STORYMIRROR

Renu Kubade

Abstract Others

4.0  

Renu Kubade

Abstract Others

दर्शन

दर्शन

2 mins
250


परवा गणपतीच्या देवळात गेले होते. गर्दी तशी फार नव्हती. पण माझ्या सारखे काही तुरळक भाविक होते. देवळाच्या आवारात जाताच मी चप्पल काढण्यासाठी चप्पल स्टँड गाठलं. स्टँड बघता क्षणी त्याचा फोटो काढावा असे मनापासून वाटले. स्वछ पुसलेल्या स्टँडवर एकसुद्धा चप्पल नव्हती! सगळ्या चपला मस्त पैकी इकडेतिकडे विखुरल्या होत्या. मी माझी चप्पल स्टँडवर ठेवली आणि वळली. एक मुलगा मला पाहून हसला. माझ्या चेहऱ्यावरचे चिडके भाव टिपले असावे त्याने कारण माझ्या मागोमाग त्याने ही चप्पल चप्पलस्टँड वर नीट ठेवली. दर्शन घ्यायचे म्हणून मी पहिल्या पायरीवर पाय ठेवणार तोच लक्ष तेथे लावलेल्या फलकावर गेले. 'येथे पादत्राणे काढू नये' बरोबर त्या फलकाच्या खालीच यथेच्छ पादत्राणे विसावली होती. आपल्या आपल्या मालक, मालकिणीची जणू वाट बघत होती. फलकाच्या नाकावर टिच्चून! बोला आता. मी शक्य तितके मन शांत ठेऊन चार पायऱ्या चढले आणि गणपती बाप्पाचं लक्ष माझ्या कडे वेधलं जावं म्हणून घ

ंटा वाजवली आणि प्रार्थना केली "तुझ्या चरणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शिस्त लागू दे"

दर्शन घेऊन त्याच आवारात असलेल्या महादेवाच्या मंदिरात मी गेले. तेथे एक काकू शिव लिंगावर दुधाचा अभिषेक करू द्यावा म्हणून गुरुजींना विनवणी करीत होत्या. ते अगदी शांत आणि मनापासून सांगत होते, अहो तुम्हाला अनुमती दिली तर इतरही अनेक जण येतील. सकाळी व्यवस्थित पूजा केली जाते. आपण मनोभावे दर्शन घ्यावे. काकूंना काही पटेना. त्या म्हणाल्या एवढं काय? आमच्या वेळेसच सगळे नियम आठवतात. बडबड करतच काकूंनी एका पानावर चिमूटभर साखर ठेवली आणि गुरुजींचे लक्ष्य नाही असे दिसताच थोडे दूध पिंडीवर टाकून पुन्हा एकदा महादेवाला आंघोळ घातलीच. नंतरच त्या तिथून निघाल्या.

मी देवाला हात जोडले तेव्हा त्या चिमूटभर साखरेचा खूप साऱ्या मुंग्यांनी ताबा घेतला होता आणि पुन्हा आंघोळ झालेला महादेव माझ्याकडे बघून हसत होता........


तुम्ही नाही ना असे करत? 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract