STORYMIRROR

komal Dagade.

Drama Others

3  

komal Dagade.

Drama Others

# घरोघरी मातीच्या चुली

# घरोघरी मातीच्या चुली

3 mins
398

घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आपण ऐकून आहोतच. तशीच एक कहाणी संगीता आणि राघव.


राघव हा शांत स्वभावाचा, कधीही दुसऱ्याला न दुखावणारा. संगीता त्याच्या विरोधी रागीट, पण मनाने हळवी. दोघांचा राजा राणीचा संसार चालला होता. राघव शाळेमध्ये शिपाई होता.

संगीता किराणामालाच दुकान सांभाळत होती. त्यामुळे परिस्थिती जेमतेम होती. संगीताला तीन मुले होती. अर्जुन, वैभव आणि साक्षी. दोघेही अभ्यासात हुशार.  साक्षीच लग्न दहावी नंतर लगेच केलं. तिला श्रीमंत घराण्यात दिलं जातं . संगीता भोळी नव्हती, ती खूप हुशार होती. काटकसरीने संसार करत होती. मुलांच्या शिक्षणासाठी तिने कसली कमतरता पडू दिली नाही. साक्षी च लग्न चांगल्या प्रकारे लावून दिले.


तिचा काटकसरीच्या संसारामुळे तिला चांगले दिवस आले होतें . स्वतःच घरही घेतले. पण त्याबरोबर तिच्यात अहंकारही आलेला होता. अर्जुन इंजिनीर झाला तर वैभव पोलीस . दोघांनी स्वबळावर घवघवीत यश मिळवलं होतं. संगीता आणि राघवला मुलांचा अभिमान होता . मुलीचा संसार म्हणजे साक्षीचा संसार तिच्या आळशी पणामुळे तुटलेला होता . तिला कामाचा खूप कंटाळा होता. यामुळे सासू सासऱ्यांनी आणि तिच्या नवऱ्याने तिला माहेरी पाठवलेले होते. अर्जुनला गावाकडील मुलीचं स्थळ चालून आलं . तीच नाव गीता. गीता कामात खूप हुशार, मनमिळाऊ साधी बघताच सर्वाना आवडली. थाटामाटात लग्न होऊन गीता घरी आली.



गीता जशी घरात आली, तशी संगीताचा स्वभाव बदलला. तिचा जाच गीताला चालू झाला . संगीताला संपत्तीचा खूप गर्व झालेला. गीता गावाकडची कामात चोख पण तरीही तिची सारखी चूक काढायची. तिच्या आईवडिलांचा उधार करायची . गीताला याचं खूप वाईट वाटायचं. सगळ्यांच्या पुढे ती करत असते , कामाचा कधी कंटाळा करत नव्हती, तरीही तिला वाटे सासूबाई आपल्याला किती बोलतात... ! त्यात नणंद ही नीट वागत नव्हती . ती पण आईवडिलांचा उधार करत असे. याचे तिला खूप वाईट वाटत. गीता कधी सासूला एकशब्धानें उलट बोलत नव्हती. रोजचे सासूचे अपमान सहन करून गीता रडून झोपत असे . नक्की या घरात आपलं चुकतंय काय...? याचा विचार ती करत बसे .


          एक दिवस साक्षी ने आई ला भर टाकत, " गीता आणि अर्जुन ची भांडणे ही लावून दिली. गीता चा दीर वैभव हे सर्व बघत होता . त्याला मात्र वाहिनीची खूप कळकळ येत होती . तिच्यावर होणारा आईचा आणि बहिणीचा जाच त्याला पाहवत नसे,आणि आईचा राग ही येत. वैभवला त्याची मैत्रीण रिया खूप आवडत होती. तीही पोलीसमध्ये च होती . रिया ही त्याच्यावर प्रेम करत . वैभव तिला सर्व घरातील गोष्टी सांगत असे . एक दिवस वैभव आणि रिया कोणाला न सांगता कोर्ट मॅरेज करून घरी जातात. संगीता दोघांना बघून खूप चिडलेली असते. वैभव ला खूप बोलते. रिया कडे रागाने बघते, पण रिया काहीच प्रतिसाद देत नाही.


संगीता त्यांना आतही घेत नाही. ती तशीच तिच्या रूम कडे निघून जाते. गीता दोघांचं औक्षण करून दोघांना रितीरिवाजाप्रमाणे दोघांना आत घेते. रिया गीता च्या गळ्यात पडते. गीताही तिला प्रेमाने मिठीत घेते. त्या दोघी जावा जावा खूप चांगल्या मैत्रिणी होतात. गीताचा स्वभाव रियाला खूप आवडत असतो. दुसऱ्या दिवशी सासू नंदेची हॉलमध्ये बसून काहीतरी कुजबुज चालली असते. सासू जोरात गीताला हाक देत "चहा झाला का... लवकर आण "हो झाला आले लगेच घेऊन असे," गीता म्हणते. रिया गीताच्या हातातील चहा खाली ठेवते. आजपासून सर्वांनी मिळून काम करायचं. त्यामुळे एकावर कामाचा भार येणार नाही.


संगीता लगेच तिला टोमणा मारते,, "एक दिवस येऊन झालं कि.., झालं का तुझं चालू? तू कोण ग सांगणारी....? हे घर माझं आहे. रिया, "सासूबाई बरोबर आहे तुमचे पण मी या घरची सून आहे. जेवढा अधिकार तुमचा आहे तेवढाच माझा ही आहे या घरावर ....! 


रीया साक्षीलाही बोलते, ताई उद्यापासून तुम्ही ही घरातील कामे करायची. गीता माझ्या रूम मध्ये ये... तुझ्याशी बोलायचं आहे, रिया गीताला बोलते.


गीता तिच्या रूम मध्ये जाते. रिया, "ताई तुम्ही का सहन करता यांना...? किती त्रास देतात तुम्हाला... ! तुमचा गरीब स्वभाव बदला नाहीतर खूप छळतील दोघी तुम्हाला... !


तुम्हाला पुढे काही करायची इच्छा आहे का...?

गीता, "हो मला स्वतःचा केक चा बिझनेस करायचा आहे.

रीया, "मी तुम्हाला नक्की मदत करेल...!


           दुसऱ्या दिवशी साक्षी घर सोडून चालली असते. इथं तर जास्त काम मला करावं लागतं. माझ्या सासूबाई मला खूप मदत करतात. मी नवऱ्याचे जाऊन पाय धरेन. शमा मागेन. साक्षी तिच्या सासरी निघून जाते.


गीताचा बिझनेस वाढलेला असतो. ती आज स्वावलंबी आयुष्य जगत असते.

एक दिवस संगीता आजारी पडते. तेव्हा दोन्ही सुना मुलीप्रमाणे सासू ची काळजी घेतात. तेव्हा संगीताचे डोळे उघडतात. आज सुनांनी मुलीप्रमाणे सासूला आजारपणात जपलेलं असतं.

          संगीता दोघींच्या गळ्यात पडून रडते. मला माफ करा पोरींनो पैशाच्या धुंदीने तुमच्याशी खूप वाईट वागले.

रीयामुळे गीता आज स्वावलंबी आयुष्य जगत असते,आणि त्याबरोबर सासूच्या जाचातुन ही मुक्त झालेली असते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama