दुर्भाग्य तिचं..... भाग :2
दुर्भाग्य तिचं..... भाग :2
शालिनीच्या वडिलांना मात्र मधुराताईचं वाईट वाटे. ते शालिनीला समजावून सांगत. शालिनी देवा सारखी सासू मिळाली.तिचे पाय धुवून पाणी पी. आज नवरा नसताना तिने कष्टाने संसार उभा केला. समाजात मान मिळवला,आणि तू त्यांच्याशी अशी वागतेस.पण शालिनी ऐकेल तर खरं...शालिनीची आई लगेच म्हणाली, "तुम्ही गपबसा ती बरोबर वागतेय....!" शालिनीच्या आईला सासुरवास झाला होता त्यामुळे त्यांनी तिचे कान सासुविषयी चांगले भरले नव्हते. सासू वाईटच असते असं शिकवलं होतं.
शालिनीच्या भावाला ही शालिनीने सारखं माहेरी येणं आवडत नव्हत.
शालिनीचे बाबा म्हणाले.....,अग मुलीचं सासर हेच तिचं घर. ही सासरी कमी आणि माहेरीच जास्त असते. तू चांगलं वळण लाव. दुसरं कोणी असतं तर तिला माहेरीच कायमच पाठवलं असतं. शालिनीचे वडील रागानेच बोलत होतें.
शालिनीची आई म्हणाली, तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊस... ये गप्पा मारत बसू आपण...!
मधुराताईचं किचनमध्येच काम चालेले होतें. तोपर्यंत त्यांचा धाकटा मुलगा रघु तिथं आला.
रघु....., आई मला तुझ्याशी बोलायचं आहे. खूप दिवसापासून सांगायचं होतं. आई माझं एका मुलीवर प्रेम आहे. माझ्या कॉलेज मध्येच होती ती.
मधुराताई म्हणाल्या ...., रवीच लग्न हौसने केलं..' बघ अजून निसतरतेय. आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणत गप्प बसायचे. तिला नवऱ्याशिवाय दुसरं तिला काही कोणी दिसत नाही,आणि दुसरी कशी येते काय माहित त्यात लव्हमॅरेज माझ्या अंगावर काटा येतोय रघु.
आई मीनाक्षी अशी नाही ग....वाहिनीपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे.माझी बायको अशी वागली असती तर मी शांत बसलो नसतो.जेवढा दादा शांत बसतो "रघु म्हणाला.
लग्न होईपर्यंत सगळं चांगलंच दिसते. लग्न झाल्यावरच रंग कळतात,"मधुराताई रागाने म्हणाल्या.
आई ती जर अशी वागली तर मी तीला घराच्या बाहेर काढीन,"रघु म्हणाला.
मुलाच्या प्रेमापोटी मधुराने होकार तर दिला, पण मन मात्र घाबरलं होतं.
सकाळी उठून मीनाक्षीच्या घरी जायची सगळ्यांची तयारी चालेली होती. आज सकाळीच शालिनी बाहेर चालली होती. मधुराने विचारले तर,तुम्ही मला विचारणारा कोण....? असं उत्तर मिळालं.
रघु तिथेच होता. त्याला सहन झालं नाही म्हणून तो बोलला..."वाहिनी तुमच्या आई सारखी ती पण तुम्हाला अपमान करताना जराही काही वाटत नाही का तिचा. मला तुमच्यासारखी बायको मिळाली असती ना सरळ तिला घराच्या बाहेर काढली असती.
मधुराने त्याला सकाळी सकाळी गप्प राहायला सांगितलं.
रवी मात्र लांबूनच बघत होता पण काही बोलत नव्हता.
मधुराताई रवीकडे बघून बोलल्या, आपलंच नाणं खोटं असेल तर काय करायचं.
शालिनी आज कोठे जाऊ नकोस रघुला मुलगी पहाण्यासाठी जायचं आहे. तू घरातील थोरली सून आहेस. त्यामुळे तुला यावं लागेल....!
माझा काय संबंध त्याच्याशी, तुम्हाला सून आवडली म्हणजे बसं असंही लव्हमॅरेज आहे. त्यामुळे मला थोडीच तुम्ही विचारणार आहात. ते काही नाही मला जमणार नाही. मी आईकडे चालिये. तुमचं तुम्ही बघून घ्या. शालिनीचा ठसका पाहून मधुराताईंच्या डोळ्यात पाणी तरळल. कशी ही अशी... त्यांना खूप वाईट वाटत होतं. शेवटी तिला न घेता मीनाक्षीला पाहायला निघून गेले.
आज शालिनी पुन्हा माहेरी आलेली पाहून वडिलांनी आणि तिच्या भावाने तोंड वाकडेच केलं.
संतोष (भाऊ ).....,"ताई तुझं तुझ्या संसारात लक्ष कमी आणि माहेरीच जास्त आहे. उठसूट काय ग माहेरी पळतेस....? सासरच्या माणसांचा आदर ठेव जरा. संसारात लक्ष घाल. किती त्या सासूचा फायदा घेशील...?
तोपर्यंत शालिनीची आई आली. संतोष मोठया बहिणीशी असं बोलतात का...?तुझी बायको आली की तिला शिकव. चल शालिनी दोघीही आतमध्ये निघून गेल्या.
कधी सुधारणा होणारे काय माहित तिचे बाबा संतोषला म्हणाले.
मीनाक्षी सर्वाना आवडली. मधुराताईचं मन मात्र विचारात गुंतलेलं होतें. एकीचा घरातील रोजचा तमाशा माहित असल्याने दुसरीच्या बाबतीत त्यांना विश्वास ठेवणे कठीण होऊन बसले होतें.
लग्नाची बोलणी झाली आणि लग्न काही महिन्यातच धरलं.
शालिनीला दिवस गेल्याच मधुराताईना कळलं. त्यांचा आनंद काही क्षणाचाच होता. माझं बाळ माझी आई सांभाळेल. तुम्ही त्याची काळजी करू नका. ते माझ्या माहेरीच वाढेल असं बोलून ती मोकळी झाली.
शालिनी तुला सासरच्या लोकांचा एवढा राग कसला आहे की नेहमी एवढी घालून पाडून बोलत असतेस. सांग मला माझं काही चुकलं का....??, " मधुराताई म्हणाल्या....
माझ्या पर्सनल आयुष्यात मला कोणीही हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. तुम्ही तर मुळीच नाही. असं बोलून रागिणी तिच्या माहेरी निघून गेली.
मधुराताई मात्र रडत डोक्याला हात लावून बसल्या.
लग्नाची तारीख जवळ आली, सगळी तयारी दोघे भाऊ मिळून करत होतें. मधुराताई घरातील सगळं बघत होत्या. शालिनी तिच्याच तोऱ्यात राहत होती.
पुढे मधुराताईना दुसरी सून आली की कसे दिवस दिसणार होतें काय माहित....??
(क्रमश:)
