दुर्भाग्य तिचं भाग - 3
दुर्भाग्य तिचं भाग - 3
लग्न होऊन मीनाक्षी सासरी माप ओलांडून आली. तिने शालिनी सोडून सगळ्यांना आपलं केलं. मधुराताईंना आई आई म्हणून थकत नसे. शालिनीला मात्र तिचा खूप राग येई.
आज मीनाक्षीचा किचनमध्ये पहिला दिवस. मधुराताईनी मुलांचे डब्बे, पाणी भरून ठेवले होतें. मीनाक्षीने पाहिले तर त्यांनी सगळंच बनवून ठेवलं होतं.
आई तुम्ही कशाला करायचं मी केलं असतं ना...!आजपासून आम्ही दोघी मिळून सगळं करणार तुम्ही आराम करायचा. तुमचे आरामाचे दिवश आहेत. असं म्हणताच एवढी आपुलकी सुनेने दाखवलेली पाहून मधुराताईंच्या डोळ्यातून पाणी आलं. तेव्हा शालिनी तिथे येऊन म्हणाली, माझा चहा तयार आहे का...? मला देईल का कोणी...? देईल का कोणी म्हणजे काय ताई...? तुम्ही सून आहात घरच्या... तुम्ही सगळ्यांना देईला हवं...!
शालिनी, तू शिकवू नकोस मला....!मला कळतं. कळतं तर घ्या हातानं चहा तुमच्या...!, मीनाक्षी म्हणाली.
मीनाक्षी ही काना मागून आली आणि तिखट झाली अशीच अवस्था शालिनीची झाली होती. कारण घरातील वातावरण रघुने बायकोच्या कानावर घातले होतें.त्यामुळे मीनाक्षी तशी वागत होती. मधुराताईना मात्र आईप्रमाणे खूप जपायची.
आज नेहमीप्रमाणे शालिनी घरी जाण्यास निघाली.
कोठे चाललात ताई एवढं आवरून...?", मीनाक्षी म्हणाली.
तू विचारणारी कोण...? शालिनी म्हणाली.
तुमची धाकटी जाऊ...!मीनाक्षी म्हणाली.
ताई घरात किती काम पडलीत, मला एकटीला काही होणार नाही. तुम्ही असाल तर उरकून जातील.
मी का करू काम...? माझी कामे नाहीत ही..!, "शालिनी म्हणाली.
तुमचा स्वयंपाक, कपडे, भांडी मी नाही करणार, तुमचं तुम्ही करा. मला जमणार नाही,"मीनाक्षी म्हणाली.
एवढं सगळं करण्यापेक्षा थोडफार करून निघून जावं असं विचार करून शालिनी पहिल्यांदाच किचनकडे वळली.
सासूबाईंना दोन्ही सुना किचनमध्ये काम करताना पाहून बरं वाटलं. जे त्यांना जमलं नव्हत ते मीनाक्षीने करून दाखवलं होतं.
शालिनीचेही गरोदरपणाचे दिवस भरत आले होतें.
कामं आवरले की शालिनी लगेच माहेरी पळाली. आईला कधी मीनाक्षीबद्दल सांगेल, असं शालिनीला वाटत होतं. माहेरी तर परिस्थितीच बदलली होती. संतोष ने कोर्टम्यॅरेज करून बायको घरी आणली होती. ती बारा वाजून गेले तरी अजून उठलीच नव्हती. तिची आई किचन मध्ये कामं आवरत होती.
शालिनीकडे बघत तिचे बाबा म्हणाले, बघा तुमच्यासारखीच कामचुकार बायको घेऊन आलाय संतोष तुमचा भाऊ ...!
ती अशीच माहेरी पळत असते सारखी....!
तिच्या आईला म्हणाले," घ्या आता जसे पेराल तसं उगवत. आलं का लक्षात मुलांना नेहमी चांगली वळण लावायचे असते .
एक मुलं होईल तरीही माहेर अजून सूटत नाही तुमच्या पोरीचं.
शालिनीचे बाबा चिडूनच बोलत होतें.
शालिनी आणि तिची आई निशब्द एकमेकींकडे बघत राहिल्या.
शालिनीच्या लक्षात तिची चूक आली होती, किती सासुशी चुकीचे आणि निष्ठुर वागले हे तिच्या आईबरोबर घडले की लक्षात आलं.
शालिनीला तिची आई म्हणाली, "तुला मी नेहमी चुकीचं शिकवलं, पण आज सांगते...! सासर हेच तुझं घर, त्या घराला आपलं कर. सासूला आईचं प्रेम दे. माझ्याबरोबर सासुरवास झाला. तेच डोक्यात ठेऊन मी तुला चुकीची शिकवणूक दिली. तुझी सासू तशी नाही. अजून वेळ गेली नाही त्यांची माफी माग...!
जमलं तर मलाही माफ कर. कारण लग्नानंतर तुझ्या संसारात खूप मी लक्ष घातलं.
शालिनीच्या डोक्यात आईची वाक्य फिरत होती. किती चुकीचं वागले सासुशी, त्यांचा पदोपदी केलेला अपमान सगळं तिला आठवू लागलं.
सासरी जातानाच शालिनीच्या जोरात पोटात दुखू लागलं,आणि जाग्यावरच ती चक्कर येऊन पडली.
तिला जेव्हा जाग आली, तेव्हा तिने गोंडस मुलीला जन्म दिला होता. तिच्या कुशीत छोटंसं बाळ विसवलेलं पाहून तिच्या डोळ्यात पाणी तरळले.
तिच्या सासरकडील सगळी माणसं कडेने उभी होती . सगळे तिच्या तब्बेतीची चौकशी करत होतें. एवढं वाईट वागूनही किती हे काळजी करतायेत....! तिच्या डोळ्यातून पाणी आलं.
"आज पहिल्यांदाच पच्छातापाचे अश्रू तिच्या डोळ्यातून वाहत होतें. मधुराताईंनी गरमागरम तुपातला शिरा तिच्यासाठी घेऊन आल्या होत्या. तिला त्या प्रेमाने चारत पण होत्या. आईच्या माया लावणाऱ्या सासूला एवढं बोलून त्यांचं प्रेम जराही कमी झालं नाही. चूक लवकर लक्षात आलेली कधीही चांगली
नाहीतर आयुष्यभर पच्छाताप करून उपयोग नसतो आज तिला समजलं.
चारता चारता शालिनीने मधुराताईंचा हात धरला. आई मला माफ करा...!खूप चुकीचे वागले मी तुमच्याशी... तुम्हाला ओळखू नाही शकले. शालिनी मधुराताईंच्या गळ्यात पडून रडू लागली. आपल्याला नेहमी योग्य शिकवण मिळणे खूप गरजेचे आहे. मधुराताईंच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं.
मीनाक्षीने बाळाला उचलून घेतलं. खूप गोड आहे हा मुलगी ताई तुमच्यासारखीच. मलाही माफ करा ताई. मी ही तुमच्याशी चुकीचे वागले.
मीनाक्षी तुझ्यामुळेच माझे डोळे उघडले. सासरची माणसे मला समजली, आईची माया करणारी सासू समजली तुझ्यामुळेच,"शालिनी मीनाक्षीला म्हणाली.
तुझ्याकडूनच शिकले मी सासरचे घर हे सुनेमुळेच स्वर्ग होते.
शालिनीला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. छोट्या परीच घरात स्वागत झालं. सगळेजण खूप खुश होतें. घर पुन्हा एकदा भरलं गोकुळ झालेले पाहून मधुराताईना आनंद वाटला. नवऱ्याची आठवण त्यांना येत होती. त्यांच्या फोटोकडे पाहून त्यांचे अश्रू वाहत होतें.
एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा आदर केला तर, कितीतरी संसार सुखाचे होतील.
***********समाप्त **********
