Jyoti gosavi

Comedy

4.2  

Jyoti gosavi

Comedy

दश तुला, दश मला

दश तुला, दश मला

1 min
425


दोन ब्राह्मण एकदा एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असतात, रस्त्यात त्यांना उसाचे शेत लागते. त्यामुळे त्यांना जाता जाता थोडेसे ऊस घेऊन जाण्याचा मोह होतो, आणि ते त्या शेतामध्ये शिरून ऊस तोडू लागतात.

त्यातील एक ब्राह्मण आपल्याबरोबर ब्राह्मणाला म्हणाला

"दश तुला, दश मला,

दश घरच्या ब्राह्मणीला,

पंच पंच पिल्लूका

शेंडा बुडखा रेडूका"

(याचा अर्थ असा आहे, दहा तुला, दहा मला, दहा घरच्या स्त्रीला, मुलांसाठी 5/5 आणि शेंडा बुडखा घरातील गुरे खातील)

त्यावर दुसऱ्या बाजूने शेतकरी हातात काठी घेऊन येत असतो, तेव्हा त्याचा दुसरा सहकारी म्हणतो.

"दक्षिणेस खिंडूका यत् पलाय सजीवते

( दक्षिणेच्या बाजूने छोटीशी घळ आहे, त्यातून जर पलायन केलं तर जीव वाचेल)


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy