण्याने त्याला काहीही फरक पडला नाही. ती अजूनच खचून गेली. विचार करून करून अंगातली शक्तीच संपल्यासारखे झाले. सगळं ऑफिस आपल्या भोवती गरगर फिरतयं तिला वाटत होतं. ती जागेवरच कोसळली. ऑफिस कलिगज् नी तीच्या चेहर् यावर पाणी शिंपडले.तीने डोळे उघडले.तिला उचलून तीच्या क्युबीकल मधे बसवले. ती पुटपुटली समिर ला फोन…. … तीच्या कलीगने समिरला बोलावून घेतले. समिर ताबडतोब आला. तीची अवस्था पाहून त्याने अॅम्बुलन्स बोलावली. जाता जाता अॅम्बुलन्स मधे तीच्या डोक्यावर हात ठेऊन कसला सा जप करत होता. मिनल ला त्याची घालमेल जाणवत होती. तीला तीचीच चिड येऊ लागली. वरवरच्या दिसण्यावर आपण भुललो. आपल्या जवळ तर खर् या प्रेमाचा जिव्हाळ्याचा खजिना होता.

क्षणिक मोहाला बळी पडले मी ,त्याचीच ही शिक्षा मिळालीय. तीला हाॅस्पिटल मधे अॅडमिट करून घेतले.

समिरचा हात हातात घेऊन ती म्हणाली मी फार कम नशिबी आहे . प्रेम काय हे मला आज कळले पण ते उपभोगायला माझ्याकडे आता वेळ नाही. 

समिरनेही आज तीच्या डोळ्यात ज्या प्रेमाचा तो इतके दिवस शोध घेत होता ते पाहिले. त्या क्षणभर प्रेमात दोघंही सुखावून गेले. समिरचा हात हातात घेऊन मला माफ कर समिर असं बोलून तीने डोळे मिटले ते कायमचेच.

 समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy