"" एलियन""
"" एलियन""
मला रडार यंत्रणा वर अचानक स्क्रीनवर ब्लॅक स्पॉटर् काही I सेकंदात दिसले .. आणि अदृश्य झाले . शंका आली म्हणून मी पुन्हा पुन्हा त्या ब्लॅक स्पॉट चे निरीक्षण करत होतो .त् अर्थबोध होत नव्हता व त्यांना विशिष्ट प्रकारची आकृती दिसत नव्हती . काही प्रकारचा एरर असल्या कारणाने मी दुर्लक्ष केले तसेच पुन्हा दोन दिवसांनी आता ब्लॅक स्प'ट मध्ये परत दिसून आला . तेव्हा मात्र मी पूर्वी दिसणारे इमेज आणि आत्ताचे इमेज चेक केले . असता कोणत्याही प्रकारचा मिळताजुळता प्रकार नव्हता . तेंव्हा मात्र मी शोध घेण्याचा प्रयत्न केला . तेव्हा रडार यंत्रणेमार्फत या प्रकारचे संकेत व माहिती ,सदर मिळालेला डाटा 'मी सर्च विभागाकडे पाठवला .मात्र कोणत्याही प्रकारचा उपयोग झाला नाही .तेव्हा मात्र सॅटॅलाइट मार्फत इमेज शोधण्याचा प्रयत्न केला . तेव्हा पृथ्वीवर काही भागावर लाल प्रकारचे स्पॉट दिसून आले. पण साधारण ते एक-दीड तासाने त्यांची मोमेंट चेंज करत होते .व त्यांच्या आसपास जेव्हा आम्ही यंत्रणा नेवून शोध घेण्याचा प्रयत्न केला. असता कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती . व आमची यंत्रणा ही त्या ठिकाणी अ कार्यक्षम ठरत असे . शंकेची पाल निर्माण झाली . आणि आमचे शोध मोहीम सुरू केली . की परकीय देशांच आक्रमण आणि युद्धजन्य परिस्थिती असल्याकारणाने आपली संरक्षण यंत्र नेचा डाटा चोरण्याच काम किंवा मिळवण्याचा प्रयत्न दिसून येत होता . त्यामुळे मी साऱ्या यंत्रनेला दक्ष राहण्यासाठी सुचना दिल्या व सॅटेलाईट मार्फत मिळणाऱ्या इमेजेस चे निरीक्षण केले. असता असे दिसून आले ज्या ज्या ठिकाणी रडार यंत्रणा व देशाची संरक्षण व्यवस्था ची महत्त्वाची ठिकाणे जेथून देशाच्या संरक्षण यंत्रणा कार्यरत असते अशा ठिकाणापासून व त्याच बाजूच्या परिसरामध्ये रडारवर एरर दिसून येत व ते लाल स्पॉट जे एका ठिकाणी काही मिनिटांमध्ये त्यांची जागा बदललेली दिसत . तेंव्हा मात्र ती सारी यंत्रणा शत्रूराष्ट्रांची किमया किंवा टेहळणी यंत्र म्हणून काही पाठवले असेल ?त्यादृष्टीने तपास करण्यास सुरुवात केली.
जवळच असलेल्या मित्र राष्ट्रांची राजदूताना द्वारे मेसेज पाठवले . तातडीने संरक्षण मंत्रालय ,गृह मंत्रालय ,यानां संदेश पाठवले व काही तासांमध्ये सर्व चक्रे फिरवली गेली . आणि माहिती जमा करण्यास सुरुवात झाली. जेव्हा माहिती पाठवण्यासाठी आम्ही सॅटॅलाइट आणि काही विमानांचा आधार घेऊन महत्वाच्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही बेटांवर , जंगलामध्ये ;ड्रोन च्या सहाय्याने शोध यंत्रणा सुरू केली . मात्र शोधमोहीम सुरू असेल अशा वेळी विशिष्ट प्रकारचे प्रकारचे एरर दाखवले जात. तीथे कोणत्याही प्रकारचे विश्लेषण होत नव्हते . तेव्हा मात्र पूर्ण भारताची संरक्षण यंत्रणा धोक्यात असल्याची चिन्हे दिसत होती . कारण महत्वाची माहिती किंवा डाटा चोरीला गेल्यास त्याचा फायदा शेजारच्या शत्रू राष्ट्रांना होतो . त्यामुळे संरक्षण मंत्रालयामध्ये असणारी माहिती कोडींग द्वारे संदेश देणे किंवा माहिती पाठवली जात ती सारी यंत्रणा हॅक केली जात होती . तेंव्हा मात्र आमची खात्री पटली कि बाहेरून येणारी ही यंत्रणा आजूबाजूच्या देशांच्या सॅटेलाइट मार्फत व शोध यंत्रणेमार्फत शोध घेतला असता काही हाती लागत नव्हते . तेव्हा मात्र हि आलेली यंत्रणा एखाद्या परग्रहावरून आल्याची शक्यता असल्यामुळे च आम्ही एकमेकांचे संकेत व संदेश वाचू शकत नव्हतो . किंवा बघू शकत नव्हतो . त्या कालावधीमध्ये आमची काही सर्च इंजिन असणारी ड्रोन ही बेपत्ता झाली ! काही विमाने निर्जनस्थळी पाडण्यात आले . त्यामध्ये असणारे ब्लॅक बॉक्स देखील नाहीसे झालेले दिसून येत होते. व झालेल्या घटनेच्या कित्येक किलोमीटर पर्यंत .परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा दृश्य अशा कोणत्याही यंत्रणेमार्फत काही घडले असेल .त्याचा पुरावा मिळत नव्हता. मात्र एका निर्जन अशा बेटावर जेव्हा आमचं एक विमान पाडले गेले . त्याठिकाणची आमच्या रोबोट द्वारे चौकशी केली असता तिथे मात्र पाण्याचे ठसे प्रमाणे त्या यंत्रणेद्वारे काही डाटा काढलेला दिसून आला . व एका ड्रोणच्या कॅमेरा मध्ये टिपलेली क्षणाची छायाचित्र आम्हाला मिळवता आली . तेंव्हा मात्र पायाखालची जमीन सरकली !.
ही घटना परग्रहावरून आलेल्या ब्लॅक स्पॉट द्ववारे झालेली होती . कारण कॅमेरा द्वारे टिपलेले छायाचित्र हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून परग्रहावरून आलेले 'एलियन्स" होतात ;व ते एलियन्स कोणत्या ग्रहावरून पाठवलेली आहेत किंवा आलेले आहेत याचा खुलासा करण्यासाठी आपल्या देशाची यंत्रणा अतिशय तोडक्या स्वरूपाची होती. कारण आमचे विमाने ही केवळ विशिष्ट प्रकारच्या वेळ सोडून त्यांना सुद्धा दिसून येत नव्हत्या . त्यांनी आमची विमान पडली होती . आणि त्यांच्याकडे असणाऱ्या सॅटेलाइट यंत्राद्वारे '; आमच्या यंत्रणेमध्ये असणाऱ्या सगळ्या प्रकारची माहिती त्यांनी ट्रान्सफर केलेली होती. आमच्या संगणक यंत्रणा एक यंत्रणेमध्ये असणारी सगळ्या प्रकारची प्रणाली डेड केलेली होती . नष्ट केली होती. आता मात्र आमचा शोध व आजूबाजूच्या सर्व देशांना त्या इमेज पाठवल्या गेल्या ! त्यापासून होणारे धोके आणि त्यांच्याकडून घडून येणाऱ्या कारवाया यासाठी सर्व देशांच्या सिखर परिषदेमध्ये सदर विषय मांडला गेला . त्यासाठी सामूहिक रित्या प्रयत्न सुरू झाले . मात्र इतर देशांमध्ये कोणत्याही प्रकारची चिन्ह , इमेज ; किंवा 'एलियन्स' मिळाल्याचा किंवा आल्याचा पुरावा किंवा काही घडलेले नव्हते . याचा अर्थ आशिया खंडामध्ये याच बेटावर फक्त भारतातच एलियन्स आलेली आहेत . असे गृहीत धरून आमचे सहकार्य साठी सर्व प्रकारची सायंटिस्ट , तज्ञ यांना बोलावण्यात आले . शोध घेण्यास सुरुवात केली त्यासाठी स्वतंत्र प्रकारची रोबोट यंत्रणा तयार केली . आणि एक ते दोन आठवड्यामध्ये ही सारी यंत्रणा कामाला लागली . समुद्रामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या बोटी द्ववारे , विविध प्रकारची महत्त्वाची ठिकाणे शहर . संरक्षण यंत्रणा , संबंधी असणारे सर्व प्रकारची अलर्ट ! म्हणून घोषित केली . व शोध घेण्यासाठी ता एका बेटावर अचानक पणे विशिष्ट प्रकारच्या तबकड्या त्यांना दिसल्या . काही आमच्या पाणबुड्या द्वारे जवळ जाऊन शोधण्याचा कार्यक्रम सुरु झाला . कारण वरून कोणत्याही प्रकारची यंत्रणा ; ड्रोन; विमान; पाठवली असता ते काही क्षणांमध्ये निकामी होते. आता मात्र बोटी द्वारे लढाऊ नौका द्वारे आरंभ झाले .तेव्हा आमची रोबोट यंत्रणा निर्जन बेटावर काही अंतरावर बोटी द्वारे व. तेथे पोहचली व अशा प्रकारचे वेव्ह; कॅमेरे; याद्वारे मोहीम सुरू झाली. तेव्हा त्यात तबकड्या म्हणजे जणू एखाद्या मोठ्या दगडाच्या आकाराच्या! असून मधून विशिष्ट प्रकारचे एलियन्स हे बाहेर पडत होते. त्यांना कोणत्याही प्रकारची पृथ्वीवर असणाऱ्या मानवा प्रमाणे भाषण करण्याची आवश्यकता नव्हती . कारण एलियन्स मध्ये असणारी यंत्रणा इतकी प्रगत होती की त्यांच्या विशिष्ट अवयव मधून सिग्ननल बाहेर निघत; व्यवस्थित बाहेर पडत व एकमेकांना संकेत द्वारे अर्थ मिळवून त्या कार्य करीत होत्या . विशिष्ट प्रकारचे लाईट द्वारे सिग्नल दिसत होते . एखाद्या मूक चित्रपटाप्रमाणे त्यांच्या क्रिया चालू होत्या . तेंव्हा आम्ही त्यांच्याकडे पाठवलेले रोबोट यंत्रणेने दहा पंधरा मिनिटांमध्ये त्यांची सारी माहिती मिळवली आणि त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवली व थेट एलियन्स नष्ट करण्यासाठी असणारी कोणत्याही प्रकारची यंत्रणा आमच्याकडे नव्हती . त्यामुळे यंत्रणा तेथे गेली असता काही क्षणांमध्ये हवेतल्या हवेत किंवा विशिष्ट अंतरावर क्षणार्धात जळून खाक होत होती . कोणप्रकारचा धातू किंवा इतर प्रकारचा वस्तू सुद्धा काही क्षणात जाळल्या जात होत्या. तेव्हा मात्र आपल्याकडे अशी कोणतीही यंत्रणा असेल की त्यांना नष्ट करू शकेल यासाठी असणारे तंत्रज्ञान शोधायासाठी साऱ्यांचे लक्ष ; व स्क्रीनवर आणि त्या स्क्रीनवर दिसणाऱ्या हालचाली ;रोबोट द्वारे त्या बेटावरून सेकंदामध्ये आमच्यापर्यंत पोहोचत होत्या तेव्हा मात्र सार्यांची डोके सुन्न झाली होती .त्यांच्या कारवाया काही क्षणांमध्ये वाढत होत्या तेव्हा मात्र आमच्या रोबोट द्वारे विशिष्ट प्रकारचे युरेनियम शृंखकलेचा उपयोग करून अणू स्फोट घडवण्याचे ठरवले .वरून सार्या कायदेशीर बाबी पूर्ण करून होणारे विपरीत परिणाम ! संरक्षण यंत्रणा .परवानग्या मंत्रालयाकडून सार्या प्रकारची माहिती व परवानगी मिळवल्या ही घटना 24 तासा सारी यंत्रणा डोळ्यात तेल घालून कार्य करीत होती . तेंव्हा प्रयोग म्हणून काही तासांमध्ये अणू स्फोट घडवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य ;पाणबुड्या द्वारे तेथे पोचवण्यात आले; आमची यंत्रणा ही सार्या प्रकारची बॉम्बची पेरणी करून इथून काही क्षणांमध्ये त्यांच्या यंत्रणेला या सगळ्या चां सुगावा लागला. काही 'एलियन्स 'हे पॅराशुट घेऊन त्याप्रमाणे विमानातून पडतात त्याप्रमाणे स्वतंत्ररीत्या काही एलियन्स ही आकाशात जाताना दिसू लागली व त्यांनी आणलेली वस्तू बाहेर पडत होते .काही हालचाली व विशिष्ट प्रकारचे सिग्नल्स मिळू लागले. तेव्हा आमची यंत्रणा खडबडून जागी झाली व साधारण चार , पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये स्फोट घडवून आणण्याचे आणि त्या पद्धतीने आमचे काही रोबोट यंत्रणा; काही जहाजं ;काही मिनिटांमध्ये दूर होऊ शकली नाही. त्यामुळे आणि सॅटेलाईट द्वारे बघितले असतात काही एलियन्स आहे तेथून पसार झाली होती व त्यांनी आणलेल्या त्या वस्तूंचा स्फोट झाल्यामुळे तेथे अवशेष पडलेले होते . मात्र या स्फोटामुळे तेथे असलेल्या परिस्थितीमध्ये छत्तीस तासापर्यंत आपली कोणत्याही प्रकारची यंत्रणा तेथे कार्य करू शकणार नव्हती . वा पोहोचू शकणार नव्हती . त्यामुळे वेट अॅन्ड वॉच म्हणून फक्त वाट बघणे हेच आमच्या हातात होते .व तेथून काही अंतरावर असणाऱ्या आमची रडार यंत्रणा साधारणतः 1000 किलो मीटर वर जेव्हा इमेज घेत होती . तेव्हा त्या एलियन्स जेव्हा वर जात होत्या तेव्हा यंत्रणेवर त्या विशिष्ट प्रकारचे ब्लॅक स्पॉट दिसत होते .त्यांची मोमेंट म्हणजे त्या मध्ये झालेले बदल कारण प्रत्येक क्षणाला ते काळा ठिपक्यांचा आकार हा वेगवेगळा कालच्या अर्थ लावता येणार नाही . अशा पद्धतीने आकृती केवळ मध्ये काळा धूर जसा दिसतो त्याप्रमाणे ती काळी की दिसत होती. सारी यंत्रणा ती नष्ट झाली होती . आपलं कार्य यशस्वी झाले . कारण त्यानंतर या कालावधीमध्ये सॅटेलाईटद्वारे पृथ्वीवर कोणतेही भागांमध्ये त्याप्रकारची लाल स्पॉट किंवा काळे आकृत्या दिसून आले नाही . सार्यांनी सुटकेचा श्वास सोडला . याचा आनंद वाटू लागला. त्या एलियन्स म्हणजे काय ? त्यांनी पाठवलेले संदेश . त्यांनी केलेल्या कारवाया यांचा फक्त शोध घेत राहिली .मात्र सर्व विकसित तंत्रज्ञान याच्या विषयी काहीही माहिती मिळाली नाही जणू काही अंधारामध्ये एखाद्या व्यक्तीने गालावर थप्पड मारण्याचा भास झाला .कारण एलियन्स ने तुमच्या पृथ्वी वर येऊन कारवाया करून निघून जाणे . म्हणजेच आजच्या तंत्रज्ञानाच्या विकासावर एलियन्स ने मारलेली एक चापट होती . आणि ती मारली होती 'एलियन्स' ने..!

