Sharad Kawathekar

Abstract Tragedy

3.5  

Sharad Kawathekar

Abstract Tragedy

एकांत

एकांत

1 min
113


मौन

एकांगी एकांत

माझाच एकांत

आणि एकांतातलं ते मौन 

मौनातच कधीकधी मी गुणगुणतोय माझ्या एकांताच गाणं. आपल्या दोघातलं एकांगी मौनातलं.त्या समोरच्या तलावातल्या तरंगासारखं तरंगत राहतय. तरंगामागे तरंग उठत राहतात. पहिला तरंग दुसऱ्या तरंगाचा पाठलाग करतोय आणि मीही त्या तरंगाचा मागं मागं जात राहतो न् माझं एकांतातल गाणं मौनात गुणगुणत राहतो. तरंग उठत राहतात. मी विलग होत जातो,अलिप्त होत जातो. शांत जातो. मौनाशी मौनातच संवाद करत संवादी होत जातो.

तरीसुद्धा ...

कुठंलासा एखादा आठवाचा खडा पडला की पुन्हा एकदा तरंगाची रांग सुरू होते आणि पुन्हा एकदा ते तरंग कुठंल्याश्या तीरीला जावून धडपडत थडकतात. आणि मग मीही त्या तरंगाबरोबर तरंगत काठावर जावून शून्यात स्वतःतच हरवून जातो. असूनही नसलेला मी पुन्हा एकांत शोधायला लागतो. पण तो एकांत काही केल्या मिळत नाही. आणि मिळणार नाही याची खात्री आहे तरी वायफळ प्रयत्न करत राहतो. दुपार संपली, सांज संपून रात्रही जवळ आली आणि हुरहूर मात्र वाढतच राहिली काळोख अंगाभोवती विळखा घालू लागला,एकटेपणा वाढू लागला डोळ्यांच्या कडा पाणावू लागल्या आणि पुन्हा त्याच एकांताच्या डोहात बुडू लागलो ...

कधी संपणार हे कालचक्र...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract